चारोळी... ४ओळी

दि ग्रेट मराठा's picture
दि ग्रेट मराठा in जे न देखे रवी...
17 Nov 2011 - 3:28 pm

बस झाले इंग्रजी आता, मराठी बोल घुमुदे...
मुंबईचा कॅलिफोर्निया नको, मराठी मुंबई उरुदे...
चांदयापासून बांदयापर्यंत, ऐकच घोष होउदे...
मराठी बोल मराठी बोल, शिवराज्याभिषेक होउदे...

चारोळ्या

प्रतिक्रिया

मनीषा's picture

17 Nov 2011 - 3:40 pm | मनीषा

चारोळी चांगली आहे ..

पण तुम्हीच म्हणता - बस झाले इंग्रजी आता, मराठी बोल घुमुदे...

आणि तुमचं नाव...?

लीलाधर's picture

17 Nov 2011 - 3:43 pm | लीलाधर

मराठा तीतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा...

मदनबाण's picture

17 Nov 2011 - 3:54 pm | मदनबाण

चांगली आहे चारोळी...
<देवकी पंडीत मोड ऑन> पण ! मुंबईचा कॅलिफोर्निया ? अहो कोकणाचा कॅलिफोर्निया अन् मुंबई चे सिंगापुर /शांघाय असे हवे ! <देवकी पंडीत मोड ऑफ> ;)

बाकी हल्लीच एक बातमी स्टार माझावर पाहत होतो...काही तरी पुण्यात सुरु असलेल्या विज्ञान प्रदर्शन विषयक काही तरी बातमी होती, त्यातील एक जेष्ठ महिला (नाव आठवत नाही आता) मातृभाषेत आपण शिकतो ते पटकन आत्मसात होते (म्हणुनच मराठीत या विषयक प्रसार झाला पाहिजे असे त्यांचे मत होते.) असं सांगत होत्या... इतकच त्या मराठीत बोलल्या नंतर जे काही इंग्रजीत बोलत सुटल्या त्या थांबल्याच नाहीत !
मी विचार केला की यांची मातॄभाषा मराठी ,विज्ञानाचा प्रसार मराठी भाषेतुन व्हावा हा यांचा उद्देश पण इंग्रजी बोलल्या शिवाय यांना ४ शब्द पूर्ण करणे जमले नाही ! वा रे विचारवंत ! ;)

दि ग्रेट मराठा's picture

17 Nov 2011 - 10:07 pm | दि ग्रेट मराठा

"मनीषाताई व मदनबाण आपल्या बहुमुल्य प्रतिक्रियेबद्दल व सल्यांबद्दल धन्यवाद". :)

चाणक्या मित्रा आभारी आहे.

अमोल केळकर's picture

19 Nov 2011 - 12:15 pm | अमोल केळकर

वा वा मस्तच

अमोल