कालच आई स्वप्नात येऊन गेली
माझ्या केसात हात फिरवून
हलकेच मला म्हणाली
किती राब राबतोसरे तू
थोडासा आराम करीत जारे बाळा
काम काम नि अविरत काम
मग आराम कधी करशील बाळा ...?
कसा जीव माझा व्याकुळ होऊन गेला
तिच्या आठवणीने जीव ओला ओला झाला
सतत काळजी तिची सवय होती
पोरांच्या सुखासाठी ती राब राब राबत होती
देवाजवळ दिवा नि हात जोडून प्रार्थना
सुखाची याचना फक्त पोरासाठी
स्वप्नात येऊन ती काय म्हणाली ..?
भूक लागली असेल नारे तुला
थांब जरासा
आपला जुना तवा लोखंडाचा
मी शोधून काढते
आणि तुझ्यासाठी छान पिठले टाकते
असे म्हणून ती आत गेली
तिची वाट बघता बघता
मला कशी जाग आली ...?
मी तिची वाट बघत बसलो
नि जाणीव झाली
आई तर कधीच हरवून गेली
निळ्या निळ्या आभाळात
कधीच ती निघून गेली
आई कालच स्वप्नामध्ये येऊन गेली
प्रतिक्रिया
13 Oct 2011 - 10:32 am | ५० फक्त
...
13 Oct 2011 - 11:15 am | मिसळलेला काव्यप्रेमी
नि:शब्द!!
13 Oct 2011 - 11:37 am | गणेशा
निशब्द
13 Oct 2011 - 8:11 pm | प्रभाकर पेठकर
अतिशय भावपूर्ण.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
शेवटचे कडवे मनाला चटका लावून जाणारे आहे.
13 Oct 2011 - 8:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> अतिशय भावपूर्ण.
असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
14 Oct 2011 - 3:41 am | सुहास झेले
भावपूर्ण.
14 Oct 2011 - 5:17 am | चित्रा
साधी आणि सरळ कविता.
14 Oct 2011 - 8:10 am | लीलाधर
खुपच छान अप्रतीम
मात्रुदेवो भव।
14 Oct 2011 - 3:10 pm | मोहनराव
.....
14 Oct 2011 - 3:20 pm | जाई.
अप्रतिम
14 Oct 2011 - 3:35 pm | अविनाशकुलकर्णी
आवडली...
14 Oct 2011 - 3:57 pm | गवि
खूप करुण.. :( कसेतरीच झाले.
14 Oct 2011 - 4:18 pm | श्यामल
काळजाचा ठाव घेणारी कविता !
14 Oct 2011 - 6:21 pm | अविनाशकुलकर्णी