पहाटे पहाटे फिरायला जाताना
मला ह्या पोरी ,बाया दिसतात
पाठीवर झोळी नि हातात तारेचा हूक
[वारसाहक्काने त्याना मिळाला असतो हा ठेवा ]
कचरा कुंडीत काहीतरी शोधीत बसतात
ह्या शोधत असतात
प्ल्यास्टिकच्या बाटल्या ,
कसली कसली फेकलेली खोकी
विजेची वायर
काय नि काय
काहीतरी निराळेच मिळाले तर
आनंदात असतात
मी चालत असतो खरपूस वेगाने
वाढलेली चरबी ,पोट संतुलित ठेवण्यास
आणि घरी जाऊन
मला चहा प्यायचाय हे देखील विसरत नसतो [!!]
आणि ह्या माझ्या मागून पुढे जातात भन्नाट वेगाने
दुसर्या कचरा कुंडीच्या शोधांत
कचरा चिवडित बसतात
विस्कटून टाकतात सगळा कचरा
रस्त्यावर घाण करून जातात
काहीतरी मिळेल ह्या आशेने
खूप काहीतरी शोधीत बसतात
टीचभर पोटासाठी
कोठल्या कुणास ठाऊक घरासाठी
काहीतरी शोधीत बसतात .....!
कधीतरी जळेल का पणती ह्याच्या खोपटासमोर
एखादा लवंगी सर ,
एखादा फुसका फटाका
आकाश कंदील
परवाच दिसली एक पोर कचरा कुंडीत
न जळलेला फटाका शोधताना
चिवडत बसली कचरा
मिळाला एक फटाका
लक्ष्मी बोंब
अर्धवट जळक्या तुनतुनतारा......
नि फेकलेला फराळ
केवढी उजळली दिवाळी तिच्या चेहर्यावर [?]
नुसतां आनंद ओसंडून गेला तिच्या
सावळ्या डोळ्यात ...
चला आजचा दिवस दिवाळीचा
उद्या माहित नाही
कुठला काळोख चिवडित बसणार ..???
प्रतिक्रिया
29 Oct 2011 - 8:25 pm | इंटरनेटस्नेही
वा! वा! चान!! चान!!
29 Oct 2011 - 10:46 pm | अविनाशकुलकर्णी
एकदम समाज वादी कविता............
3 Nov 2011 - 12:28 pm | फिझा
नविन विशय अहे .....पण कविता ??? या विशयवर ??
4 Nov 2011 - 9:37 am | पियुशा
मस्त हो :)