वार्धक्याला शाप असतो जगण्याचा ...!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
30 Sep 2011 - 8:12 am

हळूहळू दिवस संपून जातात तारुण्याचे
नि अलगद येतात दिवस वार्धक्याचे
जात नाहीत दिवस
ठाम थांबून राहतात
बंद पडलेल्या घड्याळासारखे ...!!

तो पक्षासारखा
अलगद उतरलाय ह्यां परक्या
अनोळखी शहरात
नि बघत बसलाय
ह्या निसर्गाची झिम्म बरसात

येथे नाहीत कोमेजत फुले
टांगून ठेवतात फुलांचे ताटवे
सुबक सुंदर खांबावर
तसेच हे म्हातारपण
लोंबत असते आयुष्याला
झिजलेले हाडे सांभाळीत ......
ह्यांच्या साठी असतात छोट्या बाबा गाड्या
हलके हलके धावत असतात
मागे झेंडा लावून
म्हातारपण गोंजारीत बसतात ...!

तो बघत बसतोय ही म्हातारी माणसे
गोर्या कातडीची घार्या डोळ्याची
ह्यांची सिनियर सिटीझंसची घरे
सकाळी ,संध्याकाळी
शून्य नजरेने बघत बसतात
हे लॉन
ही झाडे ,
हे शांत पक्षी ..!
नि हलकी रेंगाळत जाणारी वाहने
शून्य नजरेने ....!!
आभाळात नजर लावून बसतात
वरच्या आभाळातील बाप्पाची
आज किंवा उद्या येणार्या त्याच्या निरोपाची .
त्या घोळक्यात तो सामील झालाय
मोकळ्या मनाने
शांतपणे ..येणार्या निरोपाची ....!!

करुणकविता

प्रतिक्रिया

मन१'s picture

30 Sep 2011 - 8:39 am | मन१

वाचले. टोचले. पण मला वाटते उलट आहे....
वार्धक्याचा शाप असतो जगण्याला ...!!

नगरीनिरंजन's picture

30 Sep 2011 - 9:52 am | नगरीनिरंजन

खूप भिडणारी कविता आहे. छान!

मनोबांशी असहमत आहे. वार्धक्याला जगण्याचा शाप हेच बरोबर वाटतं.

छान

कविता चांगली जमलिये

छान कविता...
म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण !

छान आहे..

पण

आभाळात नजर लावून बसतात
वरच्या आभाळातील बाप्पाची
आज किंवा उद्या येणार्या त्याच्या निरोपाची .
त्या घोळक्यात तो सामील झालाय
मोकळ्या मनाने
शांतपणे ..येणार्या निरोपाची ....!!

या भागात काहीतरी मिसिंग आहे का? वाट पाहणे किंवा असा काही शब्द गळलेला वाटतो.

मराठी_माणूस's picture

30 Sep 2011 - 12:10 pm | मराठी_माणूस

संध्या छाया भिवविती हृदया ही ओळ आठवली

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Sep 2011 - 12:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अतिशय सुंदर रचना.
भट साहेबांची एक ओळ आठवली, "मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते"

@गवि,
माझ्या मते ते जाणून बुजून मिसिंग ठेवले आहे.

आभाळात नजर लावून बसतात
वरच्या आभाळातील बाप्पाची
आज किंवा उद्या येणार्या त्याच्या निरोपाची .

या ओळी त्याचे उत्तर आहे, आणि कवितेतील नायकाच्या मनातील संभ्रम नंतरच्या ओळींमध्ये

त्या घोळक्यात तो सामील झालाय
मोकळ्या मनाने
शांतपणे ..येणार्या निरोपाची

आणि नंतर येणारे "...!!" हे त्या वाट पाहण्याची तीव्रता दाखवते.

अच्छा.. असं..

धन्यवाद मिका..

पियुशा's picture

30 Sep 2011 - 3:53 pm | पियुशा

मस्त हो प्रकाशजी :)

अविनाशकुलकर्णी's picture

30 Sep 2011 - 4:44 pm | अविनाशकुलकर्णी

अनारोग्य.. निर्धनता.. न पुर्ण झालेल्या जबाब दा~या.. न फिटलेले कर्ज..कोर्ट कचे~या....सथिदाराचा मृत्यु..
असेल तर हा शाप आणखिनच भयावह वाटतो

प्रकाश१११'s picture

2 Oct 2011 - 10:54 pm | प्रकाश१११

येथे परदेशात मी बघतोय सिनियर सिटीझनची घरे ,ईमारती
बिल्डीगच्या आवारात १०-१२ खुर्च्यावर ही सकाळ संध्याकाळ बसलेली असतात .
वय जवळ जवळ ७५-८० च्या आसपास .शांत बसलेली असतात . फूटपाथवर
एखादा म्हातारा छोट्या गाडीवर बसून फिरताना दिसतो.
हे सगळे बघून हे सुचून गेले.
आपणा सर्वांचे मनापासून आभार .!!