चुकीचे हिशेब

यश पालकर's picture
यश पालकर in जे न देखे रवी...
11 Nov 2011 - 1:51 pm

मी मांडले हिशेब नेहमी
ते सारे चुकीचे होते

ढाळले अश्रु ज्यांसमोर
त्यांना हे नेहमीचे होते

सोसले घाव सारे ते तर
माझ्या ओळखीचे होते

ना कळले सागर जे
तळ तयांचे खोलीचे होते

आर्त स्वर माझे हे
कधीतरी तुझ्या अंगणीचे होते

दुख कधी ना कळले कुणाला
कारण सारे हे माझ्या मनीचे होते

यशवंत

कविता

प्रतिक्रिया

सोसले घाव सारे ते तर
माझ्या ओळखीचे होते

वा...

यश पालकर's picture

11 Nov 2011 - 2:29 pm | यश पालकर

आभारी आहे!!!

सुहास झेले's picture

11 Nov 2011 - 2:48 pm | सुहास झेले

सुंदर रे... मिपावर स्वागत :)

यश पालकर's picture

11 Nov 2011 - 2:50 pm | यश पालकर

सुझे साहेब तुमच्याच प्रतिसादची वाट पाहात होतो..

प्रभाकर पेठकर's picture

13 Nov 2011 - 7:27 pm | प्रभाकर पेठकर

सुझे साहेब तुमच्याच प्रतिसादची वाट पाहात होतो

ठिक आहे, मग मी प्रतिसाद देत नाही.

यश पालकर's picture

14 Nov 2011 - 12:50 pm | यश पालकर

अस का करता??
रागवु नका असे :)

प्रभाकर पेठकर's picture

14 Nov 2011 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर

छे:....छे:.... राग अजिबात नाही. सहज गम्मत केली.

पण मला वाटतं सुझे साहेब तुमच्याच प्रतिसादची वाट पाहात होतो.. हे 'सुझे'साहेबांना व्यनितुन अथवा खरडवहित कळवायला हवे होते.

आपल्याच काव्यधाग्यावर एखाद्याच्या प्रतिसादाला 'खास' महत्त्व देताना इतरांच्या प्रतिसादाचे मुल्य आपण (नकळत) कमी करीत आहोत हे आपल्या लक्षात यावे अशी इच्छा होती.

'सुझे'साहेब गैरसमज नसावा.

कविता छान आहे. अशाच अजून येऊ द्यात.

यश पालकर's picture

14 Nov 2011 - 2:04 pm | यश पालकर

पुढील वेळेस नक्की काळजी घेईन..
आणी प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!!!! :)

विदेश's picture

12 Nov 2011 - 9:24 am | विदेश

आवडली कविता . आशयपूर्ण आहे.

पैसा's picture

12 Nov 2011 - 10:00 pm | पैसा

अशाच सुंदर आशयपूर्ण कविता येऊ द्यात!