'पत्रिका'
'पत्रिका' या विषयाने जेवढ माझ डोक खालालय तेवढ कोणाच खाल्लं नसणार.
खर तर पत्रिका, गुणमिलन, शांती वगैरे गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही.
या सर्व विषयाबद्दल माझ न्यान्ही तोकड्च आहे.पण माझ क्षेत्र अस आहे कि मला ह्याबाबत माहिती करून घ्यावी लागतीये.
यात सगळ्यात जास्त वैताग आणतो तो मंगळ
मंगळ,मंगळाचा प्रभाव, सौम्य मंगळ, मंगळाची शांती, आणि नागबली बद्दल मला माहिती हवी आहे.
शांती केली किवा नागबळी दिला कि मंगळ जातो का?
वैवाहिक जीवनात मंगळाचे दुष्परिणाम काय?
मंगळ फक्त वैवाहिक बाबतीत त्रास देतो कि आणखीनही काही दुष्परिणाम आहेत?
आपणास काही मंगळाचे चांगले -वाईट अनुभव आलेत काय?
(न्यान -हा शब्द कसा लिहावा?)
वाचन
20428
प्रतिक्रिया
0