...खरच जमलंय !!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
14 Nov 2011 - 10:25 am

जमलंय मला सावरायला
उसने अवसान आणायला..
आणि उगीचच हसायला...
...खरच जमलंय....

नात्यांच्या ह्या गोत्यातून
स्वताचे भावविश्व आकारायला
सगळ्यांमध्ये असूनहि
सगळ्यांपासून दूर जायला
---खरच जमलंय...

जमलंय डोळ्यांना खरंच
पाणी अडवायला ...
जमलंय शब्दांना खरंच
अर्थ बदलायला ....
त्या पाण्याचे, शब्दांचे कौतुक करायला ...
...खरच जमलंय मला.....

अर्थातली निरर्थकता ......
निरर्थकतेतला अर्थ सांगायला
खरच जमलंय या शब्दांना
कविता सजवायला .....
निखळलेले शब्द मांडायला
आणि वाह वाह मिळवायला

.....खरच जमलंय

कविता

प्रतिक्रिया

विदेश's picture

14 Nov 2011 - 11:17 am | विदेश

जमलीय कविता . आवडली .

सगळ्यांमध्ये असूनहि
सगळ्यांपासून दूर जायला
---खरच जमलंय...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Nov 2011 - 12:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अर्थातली निरर्थकता ......
निरर्थकतेतला अर्थ सांगायला
खरच जमलंय या शब्दांना
कविता सजवायला .....

क्या बात!! मस्तच!!
जमतयं जमतयं!! :)

गार्गी_नचिकेत's picture

14 Nov 2011 - 2:58 pm | गार्गी_नचिकेत

कवीता खूप छान आहे.

जाई.'s picture

14 Nov 2011 - 3:05 pm | जाई.

छान कविता आहे

वपाडाव's picture

14 Nov 2011 - 5:31 pm | वपाडाव

...खरच जमलंय !!

मदनबाण's picture

14 Nov 2011 - 5:47 pm | मदनबाण

खरच जमलंय !!! :)