माझी आयुष्यातली सर्वात मोठी चुक...
मी तुझ्यावर निस्सीम प्रेम केलं...
पण तरीही दगा दिलास तु....
माझं आयुष्यंच, उध्वस्त झालं....
तु केलं ते चांगलं केलंस...
पण मला ते पचवणं कठिण गेलं...
शांतपणे चालणार्या माझ्या आयुष्यात...
एक विनाशकारी वादळ निर्माण झालं...
खुप प्रयत्न केला तुला विसरण्याचा...
पण तुला विसरणं कठीण आहे...
कारण तु दिलेली विश्वासघाताची जखम...
ह्रुदयात ताजी अजुन आहे...
पण मी मरणार नाही तुझ्यावाचुन...
नवी स्वप्ने मला सुध्दा पाहता येतात...
कारण लक्षात ठेव...
काळाच्या ओघात...सगळ्या जखमा भरुन येतात...
सगळ्या जखमा भरुन येतात...