निरोप घेता घेता
उंच उडणारे विमान बघता बघता
ती हलकेच
डोळ्यातला थेंब
पुसत म्हणाली
आभार, परत कधी ..?
एखादे पत्र ,एखादा मेल
नाहीतर नेटवर बोलणे
नि ती उगाचच हसली
बेफिकीरपणे म्हणाला ,
कधीपण बोलू शकतो
कधीपण लिहू शकतो
बोलायला लागते काय ..?
लिहायला जाते काय ..?
फक्त की-बोर्ड बदडीत बसेन
एक एक आठवीत बसेन
काही हे क्षण
काही ते क्षण
काही नाजूक आठवणी
हे नि ते
आठवणीच्या झाडावर
मस्त मी झुलत बसेन
[नि तोही खोटे हसून गेला होता
शप्पत ...!!
तो देखील भिजला होता]
आठवण आली की भेटू शकतो
नेटवर बोलू शकतो
अख्खा सगळा दिसू शकतो
तेवढेच एक बरे आहे
काहीका असेना
हा छान भास आहे
मग हलकेच कुजबुजला
[गच्च असा दाटून आला ]
तू नुसती आठवली
की मनमात्र व्याकुळ होते
तुझ्या आठवणीत
मन माझे
हरवून जाते .....
मी येथे नि तू तेथे
हे खूप अवघड असते
मग सगळे खोटे वाटते ...
आयुष्य म्हणजे असते काय
नुसते मृगजळ दुसरे काय ..?
असे मनात आल्यावरती .
शप्पत तो भिजला होता .
ओला ओला गच्च होता ....!!
प्रतिक्रिया
25 Oct 2011 - 9:41 am | मदनबाण
सुंदर... :)
25 Oct 2011 - 11:25 am | मिसळलेला काव्यप्रेमी
आमच्या ऑनसाईटच्या आठवणी जाग्या केल्यात.
छान जमलीये रचना. आवडली.
25 Oct 2011 - 11:51 am | फिझा
खुपच छान !!
25 Oct 2011 - 12:34 pm | मोहनराव
शप्पत मस्त आहे कविता..
25 Oct 2011 - 6:49 pm | विदेश
आवडली .