आला पाऊस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
16 Oct 2011 - 6:54 pm

आला पाऊस

गर्जत वर्षत आला पाऊस
हर्षत नाचत आला पाऊस
कुंद नभ मोकळे करूनी
धरेवरती कोसळला पाऊस

विद्यूल्लता तेजाने चमके
कडकड करूनी झळके
सवेत येवूनी थेंब जलाच्या
आक्रंदून पडला पाऊस

अतीवेगाने तुफान वाहते
तरूवेलींचे पर्ण हालते
भांग शाखीय शिस्तीचा
विस्कटून गेला पाऊस

झरे नद्या तलाव सागर
जलाशयांची रुपे अगाध
एकात दुसरे दुसरे एकात
मिसळूनी गेला पाऊस

कोठे पडला छतावरी
कोठे आला माळरानी
कोठे पडूनी शेतामध्ये
धान्य पिकवूनी गेला पाऊस

उष्णउसासे देवूनी अंगी
शहार्‍यांची टोचूनी नांगी
अमृतमय जीवन
देवूनी गेला पाऊस

- पाषाणभेद
१६/१०/२०११

कविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2011 - 10:21 pm | अत्रुप्त आत्मा

उष्णउसासे देवूनी अंगी
शहार्‍यांची टोचूनी नांगी
अमृतमय जीवन
देवूनी गेला पाऊस... या कडव्याच्या वरच सगळ नुसत माहीतीतल आहे,,,पण हे शेवटच म्हणजे आत्मानुभूतीच...

प्रकाश१११'s picture

16 Oct 2011 - 10:37 pm | प्रकाश१११

खूप सुंदर ..!!नि छान लय !!

प्रकाश१११'s picture

16 Oct 2011 - 10:37 pm | प्रकाश१११

खूप सुंदर ..!!नि छान लय !!

प्रचेतस's picture

16 Oct 2011 - 11:14 pm | प्रचेतस

मस्त रे पाभे.

मदनबाण's picture

17 Oct 2011 - 2:18 pm | मदनबाण

छान रे...