कसे सांग पाय थकले, वाटेतच रंग विटले
श्वासातच माझ्या उतरले घन काळे
हृदय मागते मागते मागते दे रे कान्हा
उन्मळून टाकणारी लखलखती ज्वाला
आर्त माझी हाक जीभ सोलून नटली
हरेक उपकाराबरोबर रात्र-बेरात्र झोपली
सोसण्याचे बळ खिळ्यासारखे ठोकताना
कान्हा चोरशील का ह्या अस्तित्वाचा काला?
हे काही स्वर डोळ्यांमध्ये राहिलेले
स्वप्नांचे अनौरस क्षण त्यांच्यामागे वाढवलेले
आशिषांच्या भोगतो घडाभर जखमा
कान्हा माझ्या झोळीत एक सुदर्शनी शिवी घाला!
---- ह्या चारुकेशी बरोबर वाचा ------