रंगीत तालीम

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Oct 2011 - 12:40 pm

सहावि सातवित असेन..बहुतेक
उन्हाळयाच्या सुट्या चालु झाल्या होत्या..
आमचे १०-१२ मित्रांचे टोळके बाळ पुंडलीक मित्राच्या वाड्यात दंगा करायला जमले होते...
वाडा चौसोपि व.मोठा. .. आत एक विठ्ठल मंदिर हि होते..सभामंडपात सारे जमलो होतो..
गप्पा चालु होत्या.. "अन आपण नाटक करु यात का?".चंद्या घाटपांडे म्हणाला..
सा~यांनी कल्पना उचलुन धरली.. पण कोणचे? .कुणालाच सुचेना
शेवटी "तुच एखादे नाटुकले लिहि..असा मला आग्रह झाला..
मित्रांच्या विश्वासाचा अन अज्ञानाचा फायदा घेत मी पण हो म्हटले..
रात्री विचार करीत अश्वथाम्याच्या कथेवर एक छोटे नाटुकले लिहिले...
अश्वथामा दुध मागतो ..घरची गरीबी.. आई पाण्यात पिठ कालवुन देते तिच... घिसि पिटी कहाणी..
दुस~या दिवशी वाचन झाले.दोस्त खुश झाले.व बेत ठरला..पात्रे पण २ नच होति अश्वथामा व आई..
सभामंडपातच नाटक हो्णार म्हणजे बाय डिफॉल्ट बाळ हिरो हे तर नक्किच होते..
आईच काम कोण करणार?काळ जुना असल्याने मुलांची कामे मुले व मुलिंची मुली असली चंगळ नव्हति..
मुलेच स्त्री पार्ट करीत ..शाळेतल्या स्नेहसंमेलनात हि मुलिंचे निराळे व मुलांचे निराळे अशी नाटके होत असत..
सगळ्याच्या नजरा जोश्या कडे वळाल्या..गोरा घारा व सुंदर होता दिसायला..तु हो ना आई..सारे त्याला म्हणाले..
ए हट मी नाहि...म्हणत जोश्याने ऑफर नकारली..शेवटी कसे बसे त्याला आम्हि मनावले..व तो पण राजी झाला..
तालमी जोरात सुरु झाल्या.उत्साह दांडगा होता...व उद्या रंगीत तालिम ड्रेस ..मेक अप वगैरे करुन करायचे असे ठरले..
दुस~या दिवशी दोस्त कंपनी आपल्या बहिणीचे परकर पोलके..छोट्या साड्या जमतिल तश्या घेवुन हजर झाले..
आतल्या खोलित आम्हि वेषभुषा करण्यास सुरवात केली ..बाकिची मित्र मंडळी बाहेत दंगा करीत होति..
अश्वाथाम्याचे सोंग पटकन रंगले...आईला पण परकर पोलके साडी नेसवली..मेक अप केला ..जोश्या च रुप खुलले होते..
केसांचे काय करायचे प्रश्ण होता..अर्थशुन्यावर अधारीत नाटक असल्याने विग कुठला परवडणार?
शेवटी केश वपन झालेल्या बायका घेतात तसा घट्ट पदर आईच्या डोक्यावरुन घेतला व पिन लावुन टाकली..
जोश्या एकदम "आई" दिसत होता..तरी पण एक कमी राहिली होति..
पुर्वि शाळेतल्या गॅदरिंग मधे जरी मुले स्त्री पार्ट्स करीत असत तरी "पॅडिंग" असल्याने तो "टच्च" ईफेक्ट दिसायचा..
आमच्या कडे "पॅडिंग" नसल्याने काय करावे या काळजीत बाल चमु होते...
पिंग पॉंग चे बॉल..चंद्या ने सुचवले.. आम्ही चेंडु पोलक्यात छातिवर योग्य त्या जागी ठेवले व हवा तो ईफेक्ट मिळाला.
पण पोलके जरा ढगळ असल्याने चेंडु छातिवरुन खाली घसरु लागले..
तु छाति जरा फुगव..एकाने सुचवले..व चेंडु "त्या" जागी घट्ट बसले व मी निश्वास सोडला...
पण जोश्या बोलु लागला कि श्वास सुटायचा व त्या तारुण्य खुणा परत पोटाकडे घरंगळायच्या..
त्या मुळे आयडिया फेल झाली.. "टेनिस बॉल घेवु यात का?" चंद्या म्हणाला अन सारे हसायला लागले.
मला तर शकुंतला आठवली..तिचे तर पोलके उसवले होते..
टेनिस बॉल टाकले तर चोळी फाडुन जोश्याचे तारुण स्टेजवर उडी घेईल कि काय अशी शंका माझ्या मनात आली..
शेवटी माझ्या डोक्यात आयडियाची कल्पना आली..व पुर्वि बटर मिळ्त.. ते ठेवावे असे ठरले.
बटर ची एक बाजु ब~या पैकी फुगीर असते तर दुसरी सपाट असल्याने हा पर्याय फिट्ट ठरला..
बटर पोलक्यात ठेवले. व हवा तो ईफेक्ट मिळाला.. उंचवट्या मुळे जोश्या परफेक्ट आई वाटु लागला..
सारे सजवुन आमची वरात सभामंडपात आली..
सोंगे बाहेर आल्यावर सा~या दोस्तांनी आई व अश्वथाम्या जवळ गराडा घातला..
जोश्याचे ते रुप पाहुन पौगंडावस्थेतल्या मुलांच्या भुका खवळल्या..अन सारे जण जोश्याला"आई भुक लागली दुध दे ना" म्हणुन चिडवु लागले..
मी गलका शांत करीत होतो.. बाजुस उभा असलेला अश्वथामा तरी कसा मागे रहाणार?
त्याचा तर आईच्या दुधावर जन्मसिद्ध हक्क होता..
अश्वथामा आई जवळ गेला अन नाटकी स्वरात म्हणाला.."आई भुक लागली दुध दे ना"
आई उर्फ जोश्या जरी गलक्याने वैतागला होता तरी तो गमत्या होता..
त्याने पोलक्यात हात घालुन दोन बटर बाहेर काढले व अश्वथाम्याच्या हातावर टेकवत म्हणाला..
"बाळा..या आईला दुध नाहि बटर येते ते खा अन भुक भागव.." असे म्हटल्यावर सारे जण हसु लागले...
व अश्या रीतिने हास्य कल्लोळात रंगीत तालीम संपन्न झाली.

नाट्य

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

3 Oct 2011 - 12:58 pm | ५० फक्त

शंकर पाटलांची ' नाट्क' खुप खुप पाणि घालुन वाढवल्यासारखी वाटली.

किती सांगू मी सांगू कुणाला! आज आनंदी आनंद झाला!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अरे कुणितरी हत्तीवरुन साखर वाटा रे! अकुकाकांनी १-२ नव्हे चक्क ४६ ओळींचा धागा लिहीला.

प्रदीप's picture

3 Oct 2011 - 6:22 pm | प्रदीप

लिखाण. प्रसंग चांगला खुलविला आहे.

जोश्याच्या हजरजबाबीपणावरून अनिल अवचटांनी लिहीलेल्या एका झणझणीत प्रसंगाची आठवण झाली.

प्रास's picture

3 Oct 2011 - 11:05 pm | प्रास

आपल्याला ही रंगीत तालीम भारी आवडलेली आहे.

मजा आली.

:-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Oct 2011 - 11:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या लेखनाची रंगीत तालीम आवडली.
अजून उत्तमोत्तम लेखन येऊ द्या.

-दिलीप बिरुटे