तुझ्या बरमुडा त्रिकोणा चे आकर्षण....

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
20 Nov 2011 - 10:47 am

तुझ्या बरमुडा त्रिकोणा चे आकर्षण....
...........
तू आहेसच सागरा सारखी.
अथांग,....गुढ
निळेशार.. कधी खवळलेली..
उंच लाटा..कधी शांत.. वरवर..
आत खवळलेली...
खूप खोल..खारट....
आवडत..तुझ्या लाटांवर स्वार व्हायला..
खवळलेल्या विशाल पात्रांत झोकून द्यायला....
अन तिथेच कुठेतरी आहे तो
Bermuda triangle..... बरमुडा त्रिकोण...
अदृश्य..अनाकलनीय, गूढ...
जबरदस्त आकर्षण शक्ती असलेला...
खेचतो मला गलबता सह..आत..आत
विरून जातो मी, बनतो समुद्राचाच एक भाग...
त्या त्रिकोणाचा...विसरतो देहभान...,
मग डोळे उघडतो, अन स्वत:लाच पाहतो..
तुझ्या किना~यावर पडलेला...विवस्त्र..शांत..निपचीत
अविनाश

कविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2011 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वा...! कल्पना मस्तच आहे.

-दिलीप बिरुटे

jaypal's picture

20 Nov 2011 - 11:53 am | jaypal

अशिच एक "त्रिभुज" प्रदेशावर देखिल कविता येउद्या.
बर्मुडा,त्रिकोण ,गोल ई.विषय फार आवडीचे असल्याने सध्या चांदिच्या भांड्यातुन रक्तवारुणी पीऊन उर्ध्वरेताचा आभ्यास चालु आहे. ;-) त्यात आपल्या काव्याने वातावरण निर्मीतेचे काम आगदी चोख केले आहे.

अन्या दातार's picture

20 Nov 2011 - 12:54 pm | अन्या दातार

खपलो.............
फुटलो..............

पप्पु अंकल's picture

21 Nov 2011 - 1:48 pm | पप्पु अंकल

+१

रामदास's picture

20 Nov 2011 - 1:14 pm | रामदास

प्रकाशित केल्यानंतर ही कविता संपादकांनी अप्रकाशीत केल्याचे अंधुक आठवते आहे. पुनश्च ही कविता लिहीण्याचे प्रयोजन काय असावे याचा विचार करतो आहे.

Nile's picture

20 Nov 2011 - 1:27 pm | Nile

त्यांच्या दुष्काळग्रस्त प्रदेशात वणवा पेटला असेल...

प्रास's picture

20 Nov 2011 - 1:31 pm | प्रास

"तत्कालीन आणि सद्यकालीन संपादकांच्या विस्मरणशक्तीवरील गाढ विश्वासाचा प्रत्यय घेण्याचे प्रयोजन"

हे पुरेसं आहे की....

बाकी कविता एकदम 'काकाश्री श्टायली'ची आहे. सॉल्लिड.....

:-)

प्रशांत उदय मनोहर's picture

20 Nov 2011 - 2:50 pm | प्रशांत उदय मनोहर

तुझ्या किना~यावर पडलेला...विवस्त्र..शांत..निपचीत

"त्रिकोण" वाचायचा राहून गेल्यामुळे अनर्थ झाला.

कै च्या कै काय?

प्रशांत किंवा उदय किंवा मनोहर,

शेवटच्या तीन ओळी पुन्हा वाचा

:-)

सन्जोप राव's picture

20 Nov 2011 - 3:27 pm | सन्जोप राव

प्रकाशित केल्यानंतर ही कविता संपादकांनी अप्रकाशीत केल्याचे अंधुक आठवते आहे. पुनश्च ही कविता लिहीण्याचे प्रयोजन काय असावे याचा विचार करतो आहे.
त्या वेळी ही कविता अप्रकाशित का केली असावी आणि ती त्या वेळच्या संपादकीय धोरणांत बसत नसेल तर आता प्रकाशित कशी झाली? संपादक बदलले की धोरणेही बदलतात काय?
बाली कविता आवडली. धीट आणि थेट. याच धर्तीवर आता तुझे दक्षिण आणि उत्तर गोलार्ध, तुझे मालदीव, तुझे थायलंड अशा कवितांची वाट बघतो आहे.

चतुरंग's picture

21 Nov 2011 - 2:04 am | चतुरंग

दक्षिण आणि उत्तर गोलार्ध............. हा हा हा!! खलास!!!

- रंगार्ध

राजेश घासकडवी's picture

21 Nov 2011 - 8:41 am | राजेश घासकडवी

धीट आणि थेट हे पटलं. मात्र या कवितांपासून स्फूर्ती घेऊन गोलार्धांच्या, दरीखोऱ्यांच्या, नद्यानाल्यांच्या, आयलंडच्या भौगोलिक कविताच येतील असं नाही. उदाहरणार्थ मी या कवितेवरून स्फूर्ती घेऊन इथे एक कविता केलेली आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Nov 2011 - 11:13 am | परिकथेतील राजकुमार

'मिपाकडून मचाककडे...' ;)

दि ग्रेट मराठा's picture

21 Nov 2011 - 2:40 pm | दि ग्रेट मराठा

:) :) :) :)

दि ग्रेट मराठा's picture

21 Nov 2011 - 2:45 pm | दि ग्रेट मराठा

र बाला नी हयो जाम चिथालला बोल.
थन्ड झे बाला... हिक्शान कविता लिवाची तू क लीवल्यान रे

धनंजय's picture

21 Nov 2011 - 9:17 pm | धनंजय

मुळीच पोर्नो नाही.

पुन्हा प्रकाशित केली, हे चांगले केले.

मुळीच पोर्नो नाही.

असेच म्हणतो.
वाचणार्‍याच्या 'दिव्य'दृष्टीवर अवलंबून आहे. :)

आत्मशून्य's picture

21 Nov 2011 - 10:46 pm | आत्मशून्य

मग "तुझ्या बरमुडा त्रिकोणा चे आकर्षण...." नंतर आता "माझ्या कूतूबमिनारचे घर्षण..... अथवा दर्शन " यावरही एक कवीता पाडायची विनंती हौन जाऊंदे.

शिल्पा ब's picture

21 Nov 2011 - 11:55 pm | शिल्पा ब

अगदी हेच म्हणायला आले होते, पण तुम्ही खवचटपणे म्हणताय असा भास होतोय मला.

मला स्वत:ला कविता वैग्रे जमत नैत नाहीतर " तुझे गं बाई शिंगोळे लहान कस्से झाले" किंवा " तुझ्या छ्त्रीचा दांडा कुठं गेला" असं कैतरी लिहिलं असतं...प्रतिभावान स्त्रियांनी अशी छानशी कविता लिहुन सगळ्यांची वाहवा मिळवावी हिच इच्छा.

आत्मशून्य's picture

22 Nov 2011 - 5:35 am | आत्मशून्य

खवचटपणे म्हणताय असा भास होतोय मला

खवचटपणे नाही मिश्कीलपणे म्हणत आहे. बाकी माझ्याशी आपण सहमत आहात पाहून बरे वाटलं.

तूम्हा कविता वैग्रे जमत नैची काळजी नको, जे लिहलय ते मस्तच वाटत आहे. काव्य/लिखाण हे असच स्वानूभावर आधारीत (वाटलचं) पायजे याची काळजी यापूढेही घेत चला व ते लोकांना आवडेलच. कारण स्वतःच्या वेदनेला (व आनंदालाही) अशी कवीतेद्वारे मोकळी वाट करून दिल्याने मन तूमच अजून हलकं होइल अशी आशा आहे. तेव्हां ती कूचंबणा सोडा, व काव्य करा. सोबत द्यायला, सांभाळून घ्यायला मिपाकर आहेतच की. तरीही समाधान वाटलं नाही तर मग मी आहेच की लक्ष घालायला. ताबडतोप इथच या धाग्यावर विनंती करा आपण लिहलेल्या ओळींची उरलेली कवीता मीच अशी पूर्ण करून देइन की लोक्स वाह वाह करतील तूमची.

मला वेदना अन कुचंबणा अज्जिबात नै काळजी नसावी...अन असती तरी काळजी करणारा खंबीर आहे.
आता यापलीकडे या विषयात आम्हाला जास्त इमॅजिनेशन करता येत नाही पण तुम्हाला ते जमतंय असं दिसतंय. कृपया कविता पुर्ण करुन जी वाहवा मिळेल ती स्वतःलाच ठेवा....माझी पुर्ण परवानगी आहे.

बाकी लोकांचे त्रिकोण अन अजुन काय काय असेल ते जिथे असेल तिथेच ठीक पण लोकांचा आग्रह पाहुन मी स्त्रियांच्या वतीने म्हणुन आमचं मत दिलं झालं.

आत्मशून्य's picture

22 Nov 2011 - 12:03 pm | आत्मशून्य

मला वेदना अन कुचंबणा अज्जिबात नै काळजी नसावी...

माहीत आहे हो, पण जसा गोर्‍या गालावर काळा तिळ असतो, नसला तर बाळाला तिथे तीट लावली जाते नजर लागू नये म्हणून, अगदी तसच तूमच्या आनंदाला व मूक्त अभिव्यक्तीला नजर लागू नये म्हणून वेदना अन कुचंबणेचा उल्लेख केलाय हो, त्या तूम्हाला असतीलच असा कोणताही दावा इछ्चा व अपेक्षा नाही... किव्हा रसिकांच मन जिंकण्यासाठी तूम्हाला "पेन" अनूभवावा लागेल असा रॉकस्टार चित्रपटातील संदेशही मी देत नाही. बाकी तूमची काळजी घेण्यास आकाशातला देव समर्थ आहेच, मी कशाला ते ओझं माझ्यावरती घ्यायचा साधा विचारही करू ? नाही का ?

पण लोकांचा आग्रह पाहुन मी स्त्रियांच्या वतीने म्हणुन आमचं मत दिलं झालं.

तूमचं मत दिलत ? आदर अजून वाढला बघा तूमच्या बद्दल. पsssssssssण ते प्रांजळ आहे याची खात्री केलीत का, की लोकांचा आग्रह तूमच्या सारासार विचार क्षमतेवर मात करून त्याची निर्मीती घडली आहे याची पडताळणी केली ? लोकांचा मलाही आग्रह आहे म्हणून जर मी माझी सद-सद विवेक बूध्दी बाजूला ठेऊन काहीही खरडू लागलो(काव्य) तर तूम्हाला ते पटेल काय ? मग तूम्ही असा बेजबाबदारपणा कसा काय साधला ? बूआ ?

साती's picture

22 Nov 2011 - 12:10 am | साती

चांगलीय.
अजिबात अश्लील वाटली नाही.
पूर्वी मिपा प्रशासनाने ही काढली होती हे आश्चर्यच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Nov 2011 - 12:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हेच म्हणतो. खरे तर ही कविता तत्कालीन संपादक मंडळींनी अप्रकाशित का केली असावी याचाच विचार करत होतो. त्या भानगडीत सदर कविता ३-४ वेळा वाचून काढली. शेवटची ओळ सोडली तर त्यात अश्लील काय आहे हे नीटसे कळले नाही. आणि शेवटच्या ओळ वाचली तरीही पूर्ण कवितेचा एकच अर्थ निघतो असेही नाही.

"बसवला टेम्पोत"च्या खुराकावर वाढलेल्या मिपाच्या वाचकवर्गाला या कवितेचे वावडे असावे असे वाटत नाही. आणि अश्लीलताच नको असेल तर आत्ता या क्षणी दुसऱ्या एका धाग्यावर जे चालू आहे ते कसे चालते? तिथे तर एकदम डीटेलवारीत चर्चा चालू आहे.

(सदर कविता अश्लील आहे म्हणून तेव्हा उडली नसेल तर संपूर्ण प्रतिसाद रद्दबातल ठरवावा)

पाषाणभेद's picture

22 Nov 2011 - 12:36 am | पाषाणभेद

कविता व चर्चा वाचून आनंद वाटला

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2011 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार

ह्यालाच ' मिपाची प्रगल्भतेकडे वाटचाल' असे म्हणावे काय ?

दत्ता काळे's picture

22 Nov 2011 - 1:32 pm | दत्ता काळे

घरी पानात एखादी भाजी अति मसालायुक्त किंवा खारट असली आणि त्यावर कुणी आक्षेप घेतला तर दुसर्‍याने "फार काही तिखट नाही कि खारट नाही. त्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे?" असं जे म्हणलं जातं ती पण एक प्रकारची प्रगल्भताच आहे. मुद्दा फक्त ह्या लिखाणापुरता नाही. सवयीच्या भागाचा आहे.

मिपाबाहेरच्या अनेक व्यक्तींचे एकूण मत काय असू शकेल ?

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2011 - 2:54 pm | परिकथेतील राजकुमार

त्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे?" असं जे म्हणलं जातं ती पण एक प्रकारची प्रगल्भताच आहे. मुद्दा फक्त ह्या लिखाणापुरता नाही. सवयीच्या भागाचा आहे.

आमच्या सवयी ऐकाल तर चक्कर येऊन पडाल हो :) आमच्यासाठी तर ही बालकविता आहे म्हणालात तरी चालेल.

पण कुठे आणि काय लिहावे ह्याची जाण प्रत्येकाला असायला नको का? देऊळ सगळ्या गावाचे आहे म्हणून चार जण उद्या गुत्त्याची ऐवजी देवळात दारू प्यायला बसले तर चालेल का ? का अशा लोकांना पाठींबा दिला की आपली प्रगल्भता सिद्ध होते असे समजून आपण त्यांना पाठींबा द्यायचा ?

चार लोकांनी नावे ठेवलेल्या गोष्टीचे कौतुक करणे म्हणजे आम्ही किती मॉडर्न आणि मुक्त विचारांचे प्रगल्भ आहोत हे दाखवणे असेल तर बोलायलाच नको. अशा गोष्टींचे कौतुक करणारे सोकॉल्ड प्रगल्भ लोक तात्याच्या 'आजची खादाडी' वरती कसे तुटून पडले होते ते देखील आम्ही पाहीले आहे :)

असो...

दत्ता काळे's picture

22 Nov 2011 - 5:13 pm | दत्ता काळे

परा, मला काय म्हणायचे आहे ते तुझ्या लक्षात आलेले दिसत नाही. मुळात तुझ्या प्रतिसादावर माझा प्रतिसाद असे मुळीच नाही. उलटपक्षी जे तुला जाणवते/ वाटते, तेच मलाही वाटते. माझे म्हणणे आता स्पष्टच लिहितो.

अश्लिलतेकडे झुकू लागलेले लिखाण प्रसिध्द होत गेले कि ते वाचण्याच्या सवयीचा भाग बनू लागेल. (अर्थात संपादकाच्या अधिकारात मी येत नाही). उगाचंच "मला तरी काही पोर्नो वाटत नाही" असे लिहीण्याने एक वेगळी मतावळ तयार होते. अश्लील असणारे लेखन खपून जाऊन पायंडा पडू शकतो. ( म्हणजेच मिपाने वाढलेल्या पानात काही तिखट / खारट असेल तर, " छे.. छे. कुठे खारट आहे , असं म्हणून तेच खाण्याची सवय लागणे मला चुकीचे वाटते ).

कविता वाचतानाच जाणवते कि, हे काहीतरी वेगळ्या वाटेने चालले आहे. पण असे लिखाण असंपादीत रहावे हे जरा खटकले. माझा रोख लेखकावर नाही हे ही लक्षात घ्यावे.

(माझ्या मूळ प्रतिसादातले प्रगल्भतेसंबंधीचे वाक्य उपहासात्मक आहे)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2011 - 5:21 pm | परिकथेतील राजकुमार

अहो काळे साहेब तुमचा गैरसमज होतोय :)

मी फक्त तुमचा प्रतिसाद खांदा म्हणून वापरला हो आमच्या दंबुकीसाठी ;)

गणपा's picture

22 Nov 2011 - 6:26 pm | गणपा

वर दिलेल मत हे गणपा या संपादकाच नसुन गणपा या सामान्य वाचकाच आहे.

सालं हल्ली स्वतःच मत नोंदवायचीही चोरी झाली आहे.

अकुनी स्वतःच्या या कवितेचे रसग्रहण करुन त्याचा भावार्थ इथे टंकण्याचे कष्ट घ्यावेत !

प्यारे१'s picture

22 Nov 2011 - 5:10 pm | प्यारे१

http://www.misalpav.com/node/19791#comment-354301

बर्म्युडा ट्रँगल म्हणजे नुसतीच कल्पना आहे असे गविंनी नुकतेच सांगितले आहे.
कल्पनाविलास थांबवावा. :)
अपघात कुठेही आणि कसेही घडू शकतात असे त्यांचे म्हणणे असल्याचे आढळते. ;) ;)

दादा कोंडके's picture

16 Aug 2014 - 2:39 pm | दादा कोंडके

आवडली.

हस्तर's picture

12 Jul 2019 - 6:40 pm | हस्तर

संपादक महोदय ,हि पण उडवा