नमस्कार,
दसरा झाला, आता वेध लागले आहेत ते दिवाळीचे.... चकली, चिवडा, लाडू, फटाके, दिवे,पणत्या इति.
आज मी एक सोप्या पद्धतीचा आकाशकंदिल दाखवणार आहे.
साहित्य:
- चार्ट पेपर (१)
- काइट पेपर (२/३)
- सोनेरी कागद (१)
- फेविकोल
- कात्री
- पेन्सिल
- पट्टी
- दोरी/रिबिन
क्रुती:
१. सर्वात प्रथम आपल्या आवडीनुसार चार्ट पेपर कापून घ्यावा ( मी घेतलेली उंची - 22 cm )
२. कापलेल्या चार्ट पेपर चा cylinder तयार करा
३. आता काइट पेपर चे चौकोन कापून घ्या ( मी घेतलेली side - 15.5 cm)
४. ह्या चौकोनाची टोके (diagonal) जोडून घ्या व चिकटवा.
५. वरील चिकटवलेला चौकोन cylinder वर चिकटवावा
६. cylinder वर सगळेच चौकोन चिकटवून घ्यावे
७. आता सोनेरी कागदाच्या पट्ट्या कापून घ्याव्या ( मी घेतलेली उंची - 2 cm)
८. वरील कापलेल्या पट्ट्या cylinder च्या वरून व खालून चिकटवून घ्या
९. नवीन काइट पेपर घेऊन तो खालील झिरमिळ्यांसाठी वापरावा
१०. कापलेल्या झिरमिळ्या cylinder च्या खालील बाजुने लावा
११. ह्या कंदिलाला अडकवण्यासाठी दोरी/रिबिन लावावी.
दिवाळीचा आकशकंदिल तयार!!!
एकूण खर्च : रुपये 20 + फेविकोल
लागलेला वेळः ४ तास
प्रतिक्रिया
11 Oct 2011 - 11:41 pm | प्रभो
झकास........
11 Oct 2011 - 11:49 pm | विकास
सोपे करून पायर्यापायर्यांनी छान सांगितले आहे.
दिवाळीच्या पाककृती येण्याआधी कंदीलाची कलाकृती आलेली पाहून आनंद झाला! ;)
12 Oct 2011 - 12:25 am | पैसा
खूप सोपं आहे. मी गेल्या वर्षी आकाशकंदिलाचा स्टीलचा सांगाडा अणलाय, त्याला अशा करंज्या लावून बघते आता!
12 Oct 2011 - 12:33 am | गणपा
वाह !!!
येउंद्या अजुन नवीन डिझान्स् .
18 Oct 2011 - 8:25 am | निवेदिता-ताई
येउंद्या अजुन नवीन नवीन डिझान्स् .
12 Oct 2011 - 12:40 am | रेवती
आहा! मस्तच!
निळा रंगही छान निवडलाय.
तुम्ही एकूणच कलाकार दिसताय.
कविता, दुपटी झाली आता आकाशकंदील.
12 Oct 2011 - 12:55 am | चिंतामणी
पण पारंपारीक म्हणले की तो बांबुच्या कामट्यांपासुन बनवलेला आकाशकंदील डोळ्यासमोर येतो.
12 Oct 2011 - 10:48 am | ५० फक्त
+१००, कर्वे रोडवर लक्ष्मि पर्ल्सच्या दुकानासमोर असे आकाशकंदिल मिळतात, याच्या शिवाय दिवाळी मि दिवाळीच मानत नाही,
अर्थात, प्रियातै नी केलेला कंदिल एकदम सोपा आहे, आता पोराला दाखवेन अन त्याच्याकडुन करुन घेइन.
धन्यवाद प्रियातै.
12 Oct 2011 - 1:30 pm | गणपा
बाल मजुरीचा तिव्र नीषेढ. ;)
12 Oct 2011 - 5:54 pm | ५० फक्त
हे निषेढ माझ्या पोराच्या शाळेत जाउन सांगितलं पायजे कोणितरी, दर महिन्याला एक कायतरी घेउन या करुन हे असलं हे तस्लं, नाही ते लफडं असतंय, नशिब नवरात्र अन दिवाळी एकाच महिन्यात आहे नाहीतर अजुन एक लफडं झालं असतं.
13 Oct 2011 - 10:39 am | जयंत कुलकर्णी
प्रौढ मजूरीचा निषेढ ! :-)
13 Oct 2011 - 1:08 pm | गणपा
आपल्या बालपणी आपण एक हस्तकला सोडलं तर दुसरकाही असलं लफड केल होतं का?
ती हस्तकलाही आपली आपल्यालाच करावी लागायची.
आपल पोरगच सगळ्यांच्या पुढे असाव असा आपल्या पालकांचा हट्ट होता का?
नाहीना.
हल्लीच्या रॅट रेसमध्ये आपणाच आपल्या पोरांकडुन अपेक्षा वाढवून ठेवल्यात. मग भोगु आता आपल्या कर्माची फळ. ;)
13 Oct 2011 - 2:21 pm | ५० फक्त
आई शपथ, बाबा शिक्षक असुन सुद्धा मी या बद्द्ल शाळेत नेहमी मार खाल्लेला आहे. आणि हो त्या वेळी किमान माझ्या पालकांनी तरी इ. ७ पर्यंत पहिला ये असा घोषा कधी लावलेला नव्हता.
मी तर जेवढं शक्य आहे तेवढं माझ्या पोराला रॅट रेसपासुन लांब ठेवतो, पण त्याच बरोबर त्याला कुठं कुठं जाता येइल , काय काय करता येईल याची त्याला समजेल अशा भाषेत कल्पना देउन ठेवतो.
आपल्यावेळी आपल्या हार्ड डिस्क फक्त २-४-६ जिबिच्या असत, त्यामुळं जास्त किंवा काहीच लक्षात राहत नसे, पण हल्ली पोरांची मेमरी शार्प आणि खुप जास्त आहे. मी माझ्याच मित्रांची घरं विसरतो पण माझं पोरगं आम्हि त्या एरियात गेलो की मलाच सांगतं, इथुन राईट्ला गेलं ना की, मंजिरीचं घर आहे '
संवैधानिक खुलासा - मंजिरी माझ्या मित्राच्या मुलीचं नाव आहे.
13 Oct 2011 - 8:54 pm | मी-सौरभ
तुमच्या विचारांची अन खुलाश्यांची भविष्यकाळासाठी नोंद घेतल्या गेली आहे :)
16 Oct 2014 - 2:58 pm | भिंगरी
तसच म्हणते.
12 Oct 2011 - 1:18 am | आत्मशून्य
छान केलाय.
12 Oct 2011 - 1:28 am | पुष्करिणी
छान, सोप्पी करून सांगितलीय कॄती. प्रयत्न करते, बहुतेक जमेल
12 Oct 2011 - 1:45 am | प्रभाकर पेठकर
मस्त आहे आकाशकंदिल.
एके वर्षी मी, श्री. चिंतामणींच्या प्रतिसादात दाखविला आहे तसे, ३ आकाशकंदिल बनविले.
एक मोठा, एक फूट X एक फूट चौकोन असलेला, घराबाहेर टांगण्यासाठी आणि दोन लहान, पिटुकले, सहा इंच X सहा इंच चौकोन असलेले, बैठकीच्या खोलीत टांगण्यासाठी. फार प्रसन्न वाटतं बैठकीच्या खोलीत आकाशकंदिल पाहताना.
16 Oct 2014 - 3:06 pm | काळा पहाड
ते करायसाठी साहित्य पुण्यात कुठे मिळतं का? म्हणजे काड्या वगैरे? या वर्षी करीन म्हणतो.
12 Oct 2011 - 8:26 am | प्रचेतस
मस्तच झालाय आकाशकंदील.
12 Oct 2011 - 9:28 am | प्रिया ब
धन्यवाद
-- प्रिया
12 Oct 2011 - 9:43 am | गवि
छान दिसतोय. क्लासिक लुकमुळे जास्त चांगला वाटतोय. स्वतः करण्यातली मजाही असतेच.
जाताजाता पारंपारिक ऐवजी पारंपरिक असा शब्द सुचवून पाहतो.
12 Oct 2011 - 9:57 am | किसन शिंदे
खुप छान बनवलाय कंदिल.
दिवाळीला दरवर्षी माझाही असाच आकाशकंदिल घेण्याकडे कल असतो. ते चिनी बनावटीचे कंदिल पाहून जाम चीड येते, त्यापेक्षा असा पारंपारिक कंदिल बघताना खुप छान वाटतं.
शाळेतल्या दिवसात सहामाहीनंतर आम्हाला एक आर्ट प्रोजेक्ट बनवायला सांगायचे तेव्हा असा सोपा कंदिल आणि त्यावरचे मार्क ठरलेले असायचे.
12 Oct 2011 - 9:59 am | मितभाषी
छान... जमलाय.
12 Oct 2011 - 10:18 am | अमोल केळकर
खुप छान
अमोल
12 Oct 2011 - 11:17 am | जागु
प्रिया जियो. आजच सामान घेउन जाते कंदीलच मोठा आणि छोटे छोटे पण करेन. धन्स.
12 Oct 2011 - 11:39 am | विसुनाना
धन्यवाद.
पुण्यासारख्या सांस्कृतिक गड्ड्यातही प्रत्येक दुकानात चिनी आकाशदिवे पाहून वैताग आला. आता हा आकाशकंदिल तयार करतोच.
12 Oct 2011 - 11:52 am | अविनाशकुलकर्णी
पण पारंपारीक म्हणले की तो बांबुच्या कामट्यांपासुन बनवलेला आकाशकंदील डोळ्यासमोर येतो.
सेम हिअर.. मजा यायची लहानपणी..
नेमकि कात्री सापाडायची नाहि....
पण नविन कंदील पण मस्त व सोपा आहे
छान सचित्र धागा
12 Oct 2011 - 11:54 am | गवि
कामट्यांचा आकाशकंदिल अवघड आहे पण वन टाईम अॅक्टिव्हिटी.
एकदा का तो बनवला की दरवर्षी सांगाडा तसाच.. फक्त वरचा चुरमुरी कागद बदलायचा.. :)
12 Oct 2011 - 11:57 am | सुहास झेले
मस्त जमलाय.... !! :)
12 Oct 2011 - 12:12 pm | शाहिर
या वर्षी नक्की करणार
12 Oct 2011 - 4:44 pm | पियुशा
मस्त ग मी पन बनवेन ह्या दिवाळिला :)
12 Oct 2011 - 6:44 pm | प्रास
छान आहे हो हा कंदिल, अगदी पारंपारिक....
आवडला.
:-)
13 Oct 2011 - 3:03 am | पिंगू
मस्त जमलाय कंदील. मीपण प्रत्येक दिवाळीला कंदील बनवायचो. कधी वेळ मिळाला की इथे देईनच.
- (कंदीलवाला) पिंगू
13 Oct 2011 - 6:12 am | शिल्पा ब
सोप्पा आणि छान आहे. माझ्या लेकीला शिकवते.
13 Oct 2011 - 9:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रयत्न करायला हरकत नाही असे वाटू लागले. :)
-दिलीप बिरुटे
16 Oct 2011 - 1:41 am | निनाद मुक्काम प...
प्रिया ब
तुम्ही ह्या लेखातून बालपणीच्या गोड स्मृती चाळवल्या.
डोंबिवलीतून दिवाळीच्या सुट्टीला मी आमच्या कुर्ल्याच्या बटाट्याच्या चाळीत यायचो .
तेथे रात्रभर मुले जागून मोठा आकाशकंदील बनवायचे .त्यासाठी लागणारी खळ सुद्धा स्वतःच बनवायचे .आम्हा चील्लर पार्टीचे प्रमुख कार्य म्हणजे दंगा करणे व थोडीफार मदत करणे .
आपण आता दाखवला तसे कंदील बनवून ते विकायचे .व त्यातून होणार्या नफ्यातून फटाके विकत घ्यायचे .
अनेक होलसेल वस्तूंसाठी कुर्ला प्रसिद्ध होते .त्यात फटाके सुद्धा होते .
त्यावेळी मुंबईतील थंडीत मग क्वचित चहा पीत वर्षभर चाळीचा समग्र वृतांत ( भांडणे .राडे. लफडी ) कानावर पडायची .
तुमच्या आकाश कंदिलाने सार्या आठवणी ताज्या झाल्या .
16 Oct 2011 - 12:07 pm | पाषाणभेद
बोटांची नखे फार वाढलेली आहेत. कापून घेणे.
16 Oct 2011 - 1:31 pm | पाषाणभेद
मुलाच्या शाळेत असलेच आकाशकंदील त्याला करायला सांगितले होते पण ते मला करावे लागले होते.
अशाच प्रकारचे पण चपटे (एकमितीय) आकाशकंदीलही करता येतात व तसले एका माळेत टांगता येतात.
16 Oct 2011 - 7:23 pm | डावखुरा
छान पाककृती आहे....आकाश कंदिलची...आवडेश...
17 Oct 2011 - 5:06 pm | मदनबाण
मस्त कंदील बनवला आहे.
17 Oct 2011 - 7:31 pm | निवेदिता-ताई
खुप छान बनवलाय कंदिल.
20 Oct 2011 - 9:59 pm | निवेदिता-ताई
प्रिया..अग ते निळे चौकोन किती चिकटवले आहेत...सांग न
मी करायला घेतला आहे आकाशकंदिल...
22 Oct 2011 - 5:48 pm | रश्मि दाते
छान झालेत्,घन्यवाद प्रियाताई
31 Oct 2011 - 11:03 am | चिमी
नमस्कार प्रिया ,
असाच आकाश कन्दील बनवला मि आकाश कन्दील स्पधेमधे . - माझा १ नम्बर आला.
फक्त चौकोनचे २ टोके जोडुन त्याला फुलाच्या पाकल्याचा आकार दिला होता.
खुप खुप आभार .
:-)
1 Nov 2011 - 6:54 am | रेवती
अभिनंदन!
1 Nov 2011 - 6:51 am | टुकुल
धन्यवाद प्रिया तै... हा माझा प्रयत्न.
-- टुकुल
1 Nov 2011 - 6:55 am | रेवती
छान दिसतोय आकाशकंदील!
मिपावर शिल्पा ब, प्रिया ब आणि पूनम ब आहेत.
आता अबब म्हणायची वेळ आली आहे.;)
1 Nov 2011 - 10:45 am | चिमी
नमस्कार
मला १ सुचना द्यावी वाटत आहे.
ते चौकोन च्या चारी बाजु आणी तो सोनेरी कागद आपन झिग्-झाग कात्रीने कापु शकतो.
धन्यवाद.
-चिमी.
16 Oct 2014 - 10:31 am | चिमी
धागा वर आणत आहे
16 Oct 2014 - 10:56 am | मी एक ट्रेकर
छानच झालाय आकाशकंदील
16 Oct 2014 - 2:53 pm | सूड
ह्म्म्म!!