खरच फार गूढ आहे... सर्वप्रथम ही तेजा कोण ? तीचा तो पुत्र पोरका का आहे ? तो सूध्दा कवी आहे काय ? मग उन्मुक्तीच्या कशाला रचतोय गाथा ? बर तो कवी आहे हे मान्य केलं तर जेन देखे कोणी ते देखे कवी हे ब्रम्हवाक्य असताना त्याबद्दल असूयेने असह्य होता कामा नये हे समजूनही विव्हळते मग जग आता म्हणने म्हणजे कवीता फार खोलात आहे इतकचं कळतयं... सगळच अतर्क्य... दूसर्या मीतीशी नातं जोडणारं.... अकल्पीत.. अनाकलनीय.. भिषण व अत्यंत गूढ...
प्रतिक्रिया
21 Oct 2011 - 10:02 am | पाषाणभेद
चारोळी छानच आहे. थोडीशी गुढ वाटते आहे, समजवून द्याल काय?
21 Oct 2011 - 10:21 am | युयुत्सु
माझ्या एका मित्राने मला त्याची ही कविता पाठवली. ती वाचल्यावर वरील चारोळी स्फुरली.
अनौरस
अतृप्तीच्या पेल्यामधुनी
पितो अधाशी अमृत घोट
हपापलेली जीभ चाटते
जरी ओशाळे हसून ओंठ
निर्वाणाच्या वाटेवरचे
रंग उदास नि गूढ केशरी
सत्य शोधता जीर्ण वासना
ओशट भोळे प्रश्न विचारी
पापभिरू अन पवित्र थोड्या
मनास दिसले उदात्त काही
झुगारण्या ती कवच-कुंडले
मध्यमवर्गी; "जमतच नाही!"
उठ जरासा पेटून आणिक
उभा रहा सरसावून बाह्या
सुखलंपट ह्या तना-मनातून
दिव्यत्वाच्या फुटू दे लाह्या
तेजाचा तू पुत्र पोरका,
फुलव झळाळी जरी अनौरस.
झेल बाण सत्याचे उमजून
टीचभर छाती ताणुनी चौरस.
--अजित भागवत
21 Oct 2011 - 11:08 am | विदेश
पाभेशी सहमत .
21 Oct 2011 - 5:23 pm | वाहीदा
मू़ळ कविताही सुंदर अन त्यावर सुचलेल्या चारोळ्या ही सुंदर.
थोडेसे रसग्रहण केले तर अजून आवडेल
21 Oct 2011 - 5:38 pm | आत्मशून्य
खरच फार गूढ आहे... सर्वप्रथम ही तेजा कोण ? तीचा तो पुत्र पोरका का आहे ? तो सूध्दा कवी आहे काय ? मग उन्मुक्तीच्या कशाला रचतोय गाथा ? बर तो कवी आहे हे मान्य केलं तर जेन देखे कोणी ते देखे कवी हे ब्रम्हवाक्य असताना त्याबद्दल असूयेने असह्य होता कामा नये हे समजूनही विव्हळते मग जग आता म्हणने म्हणजे कवीता फार खोलात आहे इतकचं कळतयं... सगळच अतर्क्य... दूसर्या मीतीशी नातं जोडणारं.... अकल्पीत.. अनाकलनीय.. भिषण व अत्यंत गूढ...
21 Oct 2011 - 5:56 pm | गणेशा
चारोळी आणि कविता छान आहे .. मस्त
कविता जास्त कळाते आहे .. छानच आहे.
चारोळीचा लगेच संधर्भ लागला नव्हता
21 Oct 2011 - 9:23 pm | यकु
कविता वाचनीय.
21 Oct 2011 - 9:49 pm | निवांत पोपट
कविता सुंदर आहे.अतिशय आवडली.
पण..
असल्या काव्यइच्छांचा शेवट बहुदा,,,,
‘मुक्ती’च्या ह्या जयघोषापायी,
कंठशोष होऊनी बसते वाचा l
स्वप्ने आंधळी, पाहता,पाहता
डोळ्यांच्याही होती खाचा l
असाच हॊत असावा.