कोण येथे गुरुवर्य ?

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
4 Oct 2011 - 10:10 pm

कोण येथे गुरुवर्य ?
खितपत पडले शौर्य
अहिंसेचे पुतळे मानतो
मौनात दडले क्रौर्य

झाकोळला स्पष्ट अंधार
मुखवट्यात गळले धैर्य
स्त्रीत्वाची ताकद जाणतो
खुऱाड्यात लुटले कौमार्य

घुंगूरपाण्यात डुबले नेत्र
कळले कोणास सूरगांभिर्य
दगडात ईश्वर जाणतो
देवत्व शोधतो सूर्य

भावनांचा गच्च बाजार
मनात हरवले माधुर्य
वैराग्यात निरपेक्षता मानतो
अहंकारातून घडते कार्य

---- शब्दमेघ
(कविता पुन:प्रकाशित)

रौद्ररसकविता

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

4 Oct 2011 - 10:13 pm | इंटरनेटस्नेही

चांगली कविता.

जयंत कुलकर्णी's picture

4 Oct 2011 - 10:14 pm | जयंत कुलकर्णी

छान व अर्थपूर्ण !
मी रसग्रहणच करणार होतो पण आत्ता शक्य नाही. कविता मला आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2011 - 10:22 pm | अत्रुप्त आत्मा

वैराग्यात निरपेक्षता मानतो
अहंकारातून घडते कार्य............... अर्थपूर्ण... कविता तर खुपच अवडली.....

प्रभावी आणि अर्थपूर्ण कविता

प्रचेतस's picture

4 Oct 2011 - 10:29 pm | प्रचेतस

मिपावरच्या सध्याच्या घडामोडींना पण साजेशीच आहे.

आत्मशून्य's picture

4 Oct 2011 - 10:32 pm | आत्मशून्य

अवांतर :- "खितपत पडले शौर्य" च्या जागी चूकून भलतंच वाचलं ना बे... ;)

प्रकाश१११'s picture

4 Oct 2011 - 10:32 pm | प्रकाश१११

गणेशा -खूपच छान .
झाकोळला स्पष्ट अंधार
मुखवट्यात गळले धैर्य
स्त्रीत्वाची ताकद जाणतो
खुऱाड्यात लुटले कौमार्य

आवडली ....

राजेश घासकडवी's picture

5 Oct 2011 - 12:32 am | राजेश घासकडवी

कविता आवडली. कोणाकडून काय घ्यावे च्या विरुद्ध अर्थाची आहे. तत्वं सगळीकडे ऐकू येतात पण प्रत्यक्षात मात्र विपरित घडताना दिसतं हे अधोरेखित केलेलं आहे.

कडव्यांची रचना थोडी अभिनव आहे, त्यामुळे सुरूवातीला कोड्यात पडलो होतो.

५० फक्त's picture

5 Oct 2011 - 9:09 am | ५० फक्त

मस्त रे छान कविता आवडली,

नगरीनिरंजन's picture

5 Oct 2011 - 9:22 am | नगरीनिरंजन

कविता आवडली. सद्गुणांचा उदोउदो आणि भावभावनांचे अवडंबर यात प्रत्येक गोष्टीचा झालेला विपर्यास छान मांडला आहे.

धन्या's picture

5 Oct 2011 - 10:43 am | धन्या

सुंदर कविता.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Oct 2011 - 11:28 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अखेर हि कविता आलीच. खुप सुंदर आहे.

घुंगूरपाण्यात डुबले नेत्र
कळले कोणास सूरगांभिर्य
दगडात ईश्वर जाणतो
देवत्व शोधतो सूर्य

हे तर बिनतोड!!

ज्ञानराम's picture

5 Oct 2011 - 2:41 pm | ज्ञानराम

अप्रतिम.......

गणेशा's picture

5 Oct 2011 - 8:14 pm | गणेशा

सर्वांच्या इतक्या छान प्रतिक्रिया वाचुन छान वाटले...
मनापासुन धन्यवाद ...

पैसा's picture

5 Oct 2011 - 8:21 pm | पैसा

नेहमीपेक्षा वेगळाच विषय घेतलास. छान!

शिल्पा ब's picture

5 Oct 2011 - 9:55 pm | शिल्पा ब

कोणीतरी रसग्रहण करा याचे. कविता आवडली पण फारशी समजली नै...नेहमीप्रमाणेच. :(

तिमा's picture

6 Oct 2011 - 5:28 pm | तिमा

कविता आवडली. उच्च दर्जाची !!!

मी-सौरभ's picture

9 Oct 2011 - 10:12 am | मी-सौरभ

कळतयं कळतयं असे वाटत असताना शेवटी पार गुंता होऊन जातो ती कविता उच्च दर्जाची असतेच...

कोणीतरी रसग्रहण करा ना............