....नाही
जगण्यास वाव नाही , मरणांस भाव नाही
आम्ही भणंग सारे, आम्हां उठाव नाही !
ओथंबली कितीक पडद्यात आसवांच्या
ही खुसखुशीत दु:खे यांना झराव नाही !
वणव्यांत आठवांच्या उरलो न मीच माझा
तुझिया मनांत माझा तरिही पडाव नाही !
फुलतो अजून येथे हा मोगरा टपोरा
केसांत माळण्याचा.....उरला सराव नाही !
------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे, (१३ सप्टेंबर २०११)-----
प्रतिक्रिया
30 Sep 2011 - 12:34 pm | श्रावण मोडक
शेवटच्या द्विपदीत फुलतो असे हवे आहे का? फोलतो हा शब्द समजला नाही.
क्या बात!
पहिली द्विपदीही उत्तम. एकूण रचना आवडली.
30 Sep 2011 - 12:40 pm | उदय सप्रे
हो , अति उत्साहाचा परिणाम ! टायपिंग मिस्टेक ! गलतीसे मिस्टेक हो गया, आभारी आहे !
30 Sep 2011 - 12:52 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
संपादित करुन टाका की मग, उगाच इतक्या सुंदर रचनेत तेवढी कमी राहता कामा नये.
अतिशय सुंदर गझल झालीय.
सालं आम्ही वृत्तात लिहायला सुरवात केली कि वृत्त आणि शब्द यांची जी मारामारी सुरु होते म्हणता. असो.
खुप आवडली. वाचनखुण साठवलेली आहे.
30 Sep 2011 - 1:08 pm | उदय सप्रे
संपादित कशी करायची?विसरलोय !
30 Sep 2011 - 1:12 pm | उदय सप्रे
इतकं छान लिहिता की रा॑ ! का उगाच लाजवता लहान माणसाला?
संपादित केली.....
उदय सप्रेम
30 Sep 2011 - 5:31 pm | अत्रुप्त आत्मा
@-सालं आम्ही वृत्तात लिहायला सुरवात केली कि वृत्त आणि शब्द यांची जी मारामारी सुरु होते म्हणता.
मि.का. आंम्ही सहमत हो अगदी,...यायला आमची पण त्या प्रदेशात हीच बोंब उडती... :-(
30 Sep 2011 - 1:14 pm | विश्वेश
+१
30 Sep 2011 - 1:21 pm | गणेशा
मस्तच ..
शेवटचा शेर तर लाजवाब ... मस्त एकदम ..
------------
झराव या शब्दांचा अर्थ माहित नाहि मला ? काय आहे ?
झराव म्हणजे वाहणे ( मुक्त होणे) असा अर्थ आहे का ?
30 Sep 2011 - 3:06 pm | उदय सप्रे
थोडसं मराठीत स्वातंत्र्य घेतलं असावं असं वाटतं ! झरणे या क्रियापदापासून हा शब्द बनवला आहे म झराव म्हणजे झरण्याची क्रिया !
30 Sep 2011 - 5:27 pm | गणेशा
धन्यवाद !
चला या कारणाने पुन्हा वाचली कविता/गझल मस्तच वाटली पुन्हा एकदा.
झरणे यासाठी येथे 'बहाव' हा शब्द बसु शकेल असे वाटते.. ' झराव' योग्य वाटत नाहि.. तो ओढुन ताणुन लिहिलेला वाटतो आहे/..
बदल सांगत आहे त्यामुळे क्षमस्व, पण बाकीचे शेर खरेच खुप छान आहेत.
अजुन एक म्हणजे, बाकीच्या सर्व शेरांमध्ये पहिली ओळ आणि दूसरी ओळ परिपुर्ण आहेत
उदा.
पण या कडव्या मध्ये पहिल्या ओळीत
येथे काय ओथंबले आहे हे वाचण्यासाठी दूसर्या ओळीत जावे लागते आहे जे इतर शेरांमध्ये नाही जावे लागत.
उदा>
---
ओथंबली शब्दरास पडद्यात आसवांच्या
ही खुसखुशीत दु:खे यांना बहाव नाही !
किंवा
ओथंबली दु:खे पडद्यात आसवांच्या
ती खुसखुशीत स्वप्ने.. त्यांना बहाव नाही !
कसे वाटते आहे आहे ?
----------------------------
बदल केले गेले नसले तरी शब्द आवडलेले आहेतच..
वाचनखुन साठवलेली आहे
30 Sep 2011 - 2:41 pm | उदय के'सागर
सुदंर रचना. काळजात भिडलं!
30 Sep 2011 - 3:03 pm | मेघवेडा
छान! पहिली द्विपदी विशेष! :)
30 Sep 2011 - 4:15 pm | निवेदिता-ताई
सुंदर
30 Sep 2011 - 5:25 pm | जाई.
कविता आवडली
1 Oct 2011 - 7:26 am | अत्रुप्त आत्मा
फुलतो अजून येथे हा मोगरा टपोरा
केसांत माळण्याचा.....उरला सराव नाही ! ह्यो बान अगदी काळजात आरपार बसला हो उदय भाऊ...
निमित्त अगदी हेच असं म्हणता येत नाही,पण तरी गालीबचा एक शेर अठवला-
उनके देखेसे जो आती है मुह पर रौनक
वो समझते है के बीमार का हाल अच्छा है...
30 Sep 2011 - 5:44 pm | सुहास झेले
वा वा... छान !! :)
30 Sep 2011 - 6:00 pm | भाऊ पाटील
छान आहे...
पण 'खुसखुशीत दु:ख'' काही झेपले नाही राव ! काहीतरी खटकते आहे.
अर्थात कवितांच्या बाबतीत आम्ही औरंगजेब आहोत ही गोष्ट वेगळी :)
30 Sep 2011 - 9:30 pm | राघव
मस्त रचना. :)
राघव
30 Sep 2011 - 11:52 pm | पल्लवी
शेवटचे कडवे अतिशय आवडले ! :)
3 Oct 2011 - 10:25 am | मदनबाण
छान कविता... :)