चांदण्यात फिरतांना.....

विनीता देशपांडे's picture
विनीता देशपांडे in जे न देखे रवी...
10 Nov 2011 - 5:01 pm

चांदण्यात फिरतांना........
१)अक्षरचांदण
ती : इतक्या दूर आलास
माझ्या अक्षरवेलीला धरुन,
बघ माझ्या नभातलं
लखलखणारं अक्षरचांदण.
तो: या चांदण्यात न्हाहातांना
डोळाभरुन पाहायच होत तुला.
तू अनेक अक्षरांच टिपूर
टिपलं असेल आजवर
मी माझा टिपूर साठवतोय
मनात-डोळ्यात-सार्‍या देहात.

२) गुलाबी छटा
ती: बघ या चांदण्या हळुहळु
संधिप्रकाशात विरु लागल्या
जणु काही त्याने चांदण्यांना
गुलाबी मिठीत कोंडुन ठेवलय
त्याची छटा सार्‍या आसमंतात
विखुरली आहे..
तो: संधिप्रकाश चोरपावलांनी
तुझा गोरा रंग चोरुन नेतोय
आणि तू चांदण्यात भिजुन
अंग निथळत बसलीस
क्षितीजाच्या किनार्‍यावर.

कविता

प्रतिक्रिया

मस्त .. गुलाबी छटा तर अप्रतिम

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Nov 2011 - 5:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात!! आवडल्या २नी रचना

फिझा's picture

14 Nov 2011 - 4:28 pm | फिझा

मस्त !!! आवडलि कविता !!