आता अनोळखी होऊन गेलो आहोत आपण.. तुझा स्पर्श झालेली मी, माझा स्पर्श झालेला तू.. आणि आपला स्पर्श झालेले ते सगळे..
आता आहेत त्या फक्त आठवणी..
आधी.. सकाळी उठल्यावर पहिला फोन तुला.. जेवायच्या वेळेस फोन.. सन्ध्याकाळी फोन.. झोपण्यआधी फोन..
आता.. तुझ्याशी फोन वर बोलुन ८ महिने झाले.. ते हि बळजबरीचे बोलण..
तेव्हा.. रोज chatting.. खूप busy असलेल्या दिवशी सुद्धा missed call देवून.. वेळ ठरवून chatting..
आता.. शेवटचा mail कधी आला तुझा ते सुद्धा आठवत नाहिए..
आणि chatting?? बोलणच खुण्टलय तर कसल chatting??!!??
काय म्हणायच त्याला? जे पुर्वी होत? प्रेम? नाहिच.. अस विसरत का कोणी प्रेम? ती होती एक चूक.. तू केलेली, आणि तुझ्या प्रेमाखातर मी ही केलेली..
"मी तुझ्याशी बोलल्याशिवाय नाही राहू शकत ग.. "
"तुझा mail आला ना कि एकदम माझे डोले लकाकतात.. i feel much better..i donno why पण एकदम relaxed वाटत.. कितीही रुसलीस ना तरी mail करत जा.. "
"plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.."
गेल ते सगळ..
आता उरल्या त्या सगळ्याच्या आठवणी आणि.. आणि हे..
"i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.."
wowww!!!
-----------------------------------------------------------------------------------
"आता आठवताहेत.." कवितेसाठी संदीप खरे चे आभार..
आणि हे इकडुन घेतलेल आहे.. माझा ब्लॉग..
प्रतिक्रिया
4 Jun 2008 - 12:46 pm | फटू
भाषाशैली ओघवती आहे....
दुर्दैवाने, "i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.." हे वाक्य आज "कॉमन" झालं आहे... अगदी शाळेतल्या पोरांपासुन ते अभियान्त्रीकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधुन शिकणा~या "मॅच्युअर्ड" युवा पीढीपर्यंत...
बाहेरच्या दुनियेचं नाही माहीती बाबा आपल्याला... बाहेरच्या प्रेम प्रकरणांना तेव्हढा "एक्स्पोजर" नाही मिळाला... (मला खरं तर प्रेम प्रकरणाऐवजी लफडी म्हणायचं होतं :D )
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
4 Jun 2008 - 1:22 pm | मनस्वी
झालं तर मग..
त्याच्या नजरेत काय किंमत आहे हे कळलं ना..??
'जब वी मेट' पाहिला नाहीये का लेखाच्या नायिकेने.. नसेल तर आधी पहायला सांग!
त्या माकडापेक्षा हजार पटीने चांगला सोलमेट मिळेल तिला - असा माझा निरोप दे तिला! :)
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
6 Jun 2008 - 11:01 pm | गिरिजा
पाहिला .. बर, पुढे?
म्हणजे, मला संदर्भ लागला नाही बर.. म्हणुन विचारतेय..
माझ्यासाठी, २ तास टाईमपास सोडुन काहीच नव्हत, त्या पिक्चर मध्ये.. नायीकेच वागण तर पूर्णच illogical वाटल मला..
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
4 Jun 2008 - 1:42 pm | प्रभाकर पेठकर
तुझ्याशी फोन वर बोलुन ८ महिने झाले.. ते हि बळजबरीचे बोलण..
कथानायिकेला मान्य आहे की आपण त्याच्याशी फोनवर बोललो तेही ८महिन्यांपूर्वी आणि त्यातही (आपल्या बोलण्यात) प्रेम नव्हतेच होती ती बळजबरी.
शेवटचा mail कधी आला तुझा ते सुद्धा आठवत नाहिए..
८च महिन्यात शेवटचा मेल कधी आला होता हेही विस्मरणात गेल्यामुळे खरेच ८ महिन्यांपूर्वी कथानायिकेचे नायकावर प्रेम होते का हा प्रश्न संभवतो.
आणि तुझ्या प्रेमाखातर मी ही केलेली.(चूक)
कारण काहीही असले तरीही आपलीही चूक झाली हे कथानायिका मान्य करते आहे.
"कितीही रुसलीस ना तरी mail करत जा.. "
"plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.."
म्हणजे प्रेमकालावधीतील नायिकेच्या रुसण्याचे आणि चिडण्याचेच प्रसंग अधिक दिसताहेत/आठवताहेत.
ह्या सर्व पार्श्वभूमीवर खालील प्रतिसाद नायकावर अन्यायकारक वाटतो.
त्याच्या नजरेत काय किंमत आहे हे कळलं ना..??
त्या माकडापेक्षा हजार पटीने चांगला सोलमेट मिळेल तिला - असा माझा निरोप दे तिला!
एकतर्फी मांडलेल्या कैफियतीवरून नायकाला एकदम माकड संबोधणे अन्याय्य वाटते.
4 Jun 2008 - 2:42 pm | मनस्वी
"तुझा mail आला ना कि एकदम माझे डोले लकाकतात.. i feel much better..i donno why पण एकदम relaxed वाटत.. कितीही रुसलीस ना तरी mail करत जा.. "
"plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.."
"i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.."
ही नायकाची २ वाक्ये मला परस्पर टोकाची वाटतात.
म्हणजे नायिकेकडून काही प्रयत्न होत होते का..?
अशी लुटुपुटुची तर हजारो भांडणे होतात.. चिडणे - समजावणे यातही मजा असते.
त्यामुळे असेही थेट म्हणता येणार नाही की -
आणि ते प्रेम होतच यावरही ठाम मत नाहीये. पण नायिकेला त्याची आठवण होतीये.. कुठेतरी आतून काहीतरी वाटतंय..
चूक दोघांची असेलही किंवा नसेलही.. प्रेम असेलही किंवा नसेलही..
'माकड' शब्दात काही गैर मला वाटत नाही. सांगायचा उद्देश - त्याच्या वागण्याने जो मानसिक त्रास झाला.. किंवा जो असा मानसिक त्रास तुला होतोय हे पाहू शकतो.. त्याच्यासाठी खंत करू नकोस.. नवीन जीवनाची आशा ठेव.
हो.. आणि काका म्हटले तसे ही बाजू जर एकतर्फी असेल तर लेखिकेने दुसरी बाजूही स्पष्ट केल्यास आवडेल.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
4 Jun 2008 - 4:37 pm | प्रभाकर पेठकर
"तुझा mail आला ना कि एकदम माझे डोले लकाकतात.. i feel much better..i donno why पण एकदम relaxed वाटत.. कितीही रुसलीस ना तरी mail करत जा.. "
"plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.."
"i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.."
ही नायकाची २ वाक्ये मला परस्पर टोकाची वाटतात.
मान्य. वाटतात नाही आहेतच ती परस्पर टोकाची. पण ह्या दोन मनस्थितींमध्ये काय 'रामायण' घडलय ते कुठेच स्पष्ट केलेले नसताना फक्त नायकाला दोषी धरुन नायिकेला सहानुभूती दाखवायची हे चूकीचे आहे.
now will u plz stop ths
म्हणजे नायिकेकडून काही प्रयत्न होत होते का..?
काहितरी गंभीर बेबनाव घडल्यानंतर मुळ मुद्दा डावलून जर वरवरची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न नायिकेने केला असेल तर अशा परिस्थितीतही नायकाचे असे उद्वेगजनक वाक्य येऊ शकते.
"plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz..
अशी लुटुपुटुची तर हजारो भांडणे होतात.. चिडणे - समजावणे यातही मजा असते.
त्यामुळे असेही थेट म्हणता येणार नाही की -
नायिकेच्या रुसण्याचे आणि चिडण्याचेच प्रसंग अधिक दिसताहेत/आठवताहेत.
पण कथानक इतके त्रोटक आहे की नायिका वारंवार का चिडते, रुसते आहे हे स्पष्ट होत नाही. सतत नायिकेने रुसावे आणि नायकाने समजूत काढावी अशी एकतर्फी अपेक्षा का? हा नायकावर अन्याय नाही का? लुटूपुटूच्या भांडणात दोघांनाही रूसण्याचा/चिडण्याचा समान हक्क असावा. कथेत तो दिसत नाही. सततच्या रुसण्या/चिडण्याला लुटूपुटूचे म्हणणे म्हणजे स्वतःच्या आत्मकेंद्रित वागण्याला नायिकेने लाडात गोंजारल्यासारखे वाटते. नायकाच्या भावनांची इथे कदर केलेली दिसत नाही. (कथानक त्रोटक आणि एकतर्फी असल्यामुळे)
....पण नायिकेला त्याची आठवण होतीये.. कुठेतरी आतून काहीतरी वाटतंय..
नायिकेचे हे मनोगत (मनातील विचार हो, बाकी काही नाही) असल्यामुळे 'तिला आठवण होते आहे हे' हे तिने व्यवस्थित मांडले आहे. (नाहीतर सहानुभूती कशी मिळेल?) पण ह्याचा सोयीस्कर अर्थ 'नायकाला आठवण होत नाही 'असा घेऊ नये. पुरूषांनाही अयशस्वी प्रेमाचा सल जन्मभर असतो.
'माकड' शब्दात काही गैर मला वाटत नाही.
माकडे अर्थहिन चेष्टा, चाळे करतात. नायकाचे (आणि फक्त नायकाचेच?) प्रेम म्हणजे अर्थहिन चेष्टा, चाळे कसे बरे ठरतात? लेखाची सुरुवात दोघांच्या नात्यातील असीम तीव्रता दर्शक आहेत. म्हणजे तेंव्हा 'प्रेम' होते असे समजायला वाव आहे.(दोघांचेही एकमेकांवर) पुढे काही कारणाने दुरावा निर्माण झाला. दुराव्याचे कारण, घटना कुठेच ओझरतीही दिलेली नाही. कथा नायिकेचे मनोगत असल्यामुळे त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून केलेल्या विश्लेषणाचा अभाव आहे. अशा वेळी फक्त नायकाला 'माकड' संबोधणे मला तरी फार गैर वाटते.
त्याच्या वागण्याने जो मानसिक त्रास झाला.. किंवा जो असा मानसिक त्रास तुला होतोय हे पाहू शकतो.. त्याच्यासाठी खंत करू नकोस.. नवीन जीवनाची आशा ठेव.
नायिकेचे वागणे कुठे चुकले आहे का? हा दुरावा कुठे तिने स्वतःच ओढवून घेतलेला नाही नं? ह्या बाबी स्पष्ट नसताना त्याच्या वागण्यानेच नायिकेला त्रास होतो आहे असे का बरे गृहीत धरावे? त्याला होणार्या मानसिक त्रासाचा उल्लेखही कुठे नाही (कारण हे नायिकेचे मनोगत आहे) पण ह्याचा अर्थ त्याला काही मानसिक त्रास झालाच नसेल/होतच नसेल असे का समजावे? विभक्त होण्याचा निर्णय 'त्याचा' आहे असे नायिकेने सूचीत केले आहे. कारणे दिलेली नाहीत्.पण सुरुवातीच्या वाक्यांवरून जो नायक इतके निस्सीम प्रेम करीत होता तो ह्या विभक्त होण्याच्या निर्णयाला पोहोचला तेंव्हा ह्या प्रक्रियेत त्याला काहीच क्लेश झाले नसतील असे कशावरून. उलट एवढे प्रेम करूनही नायिका काही चुकिचे वागत असेल (ही एक शक्यता मी विचारात घेतो आहे) तर त्यालाही वैफल्ल्याने ग्रासले असेल. आणि 'जी मुलगी तुला एवढा मनःस्ताप देते आहे, आणि तुला होणारा हा त्रास पाहू शकते आहे तिच्या साठी खंत करू नकोस. नवीन जीवनाची आशा ठेव' असा सल्ला कोणी दिला असण्याचीही शक्यता आहे.
चर्चा बरीच झाली. माझा मुद्दा फक्त इतकाच आहे, एकतर्फी लिखाणावरून नायकाला दूषणे देऊ नका. त्याचीही काही बाजू असू शकते.
(अवांतरः 'ठळक' आणि 'साध्या' अक्षरांच्या सूचना नीट पाळल्या जात नाहीएत. म्हणून अर्ध्या भागात रंगांचा वापर करावा लागला. संबंघित अधिकारी इकडे लक्ष देतील काय?)
15 Jun 2016 - 4:20 pm | मराठी कथालेखक
आजकाल मिपावर रंगांचा वापर फारसं कुणी करताना दिसत नाही..पुर्वी छान रंगपंचमी चालायची असं दिसतंय
4 Jun 2008 - 3:08 pm | गिरिजा
"things change.. people change" हे जर मान्य केल तर मग प्रश्नच उरत नाहीत..
मनस्वी..
लेखिका मीच आहे बर.. :) माझ्याच ब्लॉग वरुन उचलुन इकडे टाकलय..
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
4 Jun 2008 - 4:00 pm | ऋचा
असेल ही त्यांच प्रेम एकमेकांवर पण परीस्थितीने त्यांना दूर जायला भाग पाडलं असेल.
त्यांची काहीतरी मजबूरी असेल, कदाचित "आंतर जातिय" वैगरे...
त्या दोघांना पटलेलं असेल पण चिडचिड कोणावर करणार आपल्याच माणसावर्,तोडून कोणाला बोलणार आपल्याच माणसाला म्हणून कदाचित ही वाक्य--
आता.. तुझ्याशी फोन वर बोलुन ८ महिने झाले.. ते हि बळजबरीचे बोलण..
"i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.."
स्वगत बोललेली असु शकतात.
एकमेकांना दाखवायच असेल की 'तुझ्याशिवाय मी राहु शकते'
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"