नमस्कार!

पुरणपोळी's picture
पुरणपोळी in काथ्याकूट
16 Oct 2007 - 10:38 pm
गाभा: 

मंडळी मी मिसळपाव वरील नविन सदस्य. सदस्य बनण्या आधी पाहुणी म्हणुन
अधुन मधुन भेट देत होते पण मजा नाहि... आता या खमंग रश्यात पहिजे तशी डुबकि मारता येईल!

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

16 Oct 2007 - 10:44 pm | प्रमोद देव

सुस्वागतम(सासुगतम नव्हे!!!!!!!)

विसोबा खेचर's picture

17 Oct 2007 - 12:05 pm | विसोबा खेचर

पुरणपोळीचं मिसळपाववर मनापासून स्वागत! मला पुरणपोळी खूप आवडते! :)

तात्या.

सहज's picture

17 Oct 2007 - 12:13 pm | सहज

आता सदस्य आहत तर झकास बेत होऊन जाऊ दे लवकर.

डुबक्या पाहीजे तितक्या मारा पण अधूनमधून एक गरमागरम पुपो खिलवायची बर का!

स्वागत!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Oct 2007 - 3:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तेव्हा जरा गोड धोड होऊ द्या बॉ ! म्हणजे ललित, कविता, लघूकथा,कांदबरीचे क्रमश लेखन, मराठी शुद्धलेखन काळाची गरज असे किंवा ( जगण्याच्या पुर्वपिठीका ;) ) वगैरे वगैरे इत्यादी ! :)

मिसळपावच्या हॉटेलात आपले स्वागत आहे.

अवांतर ;) ए पो-या टेबलवर फडकं मार अन एक मिसळ दे :) आजच्या दिवस पैसे नक्को घेऊ ! माझ्या खात्यावर लिहून ठेव !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुरणपोळी's picture

17 Oct 2007 - 10:47 pm | पुरणपोळी

होणार ..झक्कास बेत होणार्..जरा कुर् डई तळते, कटाची आमटि बनवते, बटाट्याची भाजी करते..
मग करु पंगत..

राजीव अनंत भिडे's picture

18 Oct 2007 - 12:36 am | राजीव अनंत भिडे

जरा कुर् डई तळते, कटाची आमटि बनवते, बटाट्याची भाजी करते..
मग करु पंगत..

वा वा! पुरणपोळी, तुमचा बेत छानच आहे. कुरडई, कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी! वा वा वा!

थांबा, इतक्यात पानं घेऊ नका. सगळ्यांना बोलावतो पंगतीला आणि मुख्य म्हणजे आमचे तात्या जागेवर दिसत नाहीत, त्यानाही बोलावतो मग सर्व मिसळपावकरांची पुरणपोळीच्या पक्वान्नाची करू एक जोरदार पंगत! ;)

राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.

लबाड बोका's picture

18 Oct 2007 - 5:53 pm | लबाड बोका

वा

छान वास सुठलाय
तोंडाला अगदी पाणी सुटलय

जरा दोन तीन दिवसांनी पंगत ठेवा
सध्या नेमके नवरात्राचे निर्जळी उपवास चालु आहेत

जगदंब !जगदंब !जगदंब !जगदंब !

(उपाशी ) बोका

आजानुकर्ण's picture

18 Oct 2007 - 6:07 pm | आजानुकर्ण

पुरणपोळीबरोबर बटाट्याची भाजी खातात का बॉ?

पुरणपोळी's picture

18 Oct 2007 - 7:58 pm | पुरणपोळी

कर्णा..अरे काय हे.. येच पगंतिला..म्हन्जे तुला कळेल कशाशि काय खायच ते..

देवदत्त's picture

18 Oct 2007 - 10:28 pm | देवदत्त

स्वागत आहे... :)