सूर्य कुडकुडतोय आभाळात ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
10 Nov 2011 - 11:04 am

[ह्या परदेशात थंडी पडू लागलीय. काल सकाळी सूर्य होता आभाळात. म्हणून सहज ग्यालेरीत जाऊ लागलो नि ह्या भर सूर्य प्रकाशात मी गारठून गेलो. आभाळात एवढा प्रखर सूर्य नि खाली थंडीचा कल्लोळ.मी पटकन शटर बंद केले. नि सूर्याकडे बघून घेतले.अगदी केविलवाणा वाटला सूर्य. त्यावरून सुचले.]

पहाटे पहाटे -१० तापमान
मी घाबरून गेलो थंडीला
नि म्हणालो सूर्याला
नको येउस आज
खूप थंडी पडलीय
गारठून जाशील उगाच
कशी होईल सहन तुला ही थंडी
भीती वाटते
तू असतो नागडा सतत
खेळत बसशील अंगणात
तुझ्या सोबत कोणी नाही
तू अगदी एकटा एकटा
कशी नाहीरे भीती वाटत..?
असे एकटे एकटे
नाही कारे वाटत ..?

ऐकेल तो सूर्य कसला
वाकेल तो असा कसा ..?
निघाला
न सांगताच आपल्या तोर्यात
-१० तापमान
मी सांगत होतो
कुडकुडशील बाळा
पण ,
ऐकेल तो सूर्य कसला
भळ भळून धावू लागला

मात्र थंडी तशीच होती
आपल्यातच घट्ट होती
कटच केला होता तिने
त्याची कोंडी करायचा
त्याचे घोडे झाले होते थंड
जागच्या जागी उधळू लागले
काय करणार बिचारे
तेही थंडीने गारठून थंड

सूर्य जागच्या जागी खिळून होता
थंड थंड पडला होता
मग मीच हिटर चालू केला
नि स्वताला गुंडाळून घेतले जाड रजईत
माझ्याच घरात
मी सुरक्षित

सूर्य उभा आहे खिडकीच्या बाहेर
पूर्ण प्रकाशित
केविलवाणा
म्हणालो
आत ये
थोडेसे लोळून घे
थोडीशी उब घे

पण खिडकी उघडताच
थंडी आत घुसली
कचकचून चावून गेली
काय करू काय करू
झटकन मी खिडकी मिटली

सूर्य उभा आहे खिडकीच्या बाहेर
पूर्ण प्रकाशात
केविलवाणा
वाट बघतोय
माझी खिडकी उघडण्याची
तो असा हिंन दिन
केविलवाणा

कशी उघडू मी खिडकी ..?
दबा धरून बसलीय थंडी
हातात तिच्या थंड बर्ची
डोळ्यात तिच्या
निर्विकार थंडपणा
नि मी असा घाबरून
केविलवाणा .......!!

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Nov 2011 - 12:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कल्पनाविलास आवडला!!

सूर्य जागच्या जागी खिळून होता
थंड थंड पडला होता
मग मीच हिटर चालू केला
नि स्वताला गुंडाळून घेतले जाड रजईत
माझ्याच घरात
मी सुरक्षित

छान !

विदेश's picture

10 Nov 2011 - 10:40 pm | विदेश

थंडी, सूर्य आणि खिडकी वर्णन कमी शब्दात अधिक चांगले झाले असते , असे वाटते.

जयवी's picture

11 Nov 2011 - 1:22 am | जयवी

कल्पना मस्तच !!!!!!!!!!