वितळवूनी दिशा ह्या सार्या
आभाळ हृदयात साचे
दाटून आल्या घनसावळ्या
विश्वास मन टिपून वेचे
मेघांना सावरलेल्या
त्या पापण्या सावलीच्या
आठवणी डोळ्यात फुललेल्या
विसरून पाकळ्या क्षणांच्या
तळ्याच्या पटलावरती
दिसे रांग बदकांची
आईच्या मागेपुढती
वसे झिंग पिल्लांची
मग सरून जाते सारे
उरे जीव उदास उदास
फाटक्या झोळीत तारे
सरे रात ह्या दिसास
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२६/०९/२०११)
प्रतिक्रिया
26 Sep 2011 - 11:53 am | मदनबाण
सुंदर कविता... :)
26 Sep 2011 - 12:41 pm | गणेशा
अतीसुंदर काव्य .....
खुप दिवसानी आलात हो ?
26 Sep 2011 - 2:10 pm | गवि
कविता नॉर्मल स्टँडर्डने चांगलीच आहे. हळुवार आणि आर्द्र किंवा तत्सम. कौतुक खूप केलं असतं.
पण तुझ्याकडून पूर्वी सेट झालेल्या अपेक्षेला नाय बा उतरत मित्रा.. असा माझा प्रॉब्लेम आहे.
26 Sep 2011 - 2:50 pm | निवेदिता-ताई
छानच..
26 Sep 2011 - 6:25 pm | अत्रुप्त आत्मा
तळ्याच्या पटलावरती
दिसे रांग बदकांची
आईच्या मागेपुढती
वसे झिंग पिल्लांची........... अप्रतिम....
27 Sep 2011 - 1:06 am | पाषाणभेद
निसर्गकवी मिका, छान काव्य आहे.
27 Sep 2011 - 4:29 am | प्रकाश१११
मी.का. -छान आणि सुरेख कविता
मेघांना सावरलेल्या
त्या पापण्या सावलीच्या
आठवणी डोळ्यात फुललेल्या
विसरून पाकळ्या क्षणांच्या
27 Sep 2011 - 11:08 pm | चित्रा
शेवटचे कडवे अधिक जमले आहे आणि परिणामकारक आहे असे वाटले. (कवितेतले कळते असा दावा नाही).