भाव ...

विश्वेश's picture
विश्वेश in जे न देखे रवी...
30 Sep 2011 - 4:28 pm

उदय सप्रेंच्या कवितेकडून प्रेरणा मिळाली - "जगण्यास वाव नाही, मरणांस भाव नाही ..."

असण्यास भाव नाही ... तुझ्या नसण्यास भाव आहे ...
हसण्यास भाव नाही ... तुझ्या आसवांस भाव आहे ...

नकळत वाहात आलास इथे, हे ओळखीचे गाव आहे ...
बुडविले तुला जीवानिशी ... ती ओळखीची नाव आहे ...

तू शोधतो ज्या सुखाला ... त्याचा कुणा ठाव आहे ...
फसवू नकोस स्वताला ... इथे जगणेच साव आहे ...

चढण्यास नवी शिखरे ... तू घालतो कुणावर घाव आहे ...
वरच्या दरबारात मनुजा ... न रंक न कोणी राव आहे ...

तू मोजतो आहेस वर्षे ... तुला जगण्याची हाव आहे ...
इथे मरणास भाव नाही ... पण सरणास भाव आहे ...
इथे सरणास भाव आहे ...

- विश्वेश

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Sep 2011 - 4:36 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तू मोजतो आहेस वर्षे ... तुला जगण्याची हाव आहे ...
इथे मरणास भाव नाही ... पण सरणास भाव आहे ...

हे खासचं!

एक शंका: वरील कविता वृत्तात नसावी. बहुदा जशी सुचली तशीच उतरवली आहे. आणि तसे असेल तर खरचं स्तुत्य आहे.

विश्वेश's picture

30 Sep 2011 - 4:37 pm | विश्वेश

जशि सुचलि तशि लिहिलि ...

उदय के'सागर's picture

30 Sep 2011 - 5:06 pm | उदय के'सागर

ह्या ओळी विशेष अप्रतिम :

बुडविले तुला जीवानिशी ... ती ओळखीची नाव आहे ...
आणि
इथे मरणास भाव नाही ... पण सरणास भाव आहे ...

सुदंर!!!

तू मोजतो आहेस वर्षे ... तुला जगण्याची हाव आहे ...
इथे मरणास भाव नाही ... पण सरणास भाव आहे ...

अप्रतिम ...
बाकीची कडवी विशेष आवडली नव्हती ...
पण ह्या ओळीं खुपच निव्व्ळ अप्रतिम आहेत ...

लिहित रहा .. वाचत आहे...

मोहनराव's picture

1 Oct 2011 - 12:42 pm | मोहनराव

कविता छान आहे.

विशेषकरुन शेवटच्या ओळी उत्तम!!