कसं जगायचं असतं ?
------------------------------------------------------------------------------------------------------------
कष्टातूनच फळ मिळवायचं असतं,
त्यागातूनच बळ कमवायचं असतं,
असंच जगायचं असतं.
निरागस बालकासारखं स्वच्छंद आयुष्य अनुभवायचं असतं,
आणि मग त्याच कोमल चेहेऱ्यावरील
हास्य बनण्याचा प्रयत्न करीत राहायचं असतं,
असंच जगायचं असतं.
झर्याप्रमाणे अवखळ , बेलगाम होऊन फिरायचं असतं,
अन मार्ग कळल्यावर, वेळ आल्यावर
नदीला मिळून संथ वाहायचं असतं,
असंच जगायचं असतं.
चंदनापरी झिजूनही परिमळ देत रहायचं असतं,
वातीपारी जळूनही प्रकाश देत राहायचं असतं,
आणि
जगता जगता मरायचं असतं,
मरुनसुद्धा जगायचं असतं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
महाबळ
प्रतिक्रिया
21 Nov 2011 - 12:08 am | पैसा
तुमची पहिलीच कविता दिसतेय. चांगली झालीय. मिसळपाववर लेखनासाठी स्वागत आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
22 Nov 2011 - 2:11 pm | दत्ता काळे
तुमची पहिलीच कविता दिसतेय. मिसळपाववर लेखनासाठी स्वागत आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा! ... असेच म्हणतो.
22 Nov 2011 - 9:20 pm | महाबळ
तुमच्या अभिप्रायासाठी आणि प्रोत्साहनासाठी धन्यवाद