नमस्कार!
आकाशकंदिल बनवणे हा एक अवघड प्रकार असतो असं नेहमीच वाटत असल्यामुळे मी आकाशकंदिल बनवण्याच्या भानगडीत कधीच पडलो नाही. पण काही दिवसांपुर्वीच मिपावर प्रिया-ताईंचा "पारंपारीक आकाशकंदिल" हा धागा वाचला (http://www.misalpav.com/node/19394) आणि वाटलं "अरे! हे तर भारीच सोप्प प्रकरण आहे :) त्यात मनासारखं साहित्यंहि मिळालं मग अजुनच हुरुप आला अणि बनवला आकाशकंदिल :)
धन्यवाद प्रियाताई :)
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!! :)
(मराठी टंकलेखनात काहि चुका झाल्या असल्यास (चुकिचा काना, मात्रा, वेलांटी इ.) माफ करावे. मोकळेपणाने निदर्शनास अणाव्यात, त्याची मनापासुन दखल घेतली जाईल व चुका सुधारल्या जातील :) )
प्रतिक्रिया
24 Oct 2011 - 10:49 am | प्रचेतस
सुरेखच बनवला आहे आकाशकंदिल
त्या खालच्या झिरमुळ्या थोड्या लांब हव्या होत्या अजून.
24 Oct 2011 - 11:18 am | उदय के'सागर
धन्यवाद वल्ली :)
अहो, त्या झिरमळ्याचा पेपर ऐनवेळेस कमी पडला (माझ्या अगाऊपणा मुळे) म्हणुन आहे त्यात भागवावं लागलं :(
:)
24 Oct 2011 - 4:03 pm | गणेशा
मस्त जमलाय.. आवडला.
मी पण मागील धाग्यावरुन कालच एक आकाश कंदिल बनवला...
24 Oct 2011 - 4:47 pm | पियुशा
बेस्ट :)
24 Oct 2011 - 5:52 pm | रेवती
आकाशकंदील छानच झालाय.
नक्षिदार कागद भारी मिळालाय.
आम्हाला ग्रेट कागद नाही मिळाले.
घरी होते त्यात असाच बनवलाय.
प्रिया ब तैंनी यावर्षी अनेक मिपाकरांना कंदील करायला भाग पाडल्याबद्दल धन्यवाद!
24 Oct 2011 - 6:15 pm | प्रिया ब
:)
24 Oct 2011 - 6:13 pm | प्रिया ब
छान झालाय कंदिल....
25 Oct 2011 - 12:17 am | उदय के'सागर
वल्ली, गणेशा, पियुशा, रेवती आणि प्रिया तुम्हा सर्वांना मनापसुन धन्यवाद :)