'पत्रिका'

किचेन's picture
किचेन in काथ्याकूट
22 Nov 2011 - 2:10 pm
गाभा: 

'पत्रिका' या विषयाने जेवढ माझ डोक खालालय तेवढ कोणाच खाल्लं नसणार.
खर तर पत्रिका, गुणमिलन, शांती वगैरे गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही.
या सर्व विषयाबद्दल माझ न्यान्ही तोकड्च आहे.पण माझ क्षेत्र अस आहे कि मला ह्याबाबत माहिती करून घ्यावी लागतीये.
यात सगळ्यात जास्त वैताग आणतो तो मंगळ
मंगळ,मंगळाचा प्रभाव, सौम्य मंगळ, मंगळाची शांती, आणि नागबली बद्दल मला माहिती हवी आहे.
शांती केली किवा नागबळी दिला कि मंगळ जातो का?
वैवाहिक जीवनात मंगळाचे दुष्परिणाम काय?
मंगळ फक्त वैवाहिक बाबतीत त्रास देतो कि आणखीनही काही दुष्परिणाम आहेत?
आपणास काही मंगळाचे चांगले -वाईट अनुभव आलेत काय?

(न्यान -हा शब्द कसा लिहावा?)

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

22 Nov 2011 - 2:16 pm | दत्ता काळे

...पण माझ क्षेत्र अस आहे कि मला ह्याबाबत माहिती करून घ्यावी लागतीये.

कुठलं क्षेत्र आहे तुमचं ?

साती's picture

22 Nov 2011 - 2:43 pm | साती

बहुदा किचेनताई विवाहजुळणी केंद्र चालवित असाव्यात.

किचेन's picture

22 Nov 2011 - 2:44 pm | किचेन

करेक्ट्ट्ट्ट्ट!

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2011 - 2:21 pm | परिकथेतील राजकुमार

मलाही ह्या अनुशंगाने एक प्रश्न विचारायचाच होता.

शांती केली किवा नागबळी दिला कि लोक मिपावरती डायर्‍या लिहीणे बंद करतील का?

विशाखा राऊत's picture

22 Nov 2011 - 2:32 pm | विशाखा राऊत

काय परा पहिल्या तीन मध्येच एकदम गुगली :)

काय आहे परा काका,
याबद्दल आणि गुणमिलन वगैरे बाबींबाबत ३ ज्यातीश्यांशी वेगवेगळी चर्चा केली.त्यातल्या दोघांनी मला पंचांग दाखवून माहिती सांगितली.काही गोष्टी समान होत्या तर काही एकदम भिन्न.
तिसरा ज्योतिषी जरा तरुण होता.वय ३२ फक्त! ज्योतिष साएड बिझनेस असेल म्हणून कदाचित पण त्याने मला सरळ 'हे शांती वगैरे म्हण्जे दोन पैसे आम्हालाही मिळतात!शेवटी हा आमचा धंदाच नाही का!'असे सांगितले होते.
वाटले मिपाकरांना काही माहिती अनुभव असेल, ज्यातून काहीतरी शिकायला मिळेल म्हणून हा धागा काढला!

न्यान शब्द सोडून यावेळेस बहुतेक काही चुकल नाही. :) जर चुकल असेल तर मिपाकर सोडणार नाहीत!

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2011 - 3:42 pm | परिकथेतील राजकुमार

कसे आहे ना, शेफनी आपले खाद्यपदार्थ बनवावेत. पोळी कर म्हणले की पोळी करावी आणि मोकळे व्हावे. उगा गहू कुठल्या राज्यात पिकतो ? त्याची शेते असतात का झाडे ? त्याला खत कोणते घालतात? जमीन बागायती हवी की कोरडवाहू असल्या चौकशा करत बसू नयेत :)

शेफ पोळ्या करताना देखिल ,गहु कोणत्या जातिचा आहे?पोळि टेस्टि हवि कि डाअट? तेल सोयाबिन लावु कि सुर्यफुल ? असे १००० प्रश्न विचारतात!
आमच पन अगदि तसच हाये!

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2011 - 4:37 pm | परिकथेतील राजकुमार

शेफ पोळ्या करताना देखिल ,गहु कोणत्या जातिचा आहे?पोळि टेस्टि हवि कि डाअट? तेल सोयाबिन लावु कि सुर्यफुल ? असे १००० प्रश्न विचारतात!
आमच पन अगदि तसच हाये!

आपल्याकडे बघून आपल्या शेफचा अंदाज येतोच आहे.

विशाखा राऊत's picture

22 Nov 2011 - 4:45 pm | विशाखा राऊत

--> would u like to have some tea?

yes pls

--> which one? herbal/black or regular with milk

with milk pls.

--> ok which milk? dairy/soya

dairy pls

how much fat you require? 2% or 4% or full fat

आई शपथ्थ कोण पिईल का चहा आता :D :D

चहाची वेळ संपुन जेवणाची चालु होईल :)

हि एक ट्रिक आहे....
१.आपण खूप हुशार आहोत हे सांगण्याची
२.आपल काम वाचवण्याची!

विशाखा राऊत's picture

22 Nov 2011 - 6:42 pm | विशाखा राऊत

कोणाला चहा द्यायचा नाही तर सरळ सांगावे ना.. उगा का आपली पाजळावी
असो मला आज गीता वाचायचा अजिबात मुड नाही आहे.. फिर कभी

वपाडाव's picture

22 Nov 2011 - 4:25 pm | वपाडाव


पर्‍या, अरे ही सप्रेम भेट द्यायला विसरलास कसा काय रे?
चल जौंदेत..... तुझं काम मी करतो आजच्यापुरतं.....

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2011 - 4:39 pm | परिकथेतील राजकुमार

धन्यु रे भावा.

आता आलोच आहे तर हातासरशी मी पण देतोच एक. महिन्याभरात दोन लागतीलच ;)

किचेन's picture

22 Nov 2011 - 5:51 pm | किचेन

काय राव ,निवडणुका जवळ आल्यात!कोण्यातरी पक्षाच्या फोटू चीताकावा त्यावर.माझ्याकडून पक्षाला दाना मिळाल आणि तुम्हाला ५-५० रु.!

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2011 - 5:57 pm | परिकथेतील राजकुमार

माझ्याकडून पक्षाला दाना मिळाल आणि तुम्हाला ५-५० रु.!

आपण काय लिहीतोय त्याच्या अर्थ तरी आधी समजून घेत चला हो.

असे गडबडा लोळणारे कि हसरे चेहरे आहेत हो तुमच्याकडे?
प्रत्येकाच्या प्रतिक्रियांमध्ये तुम्ही एकदा तरी असेच वेषांतर करून लोळत असता!

मोहनराव's picture

22 Nov 2011 - 6:07 pm | मोहनराव

पराशेठ.. कंट्रोल!! ;)

अरे का मंगळ, राहु -केतु अन शनींशी पंगा घेतोएस.... लग्न व्हायचं नाही हां तुझं!!!

-धूमकेतू

दत्ता काळे's picture

22 Nov 2011 - 2:27 pm | दत्ता काळे

ज्ञान हा शब्द jnaan असे टंकून लिहावा.

प्यारे१'s picture

22 Nov 2011 - 2:49 pm | प्यारे१

ज्ञान -dnyaan- ज्ञान

बाकी गोष्टींबाबत पराशी सहमत. ;)

अन्या दातार's picture

22 Nov 2011 - 2:56 pm | अन्या दातार

एखाद्या ज्योतिष प्रचार केंद्रात जाऊन अभ्यासाला बसा. आपोआप सगळे कळत जाईल. इथे धागे काढून काही उपयोग होणार नाही या बाबतीत.

गार्गी_नचिकेत's picture

22 Nov 2011 - 3:01 pm | गार्गी_नचिकेत

माझी ही एक शंका आहे, "कालसर्प योग" म्हणजे काय असते? त्याचे परिणाम काय असतात?

प्रभाकर पेठकर's picture

22 Nov 2011 - 3:01 pm | प्रभाकर पेठकर

वैवाहिक जीवनात मंगळाचे दुष्परिणाम काय?
मंगळ फक्त वैवाहिक बाबतीत त्रास देतो कि आणखीनही काही दुष्परिणाम आहेत?

मला वाटतं वैवाहिक जीवनात 'शुक्र' महत्वाचा असावा.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2011 - 3:07 pm | परिकथेतील राजकुमार

मला वाटतं वैवाहिक जीवनात 'शुक्र' महत्वाचा असावा.

चांदीचा पेला झिंदाबाद ;)

वैवाहिक जीवनात मंगळाचे दुष्परिणाम काय?
मंगळ फक्त वैवाहिक बाबतीत त्रास देतो कि आणखीनही काही दुष्परिणाम आहेत?

आम्ही तर ऐकले होते की राहू-केतु-शनी-मंगळ ह्यांचे दुष्परीणाम म्हणजेच माणसाचे लग्न होणे.

तुम्ही दुष्परिणाम भोगताय अस दिसतंय! ;)

झिंदाबाद ?? आणि गुडघे दुखणं , खरचटणं असं काही झालं की मग अमर रहे. ;)

धमाल मुलगा's picture

22 Nov 2011 - 8:07 pm | धमाल मुलगा

त्याला गुढघ्याच्या वाट्या फिरणे असं म्हणतात. ;)

हो काय ?? आमची आपली ऐकीव माहिती हो. चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद. ;)

धमाल मुलगा's picture

23 Nov 2011 - 10:30 am | धमाल मुलगा

भाग्य से अधिक वगैरे असतंय म्हणे. नो प्राब्लेमो

जिथं कमी,तिथं आमी अन् जै बारामती त्यामुळं आपलं है म्हाईत यवडंच. ;)

हाफव्हॉलीवर काकांचा षटकार. ;)

सुहास झेले's picture

23 Nov 2011 - 10:57 am | सुहास झेले

ह्येच म्हणतो.... :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

विजुभाऊ's picture

23 Nov 2011 - 5:14 pm | विजुभाऊ

वैवाहिक जीवनात 'शुक्र' महत्वाचा असावा.

बरोब्बर संतानी म्हंटलेलेच आहे. "शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी" अर्थात जेंव्हा आकाशात शुक्र असेल त्यावेळॅस माणसाची बुद्धी मंद चालते. तेंव्हा एक लोटाभर रात्रीच्या चाम्दण्यात ठेवलेले पाणी प्यावे म्हणजे त्रास संपतो

चांदिचा पेला लिहायच राहिलं क?मिपावर जोरात खप चालु आहे त्याचा. ;)

युयुत्सुना विचारा

मात्र पाचशे रुपये फी घेतील

किचेन's picture

22 Nov 2011 - 3:12 pm | किचेन

ते ज्योतिशि आहेत का?

हो
IITian ज्योतिषी आहेत ते

विनायक प्रभू's picture

22 Nov 2011 - 4:10 pm | विनायक प्रभू

५०० न देता आमचे झालेले आहे.
तुम्ही ५०० देउन करुन घ्या. (भेजा फ्राय, दिमागका दही वैग्रे)

प्यारे१'s picture

22 Nov 2011 - 3:18 pm | प्यारे१

खी खी खी खी...

अरे ये 'पी एस पी ओ' नही जानता........ ;)

किचेन's picture

22 Nov 2011 - 3:27 pm | किचेन

मी नविन आहे कि नै , मग अस हसायच नै. कळल

विशाखा राऊत's picture

22 Nov 2011 - 4:12 pm | विशाखा राऊत

ओह.. क्या बात कर रहा हो

ये "पी एस पी ओ" नही जानती

मोहनराव's picture

22 Nov 2011 - 6:10 pm | मोहनराव

ये "पी एस पी ओ" नही जानती
अभ्यास वाढवा!!

ऋषिकेश's picture

22 Nov 2011 - 3:50 pm | ऋषिकेश

'पत्रिका' या विषयाने जेवढ माझ डोक खालालय तेवढ कोणाच खाल्लं नसणार.

खरं की काय? कॉलिंग पकाकाका, विंग कमांडर ओक वैग्रे वैग्रे! ;)

यात सगळ्यात जास्त वैताग आणतो तो मंगळ

जर इतका वैताग देतोय तर बदलून घ्या. मंगळ एक्स्चेंग करून तिथे शुक्र ठेवा.. डब्बल शुक्र असला की लगिन सक्सेसफुल्ल होईलच नाहि का ;)

शांती केली किवा नागबळी दिला कि मंगळ जातो का?

हो जाईल की! मंगळाला शांती दिलीत की (तिला घेऊन) तो लगेच जातो. नागबळीचं म्हायीत नाय बॉ!

वैवाहिक जीवनात मंगळाचे दुष्परिणाम काय?

तो, ती आणि मंगळ म्हटल्यावर तिन तिगाडा न्हाई का होणार!

आपणास काही मंगळाचे चांगले -वाईट अनुभव आलेत काय?

मी (अजून तरी) मंगळाचा अनुभव घेतलेला नाहि. कधी घेईनसे वाटतही नाहि म्हणा :P

दीप्स's picture

22 Nov 2011 - 3:52 pm | दीप्स

खरे तर माझा पण विश्वास नाही. पण मी असे एकले आहे कि मंगळ असलेल्या मुलीचे जर एखाद्या मंगळ नसलेल्या मुला बरोबर लग्न झाले तर त्याच्या जीवनात खूप अडचणी येतात आणि याची प्रगती होत नाही. सतत काही ना काही समस्या असतात एका समस्येतून बाहेर पडतो न पडतो तेच दुसरी समस्या येऊन उभी राहते.
तेच या उलट जर दोघांनाही मंगळ असेल तर काही हि प्रोब्लेम होत नाही.

माझ्या नंदेचा मुलगा खूप त्रास द्यायचा ब्राम्हणाने नारायण नागबलीची शांती करायला लावली आणि सासूच्या अट्टाहासा मूळे त्याची शांती केली आता तो खूप शहाण्या मुला सारखा वागतो असे तिची सासू म्हणाली थोड्या दिवसांनी पुन्हा पुढचे पाढे पंचावन्न.

विशाखा राऊत's picture

22 Nov 2011 - 4:20 pm | विशाखा राऊत

किचेनताई, तुम्ही नक्की कुठे रहात आहात?
म्हणजे भारतात की भारताबाहेर?

बाकी कुठेही असलात तर ग्रह तारे बघण्यापेक्षा, मुलगा मुलगी एकमेकांना किती सांभाळुन घेतील, घरच्यांसोबत कसे राहतील वगैरे गोष्टिंचा विचार केलात तर त्या बिचार्‍यांचे जास्त कल्याण होईल.

मंगळ, राहुचा विचार कराल तर सगळ्यांचे कल्याण कराल. (आधी मुलगा, मुलगी, घरचे, लग्नाचा केलेला खर्च आणि सबंधीत व्यक्ती. नंतर पटले तर ठिक नाहीतर वकील, मध्यस्थ वगैरे सगळेच. मग परत वर्तुळ पुर्ण करायला नवीन स्थळ)

लगे रहो :)

जाई.'s picture

22 Nov 2011 - 4:28 pm | जाई.

+१

मन१'s picture

22 Nov 2011 - 4:50 pm | मन१

>> बाकी कुठेही असलात तर ग्रह तारे बघण्यापेक्षा, मुलगा मुलगी एकमेकांना किती सांभाळुन घेतील, घरच्यांसोबत कसे राहतील वगैरे गोष्टिंचा विचार केलात तर त्या बिचार्‍यांचे जास्त कल्याण होईल.
इतकेच बघून थांबणे अजिबात नको. दोघांच्या मेडिकल टेस्ट्स करून घ्या. दोघेही एकमेकांना अनुरूप आहेत ह्याची खात्री करून घ्या. इथं हापिसात भलभल्ते किस्से कानावर येताहेत. लग्नापूर्वी दोघांच्याही मेडिकल टेस्ट करण्याचा आग्रह धरणे जरुरीचे आहे असे वाटायला लागले आहे.
मला वाटते ब्लड ग्रुपचाही काही वांधा होता म्हणे पोझिटिव्ह्-नेगटिव्ह असे काहिसे असेल तर भविष्यात प्रसूतीच्या वेळेस अनंत अडचणी येतात. अर्थातच, होणारा थेट त्रास स्त्री शरीराचा अंत पाहून जातो, कधी कधी अंत करून जातो.

मस्त कलंदर's picture

22 Nov 2011 - 4:58 pm | मस्त कलंदर

छान प्रतिसाद. तू माझी मैत्रीण आहेस याचा आज मला अभिमान वाटला!!!

बाकी, मन१ शीही सहमत. जरी दोघांचा ब्लड ग्रुप एकच आणि पॉझिटिव्ह-पॉझिटिव्ह असला तरी म्हणे प्रेग्नंसीदरम्यान एक इंजेक्शन घेतल्यामुळे अडचणी येत नाहीत. माझ्या एका कलीगची अशीच केस आहे. तिने तिच्या दोन्ही प्रेग्नंसीदरम्यान अशा लसी घेतल्या होत्या.

आनंदी गोपाळ's picture

24 Nov 2011 - 2:10 pm | आनंदी गोपाळ

आपल्याला ठाऊक असलेल्या A, B, AB, O या ग्रूपमुळे मोठा प्रॉब्लेम येत नाही, तर तो त्यासोबतच्या Rh Factor मुळे येतो. या र्‍हीसस माकडात प्रथम सापडलेल्या गुणामुळे सगळे ग्रूप परत +ve व -ve अशा दोन भागांत उपविभगले जातात.

दोन्ही पालकांपैकी एक जरी +ve असला, तर बाळाचा ग्रूप या परिस्थीतीत कायम +ve च येणार, कारण -ve ही रिसेसिव्ह ट्रेट आहे. (किचकट जेनेटिक्स. जास्त टेन्शन घेऊ नये.)

जर आई +ve बाप -ve, अडचण नाही. पण जर स्त्री -ve व पुरुष +ve असेल तर प्रॉब्लेम येतो. तो का येतो?

तर तो येतो बाळंतपणावेळी. इथे आई -ve अन बाळ कायम +ve असणार आहे.
नाळ वेगळी होईपर्यंत बाळाचं रक्त अन आईचं रक्त एकमेकांपासून वेगळं असतं. पण बाळंतपणाच्या वेळी, नाळ सुटताना, रक्तवाहिन्या तुटतात, अन बाळाचं थोडं रक्त आईच्या रक्तात मिसळतं, अन हे 'फॉरिन' रक्तगट पाहून आईचं शरीर 'अँटीबॉडीज' बनवतं. त्यामुळे पुढील प्रत्येक प्रेग्नन्सीमधे बाळाच्या शरीरात 'रक्त' तयार होताच आईच्या अँटीबॉडीज येऊन बाळाचा जीव घेतात, व गर्भपात होतो. पहिल्या बाळालाही कधीकधी 'मिसमॅच ट्रान्स्फ्युजन' दिल्यासारखी रिअ‍ॅक्शन येते, पण ती फारच क्वचित.
यासाठी अँटी डी नावाचं एक इन्जेक्शन अश्या आईस प्रत्येक बाळंतपणावेळी दिलं जातं, जेणे करून त्या अँटीबॉडीज तयार होऊ नयेत.

हाच प्रकार बाकी A B O ग्रूप्स मुळेही माईल्ड प्रमाणात होऊ शकतो, पण तो बाळाला काविळ होण्याइतपतच बहुधा मर्यादित असतो.

इतकाच त्या रक्तगट दोषाचा प्रभाव आहे. जास्त टेन्शन घेऊ नका. फार काळजी असेल तर तुमच्या नेहेमीच्या 'अ‍ॅलोपथी' डॉक्टरांना विचारा. गायनॅकॉलोजिस्ट/पेडीअ‍ॅट्रिशिअन जास्त योग्य तपशील सांगतील.

दोघांचा गट सारखा असल्याने फरक पडत नाही. ते काय गोत्र नाहीये सगोत्र करु नये असं करायला =))

प्रभाकर पेठकर's picture

24 Nov 2011 - 3:01 pm | प्रभाकर पेठकर

सहमत आहे.

माझा रक्तगट ए+ आहे तर बायकोचा ओ- आहे त्यामुळे आमच्या पहिल्या (आणि एकमेव) अपत्याच्या वेळी ते इंजेक्षन द्यावे लागले होते. त्याचा रक्तगट ए+ आहे. १९८५ साली ते ७००/- रू म्हणजे जरा महागच वाटले होते. पण गरजेचे होते. 'भविष्यातील गरोदरपणात बाळाच्या आईच्या जीवास धोका संभवतो' ह्या, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमुळे आमच्या लेकाला भाऊ-बहिण नाही. (माझ्या कर्जांचा एकुलता एक वारसदार).

आनंदी गोपाळ's picture

25 Nov 2011 - 9:35 pm | आनंदी गोपाळ

डॉक्टरांनी त्यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत नीट पोहोचवलं नाही, किंवा तुमची गफलत झाली ऐकताना.

इंजेक्शन दिले नाही तर, 'भविष्यातील गरोदरपणात बाळाच्या आईच्या जीवास धोका संभवतो'

असे सांगितले असेल, किंवा सांगवयास हवे होते. किंवा ऐकावयास हवे होते. असो. जे झाले ते झाले, पण चिरंजीवांना भावंडं असण्याची तुमची इच्छा असून ते केवळ या कारणास्तव झाले नाही, असे असेल- तर वाईट वाटले.

(आधीच ठरवून एकाच कन्यारत्नाचा बाप असल्यामुळे आनंदी)
गोपाळ.

वपाडाव's picture

24 Nov 2011 - 3:46 pm | वपाडाव

छान माहिती.....
योग्य प्रकारे संकलित करुन दिल्याने वाचताना भिरभिर न होता थेट पोचल्या गेली आहे.....

वपाडाव's picture

24 Nov 2011 - 4:35 pm | वपाडाव

--

वपाडाव's picture

24 Nov 2011 - 4:36 pm | वपाडाव

टिब्बल झाल्यामुळे....

जर आई +ve बाप -ve, अडचण नाही. पण जर स्त्री -ve व पुरुष +ve असेल तर प्रॉब्लेम येतो

याचा अर्थ आईने बाळासाठी +ve रहाणे कित्ती महत्वाचे आहे ! (विचारात हि अन रक्तातही ....)
असो,
अतिशय महत्वाची माहीती साठी धन्यवाद !

मन१'s picture

24 Nov 2011 - 10:36 pm | मन१

आणि आनंदीबाई अन् गोपाळरावांचा प्रतिसादही आवडला.

शिल्पा नाईक's picture

24 Nov 2011 - 4:11 pm | शिल्पा नाईक

माझ्या मावशीचा रक्तगट -ve होता. तीने दोन्ही बाळंतपणात ते injection घेतलं होत. ते कसलं होत ते तुमच्या मुळे कळल.

साध्या सोप्या भाषेत शब्दबद्ध केलेली माहिती आवडली.
धन्यवाद.

मृत्युन्जय's picture

3 Dec 2011 - 11:03 am | मृत्युन्जय

अतिशय उत्तम माहिती अतिशय साध्या सोप्या शब्दात करुन दिल्याबद्दल धन्यवाद. गचाळ धाग्यांवर सुद्धा उत्तम प्रतिसाद येउ शकतात त्यामुळे सगळेच धागे वाचावे असे वाटु लागले आहे. :)

स्मिता.'s picture

22 Nov 2011 - 5:02 pm | स्मिता.

विशाखा, प्रतिसाद फार आवडला. आज काय पिवून ऑफिसला आलियेस? ;)

विशाखा राऊत's picture

22 Nov 2011 - 5:07 pm | विशाखा राऊत

साधा सोप्पा कडक चहा.. ५ मिनीटात होणारा ;)

स्मिता.'s picture

22 Nov 2011 - 5:56 pm | स्मिता.

आँ?

शाहिर's picture

22 Nov 2011 - 4:24 pm | शाहिर

मुला-मुलींची नाडी बघा ..

माझ पण अगदी हेच म्हणन आहे.काय आहे माझा पत्रिकेवर विश्वास नाही.मी स्वतःच्या लग्नातही पत्रिका बघितली नव्हती.त्यामुळे या बाबतीत मी अगदी अडाणी!तर लोक महा हुशार!
त्यामुळेच हा मंगळ काही मंगलमय होत नाहीये!
इथे काही माहिते मिळेल अस वाटल पण इथे सगळ्यांना 'शुक्राच चांदण' आवडतंय!;)

नाडीचा मिसळ-पावीय ( व्वा !! काय शब्द आहे ...) अर्थ वेगळा आहे हो .

किचेन's picture

22 Nov 2011 - 5:54 pm | किचेन

नाडीला ban केलाय न मिपावर? ऐकून होते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2011 - 6:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी, मंगळ बिंगळ काय नसतं हे वर अनेकांनी प्रतिसादात सांगितले आहेच. दोन इच्छुकांचा स्वभाव जमला आणि आयुष्यात तडजोड जमली की पुरे झालं. देवाच्या नंतर केवळ यांच्याच पत्रिका उत्तम जुळल्या आहेत असे अनेक वधु-वर सापडतील पण त्यांचेही जगणे इतरांप्रमाणेच असते, ग्रहाब्रिहामुळे वेगळे घडते असे काही नसते. पण कुटुंब म्हटले की इतर अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. काही वाईट घडलं की आपण ग्रह तार्‍यांवर भार टाकून मोकळे होतो, यातली एकही गोष्ट काही खरी नसते हे तुमच्याकडे येणार्‍या वर-वधु पित्यांना आणखी चांगल्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगितले तर मंगळवाल्यांच्या पत्रिका सहज जुळतील.

बाकी, ’मंगली दोष और उसके उपाय’शोधायचा आदेश गुगलबाबाला दिल्यावर त्यांनी ही माहिती दिली. :)

आपले जेष्ठ मिपाकर श्री प्रकाश घाटपांडे यांनी ”ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी..प्रश्नोत्तरातून् सुसंवाद” आणि ’ यंदा कर्तव्य आहे’ असं पुस्तक लिहिल्याची आठवण आहे, ते पुस्तक मिळतं का बघा.

आमचा एक जालमित्र म्हणायचा चिखला मातीचे गोळे म्हणजे ग्रह ते आपले काय करणार.

-दिलीप बिरुटे

चिरोटा's picture

22 Nov 2011 - 6:52 pm | चिरोटा

मुला-मुलीला एकमेकांची नाडी ओळखता आली की बास्स. पण मंगळ असणार्‍या मुलाचे मंगळ असणार्‍या मुलीशीच लावून द्यावे असे अनेक वेळा वाचले आहे. मंगळ 'कडक' असल्यामुळे तसे झाले नाही तर वधु/वर पक्षातील जवळच्या व्यक्तीचा मंगळ गेम करतो असेही ऐकले आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

22 Nov 2011 - 6:56 pm | प्रकाश घाटपांडे

कीचेन ताई/ माई/ अक्का
आपण यंदा कर्तव्य आहे हे मिपा वरील भाग वाचावेत

धमाल मुलगा's picture

22 Nov 2011 - 8:04 pm | धमाल मुलगा

काय शॉल्लेट दंगा घातलाय पब्लिकनं. नुसतं आपलं धर की आपट्..धर की आपट! लै लै मज्जा! :D

पण एक लफडं कोणी लक्षातच घेतच नाहीए असं दिसतंय. किचेन ह्यांनी स्वतःचा पत्रिकेवर वगैरे विश्वास नाही हे स्पष्ट केलं आहेच. त्यांच्या व्यवसायाचा भाग म्हणून एखादं चांगलं स्थळ दुसर्‍या स्थळाशी अनुरुप असूनही केवळ काही खर्‍या/खोट्या समजुतींपायी नाकारलं जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करणं हा असणारच की. आता, त्या काही प्रत्येक जोडीच्या पत्रीका घेऊन ज्योतिषांकडे हिंडू शकणं अव्यवहार्य दिसतं. तर मग, लोकांचं सर्वसाधारण शंकानिरसन करण्यासाठी त्यापैकी काही गोष्टींची माहिती करुन घेण्यासाठी त्या इथे मदत मागत आहेत असं दिसतंय. ज्याआधारे त्यांना 'प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्स' शी योग्य रितीने डिल करता येईल. नो बिग डिल भाईलोक्स...

किचेन,
तुम्ही प्रकाश घाटपांडे ह्यांच्याशी बोला ह्याविषयावर. पकाकाकांचा पत्रिकेमुळं अडणारी लग्नं जुळवुन देण्यात हातखंडा आहे.
:)

रेवती's picture

22 Nov 2011 - 9:56 pm | रेवती

किचेन ह्यांनी स्वतःचा पत्रिकेवर वगैरे विश्वास नाही हे स्पष्ट केलं आहेच.
मला हेच म्हणायचय.
किचेनबैंचं स्वत:चं लग्न त्यांनी फक्त अनुरूपता पाहून केलय पण त्यांच्या कामाचं स्वरूप असं आहे की ही माहिती असणं जरूरीचं वाटतय.

विशाखा राऊत's picture

22 Nov 2011 - 9:59 pm | विशाखा राऊत

तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे पण ताईंनीच दंगा घालायला सुरवात केली, मंगळापेक्षा लोकांना शुक्र आवडतो बोलल्या मग काय करणार...

अब बोला तो सुनना तो पडेगा ना :)

परिकथेतील राजकुमार's picture

23 Nov 2011 - 11:19 am | परिकथेतील राजकुमार

मंगळापेक्षा लोकांना शुक्र आवडतो बोलल्या मग काय करणार...

इनो द्यायचे ना ;)

इनोने शुक्रावर फरक पडेल अस खरच वाटत तूम्हाला?

शिल्पा ब's picture

23 Nov 2011 - 11:24 am | शिल्पा ब

हॅ हॅ हॅ...अहो रेवतीआज्जी,
या कीचेनतै खरोखर तै आहेत का, खरोखरंच त्या लग्न जमवायचा व्यवसाय करतात का? का एखादा नविन झगा घालुन इथं कोणी मिरवतंय हे कसं कळणार?

परिकथेतील राजकुमार's picture

23 Nov 2011 - 11:45 am | परिकथेतील राजकुमार

प्वाईंटाचा मुद्दा आहे.

शिनचॅन

मि नविन प्लेट्मधिल शिळि मिसळ आहे अस इथे अनेकंना वाटतय.
का कळेल का? ;?

आनंदी गोपाळ's picture

24 Nov 2011 - 1:46 pm | आनंदी गोपाळ

ष्ट्यांडर्ड सवय आहे ती.
नवा कुणी येऊन बोलू लिहू शकतो यावर यांचा बसतच नाही. मग फुक्काट टोपी उडवणे सुरू होते. तुम्ही आपलं काम चालू द्या. त्यांचा इस्वास बसत नै तर र्‍हाऊ देत हुबा! तुम्ही टेन्शन घेऊ नका.

वपाडाव's picture

24 Nov 2011 - 1:50 pm | वपाडाव

व्वाह !! व्वाह !!
म्हणजे आपणही याच क्याटेगिरीतले म्हणायचे...... असो.... चालु द्या....

मन१'s picture

24 Nov 2011 - 11:31 am | मन१

कशाला कलायला हवं?
माणूस जसाजसा अनुभावी होतो, तसा तसा तो अधिक संशयी,skeptic का होउ लागतो?

ज्योतिश्यांकडे लोक स्वतहाच जातात.पण मुलगि पसंत आहे,फक्त तिला मंगळ आहे/ नाडि एक येते/गुण कमि जुळ्तात/ गण जुळत नाहि आशा लोकांना जरा ४ ज्ञानाचे (आल एक्दच टंकता) सन्गावे यासाथि हा धागा काढ्ला.जेणेकरुन लोकांन माझ म्हणण पटेल.तरि आता अभिशेक -एश्वर्या माझि खुप मदत कर्ताय्त.

अभिशेक -ऐश्वर्या माझि खुप मदत कर्ताय्त

अरे वा !! एकाच वर्षात ..... बरंय बरंय....
तसं काय-काय करतात ही दोघं तुम्हाला मदत करण्यासाठी?

लोक जातात. पण पसंत आहे फक्त तिला मंगळ आहे एक येते, गुण जुळत लोकांना जरा ज्ञानाचे टंकता हा धागा जेणेकरुन पटेल आता मदत

यावेळेस फक्त शुद्ध शब्दच वाचायचे ठरवले आणि असं झालं!

-- तिरशिंग शाळामास्तुरे

अमोल केळकर's picture

24 Nov 2011 - 11:40 am | अमोल केळकर

तुम्ही सरळ ज्यांच्या पत्रिकेत मंगळ आहे अशांचाच ' वधू -वर मेळावा ' भरा. नक्की लग्ने जमतील तिथे :)

अमोल केळकर

मन१'s picture

24 Nov 2011 - 12:21 pm | मन१

सहमत. पण येक शंका:-
मंगल ह्या ग्रहाला असे अ-मंगल का समजतात?
जर मंगळ हा अपशकुक्नी असेल, तर अ-मंगल ह्या शब्दाचा अर्थ शुभशकुन असा व्हायला नको का?

किचेनताईंचा धागा भलताच पॉपुलर झालाय बुवा!! मंगळ रॉक्स!! ;)

अन्या दातार's picture

24 Nov 2011 - 6:23 pm | अन्या दातार

आहे. पण किचेनतैंचा मंगळ भलताच स्ट्राँग दिसतो. टोट्टल पत्रिकेतून फक्त मंगळच रॉकतोय. शुक्र आपला मधुनच थोडी टिवटिव करुन गेला, पण मंगळाची पॉप्युलॅरिटी काय त्याच्या नशिबी आली नाही.

प्रभाकर पेठकर's picture

24 Nov 2011 - 7:23 pm | प्रभाकर पेठकर

शुक्र आपला मधुनच थोडी टिवटिव करुन गेला

'शुक्र', चार लोकांत नाही, एकांतात आपला प्रभाव दाखवतो.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Nov 2011 - 7:36 pm | प्रकाश घाटपांडे

शुक्र', चार लोकांत नाही, एकांतात आपला प्रभाव दाखवतो.

....... न भयम न लज्जा नुसार चारचौघात बी दाखवतो.

सचिन भालेकर's picture

3 Dec 2011 - 12:48 am | सचिन भालेकर

मंगळ ग्रहाच टेन्शन नका घेवु......

दाते पनचान्ग वाचा... २६ रुपयाना भेटत.....

मंगळ ग्रहाच आक्रमक असतो.... नव-यान जर कप फोडला तर बायकोने बशी तरि फोडायला हवी.... नाही तर एकाचे हाल होनार न............... म्हनुन दाते पनचान्ग वाचा... नाय समझलच तर मी सान्गेन.... मी सुध्दा ज्योतिषी आहे.........