...तुझ्या अस्तित्वाची ओळखीची खुण

विकाल's picture
विकाल in जे न देखे रवी...
27 Sep 2011 - 1:31 pm

हे रिकामं घरं.....
तुझ्या असण्याची ओळख पटवत राहतं....

तुझ्या अस्तित्वाच्या न पुसल्या जाणार्या अमिट खुणा..
ती सोनचाफ्यासारखी पावलं...
अनं ओघळतं गेलेलं दरवाज्यापर्यंतच हसू....!!
तुझं नसणं पण कदाचित तुझ असणंच दाखवतं......!!

ओळखीच्या क्षणांनाही मी दिला नाही मागमूस....
तुझ्या या नसण्याचा...
बिलगत अनोखे ल्यात अपूर्व भान...
आहोत जवळी अजून असाच तो भाव....!!!

दारातला मोगरा अजूनही तसाच फुलतो..
समजावू का त्या निष्पाप कळ्यांनां...?
आता तू नसतेस इथे म्ह्णून...!!
पणं त्या फुललेल्या मोगर्यापरी तुझ येणं ते...?

पारिजातक ही फुलतो अजून...
निशिगंधाच्या सुवासाला वाट देत...!
त्यांना नाही माहितं.. तू नाहीस ते...
पणं पाणि घालतानां ते कोमल हात दिसतं नाहीतं ईतकंच...!!

का जाणवते मल ती जीवघेणी पायरव...
ती तुझ्या अस्तित्वाची ओळखीची खूण...
अनं आभास तुझ्या असण्याचा..
पोकळीतून ज्या तूच निर्माण केली आहेसं...
कधी न भरून येण्यासाठी...
अन तीच तुझ्या अस्तित्वाची खूणं..
अन तेच तुझं ते नसणं...
जे असण्याची चाहूल देतं राहतं...सदैव..!!

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Sep 2011 - 2:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अतिशय सुंदर झाली आहे रचना.
मांडणीकडे अजून लक्ष दिले असते जरा अजून जास्त परिणामकारक झाली असती असे वाटून गेले.
तसे मिपावर शुद्धलेखनाची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही, पण तरीही काही काही चुका रसभंग करतात, जसे

आता तू नसतेस ईथं म्ह्णून...!!

च्याऐवजी

आता तू नसतेस इथे म्हणून...!!

असे असते जर शुभ्र बासमती तांदुळात खडा लागला नसता.

मनीषा's picture

27 Sep 2011 - 3:14 pm | मनीषा

अन तेच तुझं ते नसणं...
जे असण्याची चाहूल देतं राहतं...सदैव..!!

सुरेख ... सुंदर कविता !

जाई.'s picture

27 Sep 2011 - 6:30 pm | जाई.

सुंदर काव्य

पाषाणभेद's picture

28 Sep 2011 - 12:23 am | पाषाणभेद

सुंदर काव्य आलेले आहे. वहिनी माहेरी गेल्यात का?

विकाल's picture

28 Sep 2011 - 9:40 am | विकाल

वहिनी नाहीतच ओ पाभे...!!