दोन्ही प्रकार छानच!
जुन्या फ्याशनचीच दुपटी बरी वाटतात.
अजून काय काय बाळंतविडा केलाय?
माझ्या मुलाच्या बारश्याला माझ्या आत्यानी दुपट्यांवर फुग्याचं पॅचवर्क आणि ट्रेनचंही केलं होतं ते आठवलं.
माझ्या नणदेनीही अगदी दोन वित लांबीच्या सलवार आणि झब्ब्यावर भरतकाम केलं होतं. ते अजून ठेवलय.
तुम्ही विणकाम केलय का?
मध्यंतरी एका बेबी शॉवरला गेले होते. एका सुनेनी दोन ब्लँकेटस विकत आणल्यावर सासूबाईंनी त्यावर बसल्याबसल्या जे काही भरतकाम केलं होतं त्यानं खूपच उठावदार झालं होतं. सगळ्या भेटवस्तूंमध्ये ते कौतुकाचं ठरलं होतं.
छे! काहितरीच.
अगदी तान्ह्या बाळाला रंग नाही कळत असं म्हणतात.
माझा मुलगा चार पाच महिन्यांचा असताना ज्या बाई पोळ्या करायला येत असत त्यांच्या भडक रंगांच्या साड्यांकडे टक लावून पहात असे. म्हणजे रंग कळतो की नाही ते माहित नाही.
म्हणजेच लहान मूल रंगा*कडे आकर्षित होते, भडक रंगा*कडे टक लाऊन बघते असंच नाही का म्हणता येत?
दुसर्या फोटोतल्या रंगसंगतीमध्ये तसा परिणाम होण्याची शक्यता वाटल्याने सदर शंका विचारली गेली होती. पुन्हा त्यावर झोपलेल्या बाळाच्या ही रंगसंगती अगदी डोळ्यालगत येत असण्याच्या शक्यतेने काळजी वाटल्यानेही असं विचारलं होतं.
* इथे 'रंगा' शब्दाने कुणा आयडीचा उल्लेख केलेला नाही हे सू. सां. न ल. ;-)
माझ्या आईनेपण माझ्या मुलीसाठी खूप दुपट्या तय्यार केल्या, त्यापण माझ्याच जुन्या मऊ सूती ओढ्ण्यांपासून. माझ्या आईने त्या माझ्या ओढण्या ईतकी वर्ष जपून ठेवल्या होत्या, बाळाला गोधड्या शिवायला उपयोगी होतील म्हणुन. त्यात तिने भोपळा, पतंग अशा वेगवेगळ्या आकाराच्या गोधड्या बनवल्या.
प्रतिक्रिया
3 Oct 2011 - 5:55 pm | निवेदिता-ताई
ए मस्त ह ...छान दिसताहेत दोन्हीही..!!!!!!!!!
कलर कॉम्बीनेशन छान जमलय..!!
3 Oct 2011 - 5:59 pm | अत्रुप्त आत्मा
छान जमलय...दुसरं दुपट सोंगट्या खेळायचा पट वाटतोय... :-)
3 Oct 2011 - 7:26 pm | रेवती
दोन्ही प्रकार छानच!
जुन्या फ्याशनचीच दुपटी बरी वाटतात.
अजून काय काय बाळंतविडा केलाय?
माझ्या मुलाच्या बारश्याला माझ्या आत्यानी दुपट्यांवर फुग्याचं पॅचवर्क आणि ट्रेनचंही केलं होतं ते आठवलं.
माझ्या नणदेनीही अगदी दोन वित लांबीच्या सलवार आणि झब्ब्यावर भरतकाम केलं होतं. ते अजून ठेवलय.
तुम्ही विणकाम केलय का?
मध्यंतरी एका बेबी शॉवरला गेले होते. एका सुनेनी दोन ब्लँकेटस विकत आणल्यावर सासूबाईंनी त्यावर बसल्याबसल्या जे काही भरतकाम केलं होतं त्यानं खूपच उठावदार झालं होतं. सगळ्या भेटवस्तूंमध्ये ते कौतुकाचं ठरलं होतं.
3 Oct 2011 - 10:08 pm | शिल्पा ब
छान आहेत. खासकरुन दुसर्या दुपट्याची रंगसंगती छान जमलीए.
3 Oct 2011 - 10:24 pm | पैसा
पहिलं दुपटं जरा सोपं आहे. दुसर्यात मात्र बरेच बारीक तुकडे जोडून केलेलं दिसतंय. रंगसंगती छान जमलीय.
3 Oct 2011 - 10:53 pm | प्रास
मला तर पहिलंच दुपटं चांगलं वाटलं.....
आता माझी आपली अज्ञानदर्शक शंका -
दुसर्या दुपट्यातील डिझाईन आणि रंगसंगतीमुळे त्यावरच्या बाळाच्या डोळ्यांना काही त्रास तर होणार नाही ना?
(अज्ञानी)
4 Oct 2011 - 8:02 am | रेवती
छे! काहितरीच.
अगदी तान्ह्या बाळाला रंग नाही कळत असं म्हणतात.
माझा मुलगा चार पाच महिन्यांचा असताना ज्या बाई पोळ्या करायला येत असत त्यांच्या भडक रंगांच्या साड्यांकडे टक लावून पहात असे. म्हणजे रंग कळतो की नाही ते माहित नाही.
4 Oct 2011 - 9:13 pm | स्वानन्द
:D
4 Oct 2011 - 9:17 pm | रेवती
त्या बाळंना तरी सोडा हो!
पोळीवाल्या आजीबाई होत्या. आणि मुलगा बाळ होता.
6 Oct 2011 - 7:34 pm | प्रास
म्हणजेच लहान मूल रंगा*कडे आकर्षित होते, भडक रंगा*कडे टक लाऊन बघते असंच नाही का म्हणता येत?
दुसर्या फोटोतल्या रंगसंगतीमध्ये तसा परिणाम होण्याची शक्यता वाटल्याने सदर शंका विचारली गेली होती. पुन्हा त्यावर झोपलेल्या बाळाच्या ही रंगसंगती अगदी डोळ्यालगत येत असण्याच्या शक्यतेने काळजी वाटल्यानेही असं विचारलं होतं.
* इथे 'रंगा' शब्दाने कुणा आयडीचा उल्लेख केलेला नाही हे सू. सां. न ल. ;-)
3 Oct 2011 - 11:25 pm | कुंदन
मस्त दिसतायत दुपटी.
4 Oct 2011 - 8:03 am | रेवती
भाऊजींना त्यांच्या चिरंजिवांची दुपटी आठवत असतील.;)
4 Oct 2011 - 8:10 am | चित्रा
छान! अभिनंदन.
अशा मऊ दुपट्यांत गुंडाळलेली बाळे बघायला आवडतात.
4 Oct 2011 - 12:21 pm | किसन शिंदे
हे घ्या दुपट्ट्यात गुंडाळलेलं बाळ :)
4 Oct 2011 - 8:36 pm | शिल्पा ब
गोड आहे!! अशी बाळं एकदम बाहुलीसारखी दिसतात. :)
4 Oct 2011 - 8:39 pm | रेवती
सहमत.
फोटू पाहून भारतात सकाळी लवकर तेल लावून अंघोळ घालून ती बाई निघून जाते पण जाण्याअधी बाळाला दुपट्यात गुरफटवून जाते ते आठवले.
4 Oct 2011 - 9:30 pm | गणपा
सहमत
आमच्या बाळीला (ती लहान होती तेव्हा) दुपट्ट्यात गुंडाळायची जवाबदारी आम्ही स्वखुशीने आमच्या शिरी घेतली होती त्याची आठवण झाली. :)
5 Oct 2011 - 3:43 am | चित्रा
किती गोड गोड बाळ जसे कमल उमलले.
http://www.in.com/music/matsyagandha-te-mahananda-vol1/songs-48069.html
4 Oct 2011 - 8:13 am | पाषाणभेद
कलाकुसर छान आहेच.
या सध्याच्या 'प्रगतीच्या' काळात असली जुन्या आठवणी येणार्या वस्तू पाहून डोळे पाणावले.
4 Oct 2011 - 10:35 am | michmadhura
माझ्या आईनेपण माझ्या मुलीसाठी खूप दुपट्या तय्यार केल्या, त्यापण माझ्याच जुन्या मऊ सूती ओढ्ण्यांपासून. माझ्या आईने त्या माझ्या ओढण्या ईतकी वर्ष जपून ठेवल्या होत्या, बाळाला गोधड्या शिवायला उपयोगी होतील म्हणुन. त्यात तिने भोपळा, पतंग अशा वेगवेगळ्या आकाराच्या गोधड्या बनवल्या.
4 Oct 2011 - 10:59 am | प्रिया ब
वरील सर्वांना धन्यवाद
4 Oct 2011 - 8:34 pm | प्राजु
सुंदर आहेत दोन्ही.
मुलासाठी आईने बराच मोठा बाळंतविडा केला होता ते आठवलं.
4 Oct 2011 - 11:55 pm | आशु जोग
दोन्हीही आवडले. अधिक असतील तरीही इथे टाका.
बाकी काही रंगवलेली वगैरे ?
5 Oct 2011 - 3:25 pm | जागु
प्रिया कित्ती गोड आहेत ती दुपटी. छानच ग.
5 Oct 2011 - 3:51 pm | प्राजक्ता पवार
सुंदर दिसताहेत .