आज पुन्हा मी रडले,
का असे हे घडले ?
खरंच का ती इच्छा होती,
का मनाची भीती ?
का नाही मज उमगली,
ही नात्यातील प्रीती
कसे समजवू मी मनाला ?
का मुकले मी आनंदाला ?
खरेच का सर्व दोष
फक्त माझा होता ?
यास्तव प्याला का
माझाच रिता होता ?
वाटे एकदाच परत जावे
कुशीत शिरून पुन्हा रडावे
का नाही ही ओढ त्याला ?
का न उमगे मजला ?
काळही सरला, ना वेळही उरला
संयम माझा पुन्हा ढळला
प्रतिक्रिया
27 Nov 2011 - 6:29 pm | मनस्विनि२५१
बाकी एकदा निर्णय घेतला कि त्याबद्दल फेरविचार करण्याचा मानस ... खास करुन ज्याच्यासाठी करायचा आहे, त्याला जर त्याची किंमतच नसेल तर - योग्य वाटत नाही !!
28 Nov 2011 - 9:41 am | फिझा
छान .. आहे कविता !!