अगदी नेहमीसारखेच…..

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
24 Oct 2011 - 1:03 pm

आजही तो तिथेच वाट बघत उभा होता
अगदी नेहमीसारखेच…..
मी मात्र ना थाबायचा निर्धार केला होता
अगदी नेहमीसारखेच…..

का असा आहेस रे तू…..

इतका विश्वास तुझ्या डोळ्यात
इतकी आर्तता तुझ्या हृदयात
नजर फिरवून आणि काहीसा निर्धार करून
मला जायचे होते खूप दूर निघून

कशी उत्तर देऊ मी तुला रे….

विसरावे म्हटले तरी विसरता येत नाही,
दिवस संपून जातो पण मन कुठंच लागत नाही,
पाऊस पडून गेला तरी आठवणींचे आभाळ मोकळ होत नाही,
आठवण आली नाही असे कधी होताच नाही…

नेहमीसारखेच ….
अगदी नेहमीसारखेच …..

आठवायला विसरावे लागत, पण विसरता कधी येताच नाही,
वाट संपून जाते पण प्रवास कधी संपतच नाही,
वाटेत या तुझी साथ हवी आहे !!

नेहमीसारखेच …..
अगदी नेहमीसारखेच…..

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Oct 2011 - 1:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आपला प्रयत्न आवडला.
पु. ले. शु.

प्रचेतस's picture

24 Oct 2011 - 1:32 pm | प्रचेतस

हे वाचता आले. :)

वाहीदा's picture

24 Oct 2011 - 4:27 pm | वाहीदा

कविता आवडली पण ..
फिर वहीं शाम ... वही गम... वही तनहाई क्यूं है ?

ज्ञानराम's picture

24 Oct 2011 - 5:33 pm | ज्ञानराम

स्पर्शून गेली मनाला.... आर्तता आहे...