स्वगत
विरघळलेल्या आशेमधून
माझ्यातलं मी पण उठून
उभ राहिलं-मला म्हणालं
असच जाउ देते मला
तळहातावर घेउन बघ
तळहातांवरच्या रेषांमधून
माझ प्राक्तन मला शोधत
मनात आलं-मला म्हणालं
असच जाउ देते मला
डोळ्यात साठवून बघ
डोळ्यातले स्वप्न दडलेल्या
विचारांमधून वाट काढत
ओठावर आलं-मला म्हणालं
असच जाउ देते मला
एकदा नवा श्चास घेउन बघ
घुसमटलेल्या श्वासांमधून
उसासे बाहेर पडले तळमळत
मला म्हणाले-केव्हा पासून या
मोकळ्या आकाशाची वाट बघत होतो.
प्रतिक्रिया
3 Nov 2011 - 6:35 pm | पैसा
मिसळपाववर स्वागत. तुमची कथाही असाच काहीसा आशय व्यक्त करणारी वाटली. आणखी जरूर लिहा!
3 Nov 2011 - 6:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावर स्वागत आहे. आणखी जरुर लिहा.
-दिलीप बिरुटे