संस्कार भारती रांगोळी काढताना मध्यभागी कोणते डिझाईन काढावे असा नेहमी प्रश्न पडतो. मध्यभागी गणपती किंवा स्वस्तिक चे डिझाईन खूप सुरेख दिसते. माझ्या काही संस्कार भारती मधील गणपती डिझाईन आणि फ्री हेन्ड डिझाईन माझ्या मिपाव वरच्या मैत्रीणीना नक्कीच उपयोगी पडतील. :) या डिझाईन अत्यंत सोप्या आहेत. संस्कार भारती रांगोळी मध्ये किंवा देव घरात काढता येतील. गोपाद्मांचा गणपती, मोराचे स्वस्तिक, शंख देवघरात सुरेख दिसतात.
प्रतिक्रिया
4 Nov 2011 - 9:52 am | जाई.
उत्तम
4 Nov 2011 - 12:59 pm | दीप्स
मस्त गं पुनम छान आहेत डीझाईन !!
4 Nov 2011 - 2:11 pm | वपाडाव
तिसर्या फटुतील वरच्या उजव्या कोपर्यातला स्वस्तिक मोर तुम्ही एका रांगोळीत दाखवलेला आहे का?
4 Nov 2011 - 2:29 pm | परिकथेतील राजकुमार
माजघरात, शयनघरात, नहाणीघरात काढायच्या रांगोळी डिझाईन्सची वाट बघत आहे.
4 Nov 2011 - 5:40 pm | मराठमोळा
पर्या...
_/\_
=))
4 Nov 2011 - 8:24 pm | चतुरंग
त्या आपल्या आपणच तयार करायच्या असतात! ;
(रांगोळीप्रेमी) रंगोळी
4 Nov 2011 - 11:20 pm | चेतन सुभाष गुगळे
<< माजघरात, शयनघरात, नहाणीघरात काढायच्या रांगोळी डिझाईन्सची वाट बघत आहे. >>
शयनघरात तुम्ही रांगोळी काढता? का बुवा?
5 Nov 2011 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार
कहर !
अतिशय संतुलीत प्रतिसाद आहे हा ;)
अहो गुगळे साहेब खर्या रांगोळ्या तिथेच काढायच्या असतात.
तुम्ही म्हणजे ना... सगळे माहिती असते पण विनयशील स्वभावामुळे दाखवत नाही तसे.
4 Nov 2011 - 5:07 pm | दत्ता काळे
छान रांगोळ्या आहेत.
अवांतर : माझी चित्रकला बरी होती. लहानपणी माझ्या गावी ( खेडेगांव होतं ते ) लोकांच्या देवघरात गेरू ( काव ) च्या रंगाने शुभचिन्हे काढून देण्याचे मला काम मिळे. आवड असल्याने मी ते आनंदाने करी. ते काम देवदेवाच्या महिन्याच्या ( चातुर्मास ) सुरवातीला करावे लागे. त्या बदल्यात बर्याच वेळा लोक मला "मुंज मुलगा जेवायला घालण्याचे निमित्त साधून" जेवायला बोलावित असंत.
4 Nov 2011 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार
ब्राह्मण का तुम्ही ?
तरीच....
4 Nov 2011 - 7:49 pm | रेवती
माजघरात, शयनघरात, नहाणीघरात काढायच्या रांगोळी डिझाईन्सची वाट बघत आहे.
ही हलकी फुलकी गंमत म्हणून छानच परा!
पण कृपया जातीयवादी प्रतिसाद गंमत म्हणून देवू नयेस असे सुचवते.
त्यातून दंगा सुरु झाला तर यावेळी तुला मदतीला बोलावणार हे नक्की!
5 Nov 2011 - 11:15 am | परिकथेतील राजकुमार
आब्जेक्शन हाय आपले ह्याला.
जात विचारणे ह्या प्रकाराला जातीवादी कसे म्हणता येईल ?
रेशनकार्ड, मतदार कार्ड, शाळेचा दाखला, पासपोर्ट, विविध शासकीय परिक्षांचे / नोकरीचे अर्ज सगळी सगळीकडे अगदी छापील स्वरुपात जात विचारलेली असते. मग मी आपले प्रेमाने मिपावर नुसते विचारले तर मी जातीयवादी कसा ? :( हा अन्याव आहे !
परुराम गोडसे
'मिपाचे नि:ब्राह्मणीकरण झाल्याशीवाय तळागाळातील सदस्यांना न्याय मिळणार नाही' ह्या आमच्या मताला पुन्हा एकदा पुष्टी मिळालेली आहे.
परादास आठवले
पुन्हा अशी विधाने मिपावर झाल्यास मिपावर दंगली पेटतील ह्याची मिपा प्रशासनाने नोंद घ्यावी.
पराज ठाकरे
9 Nov 2011 - 9:17 pm | रेवती
तुझ्यासमोर ना, बोलायचीच सोय नाही बघ!;)
4 Nov 2011 - 5:32 pm | दत्ता काळे
झाली कां रांगोळ्या काढायला सुरवात ?
तुमच्याच पंक्तीत बसणार आहे मी.
4 Nov 2011 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार
मी बामणद्वेष्टा माणूस आहे.
तुम्ही आपले आमच्या संघवाल्या विजुभौं बरोबर जेवणाचा लुत्फ उठवा.
4 Nov 2011 - 5:59 pm | दत्ता काळे
म्हणजे मी संघवाल्यांबरोबर जेवणाचा लुत्फ उठवंत नाही. बरं बरं ..
4 Nov 2011 - 6:23 pm | कच्ची कैरी
सगळ्याच रांगोळ्या मस्त आहेत ,वाचनखुण म्हणुन साठवुन ठेवते .
4 Nov 2011 - 6:31 pm | अमोल केळकर
सुंदर :)
अमोल केळकर
4 Nov 2011 - 7:46 pm | रेवती
गणपतीच्या रांगोळीचे सगळे प्रकार आवडले. सोपेही वाटले.
शेवटच्या रांगोळ्या काढण्यासाठी मला सरावाची आवश्यकता आहे.
5 Nov 2011 - 4:48 am | पुष्करिणी
सुंदरच आहेत सगळी डिझाइन्स.
संस्कार भारतीच्या रांगोळ्यांचं टेक्निक इथे समजावून सांगू शकाल का?
5 Nov 2011 - 5:15 am | शिल्पा ब
छानच. हाच नाही तर सगळे धागे.
टीकल्यांचे डीझाईन कसे करतात याचा एखादा धागा जमेल का?
5 Nov 2011 - 10:51 am | मदनबाण
सुंदर... :)
गोपाद्मांचा गणपती विशेष आवडला. :)
(कला प्रेमी)
9 Nov 2011 - 7:56 pm | प्राजु
सुंदर!!
10 Nov 2011 - 11:07 am | जागु
पुनम खुप सुंदर आहेत डिझाईन्स.