उत्तरायण

प्रिया ब's picture
प्रिया ब in जे न देखे रवी...
29 Sep 2011 - 3:03 pm

'उत्तरायण' हा मराठी चित्रपट पाहिल्यानंतर लिहाव्या वाटलेल्या काही ओळी :

"दुर्गी करशील का गं माझ्याशी लग्न ?"
"खूप उशीर झाला रे रघू ...सगळ्या गोष्टी वेळेत व्हाव्या हेच होतं एक स्वप्न "
"माझा जीव होता आधीपासून तुझ्यावर"
"कधीच कळलं नाही रे; नसता सोसावा लागला घडलेल्या गोष्टींचा भार"
"अजूनही वेळ नाही गेली उरलेले क्षण वेचत करू एकत्र प्रवास"
"आयुष्याची संध्याकाळ झाली .. नको इतरांना आपल्या नवीन नात्याचा त्रास"
"पुष्कळ भोगून झालंय तुझं .. उरलेल्या संध्येला तरी न्याय देऊ"
"भिती वाटते मला सुखाची.. अगदीच खचून जाऊ"

"जाऊ आपण दूर कोठे .. दु:खालाही न कळे वाट..
नव्या किरणांनी सुरू करू आयुष्याची नवी पहाट "

चित्रपट

प्रतिक्रिया

daredevils99's picture

29 Sep 2011 - 3:05 pm | daredevils99

कविता बरी आहे.