टिपः माझी एक कविता एका महाभागाने चोरुन चक्क आपल्याच नावाने चेपुवर प्रकाशित केली आणि ती नेमकी माझ्या मित्राने पाहीली आणि मला कळवले. ते बघुन असा संताप आला आणि ही कविता सुचली. जरा अतिशियोक्तीच झाली आहे, पण भावनेच्या भरात......... ;)
चोरून चोरून तुम्ही चोरणार किती
आहे अस्सल हिरा इथे माझिया हाती
चोरून काय साधले तुम्ही शब्द माझे ?
उजळल्याविना राहील का प्रारब्ध माझे ?
आहे अजूनही लेखणीला माझ्याही धार
येतो सरसावूनी शब्दांना अजूनच खुमार
चोरलेल्या शब्दांचीच तुम्हा बसेल चपराक सणसणीत
अस्खलित नाणे माझे वाजेल नेहमीच खणखणीत
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२९/१२/२०१०)
प्रतिक्रिया
1 Nov 2011 - 9:29 am | फिझा
वाह !! छान चिडला आहात !!!!
1 Nov 2011 - 9:44 am | किसन शिंदे
कोण रे कोण तो महाभाग??
1 Nov 2011 - 12:46 pm | अज्ञातकुल
बडे खुबीसे लिखा है भाई. :)
1 Nov 2011 - 3:39 pm | वपाडाव
लहानपणी आम्ही चोर पोलिस खेळायचो...
त्यात मी नेहमी चोर बनयचो...
पोलिसांच्या हातावर तुरी देउन पळुन जायला मज्जा यायची....