आपण

यश पालकर's picture
यश पालकर in जे न देखे रवी...
9 Nov 2011 - 2:23 pm

आपण

एकमेकांचा निरोप घेताना लपवले ते भाव आपण
दूर जाताना पुन्हा एकदा जवळ आलो तेच आपण

दाटले मनी जरी गालांवर ना ओघळले
आसवांमध्ये भिजून झालो चिंब ते आपण

आठवणीना दूर लोटुनी पाहतोय भविष्याची स्वप्न
तरीही भूतकाळामध्ये रेगांळूनी अडकलो ते आपण

उष्ण श्वासांनी भरलेले कुठे गेले सारे ते क्षण
गुंतलेल्या श्वासांमधुनी वेगळे झालो ते आपण

वेगळ्या वाटांनी जरी आज चालतोय हे जीवन
हरवलं ते नात शोधतोय तेच ते आपण

यशवंत

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

9 Nov 2011 - 2:26 pm | मदनबाण

छान... :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Nov 2011 - 2:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

वेगळ्या वाटांनी जरी आज चालतोय हे जीवन
हरवलं ते नात शोधतोय तेच ते आपण

हि द्विरुक्ती छान आहे.

उष्ण श्वासांनी भरलेले कुठे गेले सारे ते क्षण
गुंतलेल्या श्वासांमधुनी वेगळे झालो ते आपण

अप्रतिम...
असेच लिहित रहा वाचत आहे..

अवांतर :
मिपावर स्वागत

पियुशा's picture

9 Nov 2011 - 5:20 pm | पियुशा

आजकाल मि पा वर काय छान छान एक से एक कविता येत आहेत
बाकी चालु द्यात :)

यश पालकर's picture

10 Nov 2011 - 1:47 pm | यश पालकर

तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद!!!!

यशवंत