एका सागराची कथा

अश्फाक's picture
अश्फाक in जे न देखे रवी...
23 Nov 2011 - 10:13 pm

साधारण ३-४ वर्शा पुर्वी ही छान कविता वाचली होती , आज सहजच चाळ्ता चाळता सापड्ली , आपन बहुतेक वाचली असेल ,
कवी माहीत नाही.

एका सागराची कथा

एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली

'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?

दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन

आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी

मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.
बघच मग.

सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला, आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने

लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!

कविता

प्रतिक्रिया

वसईचे किल्लेदार's picture

23 Nov 2011 - 10:32 pm | वसईचे किल्लेदार

लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!

हा हा हा लय भारी
पळा पळा ... कोण पुढे पळे तो ...

अत्रुप्त आत्मा's picture

24 Nov 2011 - 12:03 am | अत्रुप्त आत्मा

अगदी छान रुपकानी नटलेली कविता आहे....अथ पासुन इतीपर्यंत.व्वा व्वा छान छान छान... :-)

वाहीदा's picture

24 Nov 2011 - 11:55 am | वाहीदा

राज की बात हैं !
सुनामी येण्याच कारण हे आहे काय ?

मस्त आहे ही कविता ..

मनस्विनि२५१'s picture

25 Nov 2011 - 1:22 pm | मनस्विनि२५१

निसर्गाचे चक्र काव्यातून फार सुंदररित्या चितारले आहे.