खेकड्यांची कलाकुसर

जागु's picture
जागु in कलादालन
25 Nov 2011 - 5:16 pm

कोणत्याही समुद्रकिनार्‍यावर गेलो की ओहोटी असेल तर किनार्‍याच्या ओलसर वाळून हमखाच खेकड्यांची बिळे दिसतात. मला ही बिळे पहायला नेहमीच आवडतात कारण त्या बिळांच्या बाजूला सुंदर नक्षीकाम तयार झालेले असते. हे खेकडे अगदे छोटे असतात. मधूनच ते तुरु तुरु किनार्‍यावर चालतानाही दिसतात. ते बिळ खणताना जी वाळू वर फेकतात त्याने सुंदर डिझाईन तयार झालेली असते आणि त्या डिझाईनला कोणते ना कोणते रुपही दिसून येते एक दिवस आम्ही सकाळी मॉर्नींग वॉकला समुद्रावर गेलो आणि गर्दी नसल्याने निवांत हे फोटो काढले.

१) खेकड्याचे बिळ

२) मला ही दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजी वाटली.

३) समुद्राच्या लाटांचे वलय आणि खेकड्यांनी केलेले नक्षीकाम यामुळे हे जंगल तयार झाले आहे.

४) साडीची किनार

५) फुलपाखरू

६) जंगल

७) सुर्य किंवा चक्र

८) निवडूंगाचे झुडूप
'

९) ही खेकड्यांची आवडती डिझाईन दिसते.

१०) झुडूप किंवा ताटाभोवतालची नक्षी

११) ह्याला काय म्हणायचे ?

१२) मॉडर्न आर्ट

१३) ताड किंवा नारळाचे झाड

१४) ह्यात मला जंगल आणि त्या जंगलात हत्ती त्याच्या पिल्ला सकट दिसत आहे.

१५) कलाकार

छायाचित्रण

प्रतिक्रिया

वेताळ's picture

25 Nov 2011 - 5:18 pm | वेताळ

खुप छान जागु ताइ

श्री गावसेना प्रमुख's picture

26 Nov 2011 - 9:57 am | श्री गावसेना प्रमुख

तेच म्हटल खेकड्याने बिळ बनवितान्ना माती का बाहेर काढली नाही, छोटा होता होय
(मला वाटले वाळुवर ऩक्षी काढली काय?)धरणा वर जा मोठाल्ले मिळतील

फोटो नंतर त्या हाताचे काय झाले हे दाखवनारा अजून एखादा फोटो टाकूशकता काय?
बादवे, खेकड्यास दोन बोटाच्या चिमटित व्यव्स्थित धरता येते हे ठाउक होते. एकदा ट्रिपमध्ये एका कोळ्याच्या पोराने सगळ्यांना शिकवलेही होते. पण असे खुशाल हातात कसे ठेवतात म्हणे त्याला?

आत्मशून्य's picture

25 Nov 2011 - 5:27 pm | आत्मशून्य

खेकड्याचे हात (नांग्या) तोडलेले फटूमधे दिसत नाहीत काय ? मग फोटो नंतर हाताची न्हव्हे खेकड्याचे काय झाले असेल याची चिंता हवी ना ?

असो, फोटो आणी त्यामागील संकल्पना मस्तच.

मन१'s picture

25 Nov 2011 - 5:38 pm | मन१

तेवढे समजायची अक्कल असती तर खेकडेही खायला शिकलो असतो.
खेकडे पाहिले आयुष्यात तेच मुली २-३ वेळेस.
खेकडे पोटात जाउन जिवंत झालयवर काय काय करु शक्तात ह्या भीतीनेच कधी खाउन पाहिले नाहित.

आत्मशून्य's picture

26 Nov 2011 - 8:04 pm | आत्मशून्य

आशा आहे आता खेकडे बिंधास्त खाल ;)

मदनबाण's picture

25 Nov 2011 - 5:41 pm | मदनबाण

खेकड्याचे हात (नांग्या) तोडलेले फटूमधे दिसत नाहीत काय ?
माझ्या मते हातातला खेकडोबा अजुन लहान आहे ज्याच्या नांग्या विकसीत झाल्या नसाव्यात !
अर्थात जागु तै या बाबतीत जास्त सांगु शकेल...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Nov 2011 - 6:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मलाही असेच वाटते. ते इतके लहान पिल्लू आहे की त्याची लांबी जेमतेम बोटाच्या एका पेराइतकी आहे. पूर्ण वाढला तर कमीत कमी तळव्या इतका होईल.

ह्या जातीचे खेकडे लहानच असतात.
पण हा फोटोतला एकदम छोटूच आहे.

आत्मशून्य's picture

26 Nov 2011 - 8:10 pm | आत्मशून्य

माझ्या मते हातातला खेकडोबा अजुन लहान आहे ज्याच्या नांग्या विकसीत झाल्या नसाव्यात !

खेकडा लहान आहेच. पण खेकडा कितीही लहान असो त्याच्या नांग्या समोरच दिसतात. तसही नांग्या असताना कोणताही खेकडा अशाप्रकारे हातात कोणी ठेवत नाही. :) अर्थात जागु तै या बाबतीत जास्त सांगतीलच, आम्ही आपलं आमचं निरीक्षण नॉंदवले.

मस्तच ! ते नक्षिदार फुलपाखरु किती छान आहे ! :)
हत्ती दिसला पण ते पिलु काय दिसेना मला ! :(

किसन शिंदे's picture

25 Nov 2011 - 5:42 pm | किसन शिंदे

निसर्गाच्या कणाकणात सुंदरता अगदी ठासुन भरलीय, आपण फक्त आपले डोळे उघडे ठेऊन ते पाहण्याची गरज आहे आणी मला वाटतं तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी हे सगळीकडेच शोधता, नव्हे तुमच्या डोळ्यांना ते दिसतंच.

अगदी खेकड्याच्या बिळाभोवती पसरलेल्या वाळूतही कलाकुसर बघाणार्‍या तुमच्या रसिक नजरेला सलाम!

सुहास झेले's picture

25 Nov 2011 - 6:20 pm | सुहास झेले

मस्त गं ताई.... :)

जागु's picture

25 Nov 2011 - 6:55 pm | जागु

वेताळ, गणपा, सुहास धन्यवाद.
मन, आत्मशुन्य - मदनबाण म्हणतात त्याप्रमाणे त्या खेकड्याच्या अजून नांग्या विकसीत झाल्या नाहीत. नांग्या तोडल्या नाहीत.

सर्वसाक्षी's picture

25 Nov 2011 - 8:28 pm | सर्वसाक्षी

मस्त संकल्पना.

श्रावण मोडक's picture

26 Nov 2011 - 9:39 pm | श्रावण मोडक

पाहणाऱ्याच्या नजरेत सौंदर्य असते!

निवेदिता-ताई's picture

27 Nov 2011 - 7:55 pm | निवेदिता-ताई

सुंदर ग......ताई.....नयनमनोहर

प्रभाकर पेठकर's picture

27 Nov 2011 - 8:34 pm | प्रभाकर पेठकर

खेकड्यांची अप्रतिम कलाकारी दिसून येते आहे.
त्यांच्या वसाहतीला 'कलानगर' असे नांव द्यावे काय?
अभिनंदन.

जागु तै हे नक्षीकाम कसे केले जाते त्याचा इडियो इथे देत आहे... :)

प्रचेतस's picture

28 Nov 2011 - 8:38 am | प्रचेतस

मस्त रे बाणा.
विडो लैच भारी आहे.

प्रभाकर पेठकर's picture

28 Nov 2011 - 9:55 am | प्रभाकर पेठकर

खेकड्यांच्या अपरंपार कष्टांची कल्पना आपल्या चित्रफितीमुळे येते. हि चित्रफित इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Nov 2011 - 7:17 pm | परिकथेतील राजकुमार

फटू एकदम चित्तवेधक.

बाणानी बर्‍याच दिवसांनी आपल्या प्रतिसादात व्हिडो दिल्याने बाणाचे विशेष अभिनंदन.

धन्यवाद मदनबाण. खुप छान क्लिप दिलीत.

प्राजु's picture

29 Nov 2011 - 1:47 am | प्राजु

अप्रतिम!!

अजितजी's picture

30 Nov 2011 - 6:38 pm | अजितजी

इथले पतिसाद आणि व्हिदिडओ पाहून बरे वाटले.-----