BEHIND EVERY FORTUNE THERE IS A CRIME

चेतन सुभाष गुगळे's picture
चेतन सुभाष गुगळे in काथ्याकूट
21 Sep 2011 - 4:41 pm
गाभा: 

अनेकदा आपल्याला एखाद्या गोष्टीची उजळ बाजूच ठाऊक असते पण या उजळतेची काळी पार्श्वभूमी आपल्याला कळली तर किती धक्का बसतो याची उदाहरणे इथे देत आहे.

http://beftiac.blogspot.com/

एका चित्रपटाच्या निर्मितीखर्चात दोन चित्रपट
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_21.html

अशोक कुमार यांनी चित्रपटनिर्मिती करायला घेतली तेव्हा त्यांनी आपल्याच राज्यातील एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाला संधी दिली. त्या दिग्दर्शकानेही या संधीचे सोने केले आणि सुंदर चित्रपट बनविला परिणीता पण त्याबरोबरच अशोककुमार यांनी चित्रपटनिर्मितीकरिता दिलेल्या आर्थिक स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत स्वत:च्या आवडीचा अजून एक चित्रपट अशोककुमार यांच्या पैशातूनच बनविला जो प्रचंड गाजला. त्यांनी खोटे हिशेब दाखवून परिणीताच्या निर्मितीखर्चात गाळा मारून अशोक कुमार यांची फसवणूक करून हे कृत्य केले होते. दिग्दर्शक बिमल रॊय यांच्या दो बिघा जमीन या चित्रपटाची ही चक्रावून टाकणारी निर्मिती कथा अशोक कुमार यांनी त्यांच्या जीवननैया या आत्मचरित्रात्मक पुस्तकात नमूद केली आहे.

डोळ्यात येते पाणी
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_633.html

१९६२ साली आपण चीन सोबत चे युद्ध हारलो तरी आपले जे जवान सीमेवर लढले त्यांचे मनोधैर्य उंचावण्याकरिता आणि जे रणांगणात शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता सरकारी पातळीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या समारंभाला साजेसे एक गीत बसविण्याची जबाबदारी संगीतकार सी. रामचंद्र यांच्यावर देण्यात आली. हे गीत लता मंगेशकर गाणार हे निश्चित झाले तरी ते लिहीणार कोण हा प्रश्न होताच. तेव्हा सर्व नामवंत गीतकार चित्रपटासाठी गीत लिहीण्यात व्यग्र होते अचानक सी. रामचंद्र यांच्यासमोर कवी प्रदीप यांचे नाव आले. कवी प्रदीप यांच्या तत्वज्ञानानी भारलेल्या गीतांना व्यावसायिक चित्रपटात फारशी मागणी नव्हती त्यामुळे सी. रामचंद्रांनी त्यांचेकडून बरेच दिवसात कुठलेही गीत लिहून घेतले नव्हते. जेव्हा या सरकारी कार्यक्रमाकरिता गीताची मागणी रामचंद्रांनी प्रदीप यांचेकडे केली तेव्हा कवी प्रदीप उसळून म्हणाले, "मानधन मिळायचे असेल तेव्हा तुम्हाला माझी आठवण येत नाही आणि अशा फुकटछाप सरकारी कार्यक्रमाकरिता मी गीत लिहून द्यावे असा तुमचा आग्रह का? मी हे काम मुळीच स्वीकारणार नाही."

मोठ्या कष्टाने सी. रामचंद्र यांनी कवी प्रदीप यांची समजूत काढण्यात यश मिळविले आणि सरतेशेवटी त्यांच्याकडून एक लांबलचक गीत लिहून घेतलेच. ऐ मेरे वतन के लोगो, जरा आंखमे भरलो पानी या गीताची ही सून्न करणारी बाजू काही वर्षांपूर्वी लोकसत्तात वाचली आणि एका वेगळ्याच अर्थाने डोळे भरून आले.

आता एक उलट उदाहरण (म्हणजे काळ्या प्रकरणाची रूपेरी बाजू)
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_1435.html

२००४ सालच्या विधानसभा निवडणूकीनंतर लोकसत्ता ने त्यांच्या वाचकांसाठी एक स्पर्धा घोषित केली सरकारकडून माझ्या अपेक्षा या विषयावर लेख लिहायचा. निवडक लेखकांना थेट मुख्यमंत्र्यांशी एक तास चर्चा करायची संधी असले भन्नाट बक्षीस होते. माझा लेख (http://www.loksatta.com/daily/20041224/lviv02.htm) ही निवडला गेला आणि जानेवारी २००५ मध्ये वर्षा बंगल्यावर श्री. विलासराव देशमुखांच्या माझ्या सह इतर आठ पत्र लेखकांनी भेट घेतली (http://www.loksatta.com/daily/20050121/mp03.htm). चर्चेच्या दरम्यान देशमुख साहेब अगदी रंगात येऊन एक किस्सा सांगू लागले.

ते म्हणाले, "तुम्हाला वाटतं, पण बरेचदा आम्हा राजकारणी लोकांना देखील नोकरशाहीचा भोंगळ कारभार दिसतो पण त्याविरुद्ध काही करता येत नाही. मागे एकदा मी शिक्षणमंत्री असताना माझ्या हस्ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचा कार्यक्रम झाला. पुस्तक मिळाल्याची पोच म्हणून त्या कार्यक्रमात चक्क विद्यार्थ्यांचा अंगठा उमटवला जात होता. चौथीच्या विद्यार्थ्याचा अंगठा का घ्यावा का लागतो? त्याला सही करता येत नाही का? आणि तसे असेल तर मग तो विद्यार्थी वाचणार तरी काय? तर हे सगळे असे असून ही मी संबंधित अधिकार्‍याला जाब विचारू शकलो नाही कारण मलाही मर्यादा होत्या आणि आहेत."

एवढे बोलून देशमुखसाहेब थांबले. सर्व पत्र लेखक थक्क झाले होते. स्वत: मुख्यमंत्री च प्रशासनाविरुद्ध बोलत होते ही अतिशय catchy बाब होती.

त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन त्यांना याच प्रकरणाची दुसरी बाजू ऐकविली ती अशी:-

मी म्हणालो, "सर, आपण जसे पुस्तक वाटप केले होते अशाच एका कपडे / अन्न वाटप कार्यक्रमात बिहार येथे मी एक निरीक्षक या नात्याने एका सेवाभावी सामाजिक संस्थेतर्फे काम पाहिले होते. या कार्यक्रमात देखील ज्यांना वस्तूचे वाटप करण्यात आले अशांपैकी अनेक लहान मुले व स्त्रिया यांना लिहीता वाचता येत असूनही आम्ही त्यांना स्वाक्षरी करू दिली नाही व त्यांच्या अंगठ्याचे ठसे च नोंदीकरता घेण्यात आले कारण या नव्याने अक्षर ओळख झालेल्यांना स्वाक्षरी करायला दोन ते तीन मिनीटे लागतात आणि वाटप ज्यांच्या हस्ते व्हायचेय अशा व्यक्ती आपल्या सारख्याच मोठ्या पदावरील असल्याने त्यांना फारसा वेळ नसतो. अंगठा लावण्याचे काम काही सेकंदात होते म्हणून ते जास्त व्यवहार्य ठरते. तेव्हा याचा अर्थ असा नव्हे की ज्या विद्यार्थ्यांना आपण पुस्तके वाटली ती निरक्षर होती. तरी कृपया आपण संबंधित अधिकार्‍यांविषयी कुठलाही आकस मनात बाळगू नये व त्यांची अडचण समजून घ्यावी ही विनंती."

माझ्या या उत्तराने सारेच चकित झाले व मुख्यमंत्र्यांनीही आपल्याला ही माहिती नवीन व मोलाची वाटली असल्याचे कबूल केले त्याचप्रमाणे ते वस्तुस्थितीशी सहमत झाले..

खरं कारण काय?
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_8212.html

नोकरीनिमित्ताने केलेल्या माझ्या बेळगावच्या वास्तव्यादरम्यान माझा सिमेन्स, मुंबईच्या एका अधिकार्‍याशी परिचय झाला. हे गृहस्थ (ह्यांच्या नावाची इनिशिअल्स एसबी. पुढे ह्यांचा असाच उल्लेख केला जाईल) मोठे रसिक आणि कलासक्त (आणि मुख्य म्हणजे देव आनंद चे ग्रेट फॆन) त्यामुळे आमच्या गप्पा मस्त रंगायच्या. कलाक्षेत्रातल्या अनेक मंडळींना ते जवळून ओळखतात हे मला त्यांच्याशी बोलताना समजले. त्याचे कारण विचारताच त्यांनी सांगितले ती अमूक एक गायिका - ती ह्यांची आत्या (इथे नाव लिहीत नाही पण पुढे जे वर्णन येईल त्यावरून चाणाक्ष वाचक ओळखतीलच म्हणा..).

आता एसबी साहेबांचा स्वभाव एकदम मनमोकळा त्यामुळे माझ्या मनात अनेक वर्षांपासून खदखदत असलेला प्रश्न त्यांना विचारावा असे मला वाटले. आणि अगदी सहजच बोलल्यासारखा मी त्यांना म्हणालो, "एसबी साहेब, तुमच्या आत्याचा आवाज अगदी हुबेहूब लता मंगेशकरांसारखा आहे, पण लताजींच्या तूलनेत त्यांनी फारच थोडी गाणी गायलीत. गेली अनेक वर्षे मी असं ऐकत / वाचत आलोय की लताजींनी राजकारण करून तुमच्या आत्याबाईंना पुढे येऊ दिलं नाही. याशिवाय काही काळापूर्वी वर्तमानपत्रात तुमच्या आत्याबाईंची मुलाखत वाचली तेव्हा त्यांनी या गोष्टीचा साफ इन्कार केलाय. त्या म्हणतात ’माझ्या व्यावसायिक पिछाडी बद्दल दुसर्‍या कुणाला जबाबदार धरले जाऊ नये. मी मागे पडले कारण माझे लग्न झाले, संसार चालु झाला. ज्याप्रमाणे एखादी नोकरी करणारी स्त्री लग्नानंतर प्रापंचिक जबाबदार्‍यांमुळे नोकरी सोडते तितक्याच सहजतेने मी गाणे सोडले’. मग आता तुम्हीच सांगा खरं कारण काय? तुमच्या आत्याबाईंची कारकीर्द नेमकी कशामुळे संपुष्टात आली?"

एसबी साहेब उत्तरले, "त्याचं असं आहे चेतन, ही दोन्ही कारणं तितकीच खोटी आहेत. खरी गोष्ट अशी की आमच्या आत्याचे नाव त्याकाळच्या एका नामांकित हिन्दी-मराठी चित्रपटांच्या संगीतकाराबरोबर (यांचंही नाव इथे मी लिहू शकणार नाही पण वाचक अंदाज लावू शकतात) जोडले जाऊ लागले होते व त्यात काही प्रमाणात तथ्यदेखील होते याची प्रचीती आल्यावर आत्याच्या यजमानांनी आमच्या आत्याचं गाणं बंद करायला लावलं. आता आमची आत्या मुलाखतीत तिची व्यावसायिक कारकीर्द संपुष्टात येण्याच हे खरं कारण कुठल्या तोंडानं सांगणार?"

हुशार विद्यार्थी (?)
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_8435.html

वर्तमानपत्रात कुठल्याही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल काही छापून आलं की माझी आई ते मला मुद्दाम वाचून दाखविते मग त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, त्या विद्यार्थ्यांना काहीच साधन उपलब्धता नसताना त्यांनी मिळविलेलं अपार यश आणि त्या तूलनेत माझ्याकडे सारं काही असताना मी कसा अपयशी वगैरे गुर्‍हाळ दोन चार दिवस तरी आमच्या घरी चालतंच.

एकदा असंच पेपरात नाव आलं कचरू वाघ या विद्यार्थ्याचं. या गरीब विद्यार्थ्याने दिवसभर कष्टाची कामे करून, रात्रशाळेत अभ्यास करून बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलं होतं. झालं.. कचरूच्या नावाचा जप आमच्या घरी चालु झाला. अर्थात ह्यावेळी जप दोन दिवसातच थांबला कारण वर्तमानपत्राच्या पुढच्याच अंकात बातमी आली ती अशी की कचरूने स्वत: पेपर लिहीलेच नव्हते तर स्वत:ऐवजी पूर्णवेळ शिक्षण घेतलेल्या एका हुशार अल्पवयीन विद्यार्थ्याकडून ते लिहून घेतले होते.

पुढे काही काळानंतर अशीच एका पुण्यातल्या विद्यार्थिनीची (तिचं नाव आता आठवत नाही) बातमी आली - ती सीए ची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची. तिचे लगेच सत्कार वगैरे ही झाले पण दोन दिवसानंतर उघड झालं की ती प्रत्यक्षात अनुत्तीर्ण झाली होती तरी तिने खोटे निकालपत्र वगैरे गोष्टी अगदी व्यवस्थित पैदा केल्या व सर्वांना दोन दिवस चकविले.

या सर्वांवर कडी म्हणजे विद्या प्रकाश काळे ही युवती. ही प्रत्यक्षात खरोखरच अतिशय हुशार आहे. आता ही साधारण पस्तीशीची असेल पण वयाच्या जेमतेम अठराव्या वर्षापासून ती चोर्‍या करण्यात पटाईत आहे. वेळोवेळी तुरूंगात ही गेली आहे तर अनेकदा पोलिसांना तिने गुंगारा ही दिला आहे. आता तिने स्वत:ची मोठी टोळीही स्थापन केली आहे. तुरूंगातील वास्तव्यात तिने आपल्या हुशारीच्या जोरावर कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले आहे. अर्थात वकील झाल्यावर ती पुढे अनेकदा पोलिसांकडून पकडली गेली असली तरी तिला फारशी कडक शिक्षा होऊ शकली नाही याचे सारे श्रेय तिच्या वकिली कौशल्याला जाते.

तिच्या विषयीची एक बातमी तुम्ही इथे वाचू शकता :-

http://72.78.249.126/esakal/20100522/5736895754452919648.htm

इतर अनेक चोर्‍यांप्रमाणे हिने वय देखील चोरलेले दिसतंय.. बातम्यांमध्ये वय कमी दाखवलंय..

http://www.punenews.net/2010/05/lawyer-woman-run-gang-arrested-for.html

http://www.expressindia.com/latest-news/woman-among-five-arrested-for-ro...

http://news.in.msn.com/crimefile/article.aspx?cp-documentid=3924613&page=10

http://news.indiainfo.com/c-83-144953-1263496.html

विद्याचा सुरूवातीच्या काळातील पराक्रम (मोटरसायकलकरिता लहान मुलीचे अपहरण):-

http://www.indianexpress.com/ie/daily/19971213/34750503.html

काव्या विश्वनाथनची वाङ्मयचोरीची कबुली
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_596.html

काव्या विश्वनाथन या किशोरवयीन भारतीय वंशाच्या लेखिकेने आपण वाङ्मयचोरी केल्याचे कबूल केले आहे. तिच्या 'हाऊ ओपल मेहता गॉट किस' आणि 'गॉट वाइल्ड अँड गॉट अ लाइफ' या पुस्तकाचे हक्क अमेरिकन प्रकाशन कंपनी लिटल ब्राऊनने पाच लाख डॉलरना खरेदी केल्यानंतर अनेक वृत्तपत्रांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली होती.

परंतु तिच्या या पुस्तकांचे मेगॅन एफ मॅककॅर्फ्टी यांच्या 'स्लोपी र्फस्ट्स' आणि 'सेकंड हेल्पिंग' या दोन्ही पुस्तकांशी सार्धम्य असल्याचे उघडकीस आल्याने काव्याने आपली वाङ्मयचोरी कबूल केली. परंतु, ते योगायोगाने घडून आले, शाळेत असताना ही पुस्तके वाचल्याने लिहिताना त्यातील भाग अनवधानाने आला, अशी पुस्तीही तिने जोडली.

ही वर्ष २००६ ची घटना आहे.

दैनिक लोकसत्तामधली बातमी इथे वाचा (प्रथम फॊन्ट लोड करून घ्या):-

http://www.loksatta.com/old/daily/20060427/mp05.htm

चतुर गुन्हेगाराने नामवंत महिला पोलीस अधिकार्‍याला चकविले.
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_22.html

बिकीनी किलर या नावाने कुप्रसिद्ध असणारा चार्ल्स शोभराज गुन्हेगारी पेक्षाही जास्त स्मरणात राहिला तो त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळेच. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी चार्ल्स दिल्लीच्या तिहार तुरुंगात होता तेव्हा त्याच्या संभाषण कौशल्याने साक्षात किरण बेदी देखील अतिशय प्रभावित झाल्या. त्यांनी त्याला त्याच्या ज्ञानाचा (?) प्रसार करण्यासाठी इलेक्ट्रॊनिक टाईपरायटरसह इतर अनेक अद्ययावत सुविधा तुरूंगात पुरविण्याची व्यवस्था केली. तरी बरं त्याकाळी संगणक किंवा इंटरनेट नव्हता नाहीतर या गोष्टीदेखील त्याला सहज मिळाल्या असत्या. प्रत्यक्षात काहीही लिखाण वगैरे न करता या महाभागाने तुरूंगातील आपलं वास्तव्य फक्त आरामदायी करून घेतलं. आपल्याला चार्ल्सने बनविले हे किरण बेदींच्या फारच उशिरा लक्षात आले.

आणि धर्मराज युधिष्ठिरानेही अधर्माचीच साथ दिली

http://beftiac.blogspot.com/2010/10/blog-post_26.html

२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांमध्ये कॊंग्रेसने मिळविलेल्या यशाला पंतप्रधानांनी केलेले मतदारांचे ब्लॆकमेलिंग कारणीभूत?

अंतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त झालेल्या कॊंग्रेस - राष्ट्रवादी कॊंग्रेसला आपण पुन्हा निवडून येऊ शकू का ही चिंता सतावत होती पण ऒक्टोबर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात या आघाडीत गेल्या वीस वर्षात मिळाल्या नाहीत इतक्या भरघोस जागा मिळविल्या आणि पुढच्या पाच वर्षांकरिता एका अतिशय स्थिर सरकारची स्थापना झाली पण त्यांच्या यशामागचे रहस्य तसे दुर्लक्षितच राहिले.

नेहमीप्रमाणेच यावेळीही प्रचारात अनेक नेत्यांनी सवंगपणाची पातळी ओलांडली. जे नेते कायमच असे बोलतात त्यांची उदाहरणे मी पुन्हा देणार नाहीय पण ज्यांच्याकडून अधिक समंजसपणाची अपेक्षा होती त्या माननीय पंतप्रधान श्री. मनमोहन सिंगांनीही असे बेजबाबदार वक्तव्य करावे म्हणजे कळस झाला. सतरा पोलिसांचे बळी घेणार्‍या नक्षलवाद्यांवर लष्करी कारवाई करणार नाही. विकासाची गंगा त्यांच्या दारी न पोचल्याने परिस्थितीमुळेच ते नक्षलवादी झाले आहेत. असे वक्तव्य करून पंतप्रधानांना नेमके काय सूचित करायचे होते? ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा सार्‍यांनीच शस्त्रे हाती घ्यावीत का, म्हणजे सरकार त्यांच्यावर कारवाई न करता चर्चेला तयार होईल? शिवाय नक्षलवाद्यांशी एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढणार्‍या पोलिसांच्या मनोधैर्याचे काय? पुढे जाऊन पंतप्रधान असेही म्हणाले की जर राज्यात पुन्हा कॊंग्रेसचे सरकार आले तर केन्द्राकडून राज्याला भरघोस मदत दिली जाईल. (वाचा लोकसत्ता दि. १२ ऒक्टोबर २००९ च्या अंकातील मुखपृष्ठावरील बातमी) म्हणजे मतदारांनी दुसर्‍या पक्षाला मत देऊन सत्तेवर बसविले असते तर केन्द्र सरकार महाराष्ट्राची कोंडी करणार होते असाच अर्थ या विधानातून निघत नाही का? आचारसंहिता किंवा कायद्याचा मुद्दा बाजुला ठेवला तरी हे राज्यातील जनतेचे ब्लॆकमेलिंग करणारे विधान नैतिकतेच्या कसोटीवर तरी टिकणारे होते काय?

अर्थात १३ ऒक्टोंबर २००९ ला झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये पंतप्रधानांच्या या वक्तव्याने आपली जादु दाखवलीच आणि कॊंग्रेस आघाडी पुन्हा एकदा जोमाने राज्यात सत्तेवर आली.

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

21 Sep 2011 - 4:58 pm | सुहास झेले

अनेकदा आपल्याला एखाद्या गोष्टीची उजळ बाजूच ठाऊक असते पण या उजळतेची काळी पार्श्वभूमी आपल्याला कळली तर किती धक्का बसतो याची उदाहरणे इथे देत आहे.

http://beftiac.blogspot.com/

काय प्रतिक्रिया देऊ??? अंमळ गोंधळलोय ;-)

प्रतिक्रियेसाठी जागा राखून ठेवतो...!!!

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Sep 2011 - 5:34 pm | चेतन सुभाष गुगळे

<< काय प्रतिक्रिया देऊ??? अंमळ गोंधळलोय >>

काही हरकत नाही. निवांत येऊ द्या.

<< प्रतिक्रियेसाठी जागा राखून ठेवतो...!!! >>

हे काही मला समजलं नाही. (म्हणजे प्रतिक्रियांच्या संख्येवर काही मर्यादा असतात का? मला याविषयी काही ठाऊक नाही म्हणून विचारतोय?)

वपाडाव's picture

21 Sep 2011 - 5:48 pm | वपाडाव

मारलंत बुच त्याला.....
अहो, प्रतिक्रियेसाठी जागा राखुन ठेवणे म्हणजे त्याखाली आपण हा जो प्रतिसाद दिलाय तसा न देणे....
पुढील वेळेपासुन लक्षात ठेवा म्हणजे झालं.....

अहो, पुन्हा तुम्ही त्यांचं जीवन इथे उघडे करुनच दाखवताय ना....
नुसते ए. बी. सी. वापरुनही तुम्हाला ( गायिका प्रसंग ) पात्रांच्या ओळखी करुन देता आल्या असत्या ना...
मग कशाला उगाच सर्वांची नावे घेण्याच्या कष्टात पडता अन आम्हाला पाडता....
एकदम खटक्लंय हे असं दुटप्पी बोलणं...
म्हणजे नाव घेत नाही म्हणुन कबुल करुन पुन्हा हिंट्स देत राहायच्या....

बाकी, तुम्ही चांगले लिहिता हे खुप वेळा सांगितलेलेच आहे....
हाही लेख जमुन आलाय, फक्त ते जरा नावं काढायचं बघा.....

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Sep 2011 - 8:44 pm | चेतन सुभाष गुगळे

<< मग कशाला उगाच सर्वांची नावे घेण्याच्या कष्टात पडता अन आम्हाला पाडता....
एकदम खटक्लंय हे असं दुटप्पी बोलणं...
म्हणजे नाव घेत नाही म्हणुन कबुल करुन पुन्हा हिंट्स देत राहायच्या.... >>

मला अशी इच्छा आहे की ही सर्वच नावे वाचकांना समजावीत, पण त्यापैकी जी मी थेट लिहू शकत नाहीत ती वाचकांनी समजून घ्यावीत या करिता अशा हिंट्स दिल्या गेल्या आहेत.

तुम्ही मुंबई बंद हे पुस्तक वाचलंय का? त्यात जयंत रानडे यांनी सुपरस्टार, हिंदु सेना, असे कोणालाही सहज समजतील असे शब्द वापरून भल्याभल्यांची पोल खोललीय.

हीच माझी या लेखामागची प्रेरणा (त्यात तर एका बलाढ्य उद्योगपतीने दुसर्‍या उद्योगपतीच्या खुनाची सुपारी दिल्याचा प्रसंग अगदी कोणालाही समजेल असा लिहीलाय).

<< बाकी, तुम्ही चांगले लिहिता हे खुप वेळा सांगितलेलेच आहे....
हाही लेख जमुन आलाय, फक्त ते जरा नावं काढायचं बघा..... >>

धन्यवाद. नावे काढून काही फरक पडणार आहे का? माझा हा लेख माझ्या ब्लॉगवर आणि दुसर्‍या एका संकेतस्थळावर देखील प्रकाशित झालाय.

ह्म्म! माहिती नसली किस्से वाचायला मिळाले.

ह्म्म! माहिती नसली किस्से वाचायला मिळाले.

समीरसूर's picture

21 Sep 2011 - 5:54 pm | समीरसूर

वेगळा आणि रोचक. थोडं गॉसिपींग असल्याने मजा आली वाचतांना.

गायिका कळली; मजनू संगीतकार कोण?

जाणकार प्रकाश टाकतील काय? हिंट द्या वाटल्यास...

मस्त!

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Sep 2011 - 8:09 pm | चेतन सुभाष गुगळे

इतर किस्से देखील पूर्ण पणे वाचावेत. इतकेच म्हणतो. बाकी आपणही सुज्ञ आहातच..

(बाकी.. कोणी असा क्लू मागितला म्हणजे तो देताना मला परिंदातला टॉम आल्टर आणि नाना पाटेकर मधला संवाद आठवतो)

समीरसूर's picture

22 Sep 2011 - 9:36 am | समीरसूर

इतर किस्से पूर्ण वाचले.

समीर

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Sep 2011 - 9:46 am | चेतन सुभाष गुगळे

मग उत्तर लक्षात आले असेलच.

प्रचेतस's picture

21 Sep 2011 - 6:54 pm | प्रचेतस

उत्तम लेख. बरीच माहिती समजली.

लेखाचे शीर्षक वाचून 'द गॉडफादर' या अविस्मरणीय चित्रपटाचे वा पुस्तकाचे परीक्षण आहे की काय असे सुरुवातीला वाटले होते.

जाई.'s picture

21 Sep 2011 - 7:03 pm | जाई.

नवीन माहिती कळली
किरण बेदीँचा किस्सा माहीत होता

फक्त वेळ वाचवा म्हणून अंगठा घ्यावा हे काही पटले नाही

त्या सीए विद्यार्थनीच पुढे काय झाल
इन्स्टिट्यूने काय कारवाई केली

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Sep 2011 - 11:50 am | चेतन सुभाष गुगळे

<< फक्त वेळ वाचवा म्हणून अंगठा घ्यावा हे काही पटले नाही >>

पण ही वस्तुस्थिती आहे खरी. मी स्वत: बिहार मधलं उदाहरण दिलं आहेच की. पाचशे लोकांचे अंगठे घेणं आणि सह्या घेणं या दोन्ही कार्यांच्या वेळात असणारी तफावत प्रचंड आहे. शिवाय नव्यानेच लिहायला शिकलेले लोक सही करायला अजूनच जास्त वेळ घेतात. याबाबत जरा अजुन सविस्तर माहिती देतो. हा किस्साही गंमतीदार असला तरी BEHIND EVERY FORTUNE, THERE IS A CRIME या सदरातच मोडण्या सारखा आहे.

तर बिहार मध्ये आम्ही जेव्हा अन्न व कपडे वाटप करीत होतो तेव्हा संस्थेचे कर्मचारी सर्वांचा अंगठा घेत होते. महिलांचा अंगठा घेताना तर खास बिहारी स्टाईलने हात दाबत खोडसाळ टिपण्णी ही करीत होते. त्या महिला बिचार्‍या हे सर्व सहन करीत होत्या, पण एका महिलेने कर्मचार्‍यांच्या ह्या गैरवर्तनाला विरोध दर्शविला. ती म्हणाली, "मै अंगुठा नही लगाऊंगी। मै लिख सकती हुं। हस्ताक्षर ही करूंगी।" तरीही कर्मचार्‍याने तिला पेन न देता तिच्या पुढे इंक पॅडच ठेवले. यावर ती महिला गर्दीचा बंदोबस्त करणार्‍या पोलिसाकडे बोट करून म्हणाली, "जानते हो। वह मेरे पती है। उनसे तुम्हारी शिकायत करूंगी तो नतीजा अच्छा नही होगा।" यावर धिटाईने तिचा हात पकडत आणि अंगठा इंक पॅड मध्ये टेकवित कर्मचारी अधिकच गुर्मीत उत्तरला, "खुशीसे करो। पहले तुम पर ही ऍक्शन होगा। पोलिस की बीवी होकर इस क्यू में क्यू खडी हो? यह अन्न और कपडे का दान गरीब / पीडित लोगोंके लिए है, तुम जैसोंके लिए नही।" यावर तिने काहीच प्रतिकार केला नाही. निमुटपणे अंगठा लावून कपडे व अन्न घेतले. (त्या अमेरिकन कपड्यांची व ५ किग्रॅ दूध भूकटीची किंमत तिच्या आत्मसन्मानापेक्षा जास्त असावी)

<< त्या सीए विद्यार्थनीच पुढे काय झाल
इन्स्टिट्यूने काय कारवाई केली >>

त्या मुलीने केवळ घरच्यांना खुश करण्याकरिता हे सर्व केले होते असे सांगितले, कारण ती अनुत्तीर्ण झाल्याचे कळल्यावर घरच्यांच्या संभाव्य प्रतिक्रियेची तिला भीती होती. तसेच इतर कुठल्या ठिकाणी (नोकरी वगैरे) अधिकृत रीत्या तिने तिचे बनावट गुणपत्रक सादर केले नसल्याने संस्थेने तिच्यावर कारवाई केली नाही. समज देऊन सोडून दिले.

सीए विद्यार्थिनीच स्पष्टीकरण विचारल कारण माझा भाउ सीए आहे
त्याच्या परीक्षा केन्दावर काँपीकेस पकडली असताना त्या विद्यार्थाला पुढील तीन परीक्षेकरता बँन करण्यात आलं होतं.
केवळ समज देउन सोडल हे त्या मुलीचं सुदैव

आपला मस्तपैकी घोटाळा झालेला आहे म्याडम....
त्या मुलीने कसलीही कॉपी केली असं काही चेसुगु यांनी सांगितलेलं नाहीये....
ती अनुत्तीर्ण झालेली होती... असं सांगितलंय.....
गेला बाजार, त्या खोट्या कागदपत्रांमुळे तिने काही नोकरी-बिकरी मिळविलेली नव्हती....
किंवा कसल्याही प्रकारचा लाभ घेतला नव्हता.... मग दंड करण्याचा प्रश्नच कुठे येतो.....
नाहीतरी, अनुत्तेर्ण झाल्यावर गळफास घेणे, जीव देणे व तत्सम आत्म्हत्येचे प्रकार बोकाळलेलेच आहेत....
ह्या मुलीने तसे काही केले असते तर ते परवडण्यासारखे होते का?

ह्याउलट, आपल्या भावाच्या केंद्रावर काही विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले असे आपण वर सांगितले आहे....
कॉपी करण्यापेक्षा फेल होणे चांगले असे नाही का वाटत आपल्याला.....

त्या मुलीला दंड झाला नाही हे चांगले झाल असच मला म्हणायच आहे
कारण बँन न करता तिला पुढच्या परीक्षेला बसायला मिळाल
तिला का बँन केलं नाही याबाबतीत मी रडका सूर काढलेला नाही
मी फक्त एक अनुभव सांगितला.
त्यामुळे उगाच डोक चालवू नका

आणि माझ्या मते तरी काँपी करणे आणि खोट्या प्रमाणप्रत्रिका सादर करणे दोन्हीही गंभीर गोष्टी आहेत.
हा माझा शेवटचा प्रतिसाद या धाग्यावरचा

मालोजीराव's picture

22 Sep 2011 - 11:32 pm | मालोजीराव

वप्या, मुलींना कॉपी करताना पकडला तर नेहमीच वॉर्निंग देऊन सोडून देतात, याउलट मुलाला पकडलं तर त्याची वाटच लागते. २-३ वर्षांसाठी बाहेर गेलाच समजा

- (सुसंगठीत कॉप्या करणारा) मालोजीराव

सीए विद्यार्थिनीच्या घटनेत तिने प्रथम खोटेपणाने बनावट गुणपत्रक तयार केले. ते पाहून कुटुंबीय खुश झाले. नंतर स्थानिक मंडळांनी तिचे तात्काळ सत्कार केले, वर्तमान पत्रांनी कौतुकाने वृत्त छापले आणि यानंतर तिचा खोटेपणा उघड झाला हा सगळा घटनाक्रम २ दिवसांतला आहे. त्यामुळे पहिल्या कौतुकाच्या बातमीनंतर पुन्हा खोटेपणा उघड झाल्याची बातमी ही केवळ २ दिवसांनंतरच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. या वृत्तात तिला स्थानिकांनी तसेच संस्थेच्या प्रतिनिधींनी येऊन समज दिल्याचे म्हंटले होते (तिच्या विरुद्ध पोलिसात जाण्याचे त्यांनी टाळले होते). परंतु त्यानंतर या सर्व घटनेचा सविस्तर अहवाल संस्थेच्या प्रतिनिधींनी संस्थेला (कारण संस्था दुसर्‍या शहरात होती) पाठविण्यास वेळ लागतो. तो मिळाल्यावर संस्थेच्या अधिकारी व्यक्तिंनी कदाचित तिला पुढील परीक्षांकरीता बंदीही घातली असू शकेल.

या विषयातला वृत्तपत्रांचा पुढील बातमी मिळविण्यातला रस संपल्यामुळे त्या संबंधित वृत्त प्रकाशित न होणे शक्य आहे.

फॉर्च्युन म्हटले की मोठाले उद्योगपती आठवतात. त्यांच्या मोठाल्या प्रॉपर्ट्या, विमानं, याटस्, पाच पन्नास गाड्या, मोठाले लग्नसमारंभ आणि त्याचे खर्च हे पाहून विचारशक्ती बंद पडते.
मला आधी वाटले कोणा श्रीमंत माणसाबद्दल धागा आलाय.;) उगीच चोर्‍या मार्‍या, खोटे बोलणे आणि परिक्षेत वरचा क्रमांक मिळवणे हे कंटाळवाणे वाटले. चार्ल्स शोभराजची माहिती इंटरेस्टींग! शाळेत अंगठा घेण्याबद्दल वाचून भुवया वर गेल्या. नुसती राजकारणी मंडळींना नावं ठेवून चालणार नाही. लोकही कमी फसवाफसवी करीत नाहीत.
गायिकेचा प्रसंग जरा गॉसिप सदरात मोडणारा आहे. नट नट्या, गायक, गायिका, खेळाडू यांची अफेअर्स, मानधन आणि अनेक गोष्टींची चर्चा नेहमीच चवीने वाचली जाते. खरंतर त्या बिचार्‍यांनाही वैयक्तिक आयुष्य असतं हे सहजपणे विसरलं जातं. हे जगभर होत असावं.
जर या गायिका ज्येष्ठ असल्या तर आता त्याची चर्चा होणे योग्य नव्हे! मनाने गुंतणे फारच आतली बाब आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Sep 2011 - 11:29 am | चेतन सुभाष गुगळे

<< खरंतर त्या बिचार्‍यांनाही वैयक्तिक आयुष्य असतं हे सहजपणे विसरलं जातं. हे जगभर होत असावं.
जर या गायिका ज्येष्ठ असल्या तर आता त्याची चर्चा होणे योग्य नव्हे! मनाने गुंतणे फारच आतली बाब आहे. >>

हे बरोबर आहे, पण वस्तुस्थिती ठाऊक नसल्याने अनेक जण या गायिकेची व्यावसायिक कारकीर्द खंडित होण्याबद्दल नाही नाही त्या अफवा उठवित होते आणि त्यामुळे लताजींसारख्या ज्येष्ठ आणि गुणवान गायिकेवर कळत नकळत अन्याय होत होता. निदान आता खरे कारण समजल्यावर कोणी लताजींना यात दोष देणार नाही अशी आशा वाटूनच मी हा किस्सा उद्धृत केलाय.

<< फॉर्च्युन म्हटले की मोठाले उद्योगपती आठवतात. त्यांच्या मोठाल्या प्रॉपर्ट्या, विमानं, याटस्, पाच पन्नास गाड्या, मोठाले लग्नसमारंभ आणि त्याचे खर्च हे पाहून विचारशक्ती बंद पडते. >>

होय असल्या फॉर्च्युनर मंडळींविषयी जितके लिहावे तितके कमीच आहे, तरी माझ्या मागच्या धाग्यावर मी यापैकी काहींचा उल्लेख केलाय. तसेच श्री. नितीन थत्ते यांनी अशांची एक यादीही सर्वांना सादर केलेली आहेच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Sep 2011 - 12:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>निदान आता खरे कारण समजल्यावर कोणी लताजींना यात दोष देणार नाही अशी आशा वाटूनच मी हा किस्सा उद्धृत केलाय.
पण तो दोष, सदर गायिकेने सांगितलेल्या व्हर्जन मध्ये पण जात होता. त्या गायिकेच्या अधिकृत मुलाखतीपेक्षा तुमचा किस्सा चटकदार आहे म्हणून लोक जास्ती विश्वासार्ह मानतील आणि लताजींना दोष देणार नाहीत असे म्हणायचे आहे काय ?

मुळात त्या SB न्नी तुम्हाला हे सांगताना, बाहेर कुठे हे सांगून माझ्या आत्याची बदनामी करू नका, असे सांगितले नव्हते काय ? (बऱ्याचदा हे सांगितले नसले तरी Implied असते (हे माझे व्यक्तिगत मत हो) )

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Sep 2011 - 1:02 pm | चेतन सुभाष गुगळे

<< मुळात त्या SB न्नी तुम्हाला हे सांगताना, बाहेर कुठे हे सांगून माझ्या आत्याची बदनामी करू नका, असे सांगितले नव्हते काय ? (बऱ्याचदा हे सांगितले नसले तरी Implied असते (हे माझे व्यक्तिगत मत हो) ) >>

नाही उलट तुम्ही आंतर जालावर इतके लेखन करताय तर ह्या गोष्टीलाही वाचा फोडा असेच त्यांनी सांगितले. त्यांनाही आत्याच्या अशा वागणुकीचा रागच आला होता (कारण सरळ आहे - आत्यांच्या यजमानांनी आत्यांच्या या वागणुकीमुळे आत्यांच्या माहेरच्या संस्कारांचाही उद्धार केला होता)

म्हणुन आंतरजालावर असं लिहुन स्वत:च्याच आत्याची बदनामी करायला सांगितली? काय मुर्ख माणुस आहे.
आणि असंच असेल तर त्यांच्या आत्याबरोबरच्या वैयक्तीक भांडणामुळे / हेव्यादाव्यामुळे ते असे खोटे किस्से सांगणार नाहीत कशावरुन? स्वतःच्याच आत्याची संपुर्ण जगात बदनामी करा असं सांगणार्‍या माणसावर विश्वास का ठेवा?

सिद्धार्थ ४'s picture

22 Sep 2011 - 11:11 pm | सिद्धार्थ ४

एकदम बरोबर. त्यातूनही मी जर य ला क्ष विषयी काही सांगितले, तरी य ला क्ष विषयी बाहेर जाऊन बदनामी करायचा हक्क कोणी दिला. ?

ती गाइका जर स्वत मुलाखती मध्ये सांगत असेल कि , लता मंगेशकर मुळे तिचे कॅरिअर संपलेले नाही तर गुगळे साहेबांनी हे कुठून शोधून काढले कि "लताजींसारख्या ज्येष्ठ आणि गुणवान गायिकेवर कळत नकळत अन्याय होत होता"

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Sep 2011 - 11:25 pm | चेतन सुभाष गुगळे

<< ती गाइका जर स्वत मुलाखती मध्ये सांगत असेल कि , लता मंगेशकर मुळे तिचे कॅरिअर संपलेले नाही तर गुगळे साहेबांनी हे कुठून शोधून काढले कि "लताजींसारख्या ज्येष्ठ आणि गुणवान गायिकेवर कळत नकळत अन्याय होत होता" >>

त्या गायिकेने ही गोष्ट अनेक वर्षांनी सांगितली. तोवर लताजींना जबाबदार धरणार्‍या अनेक अफवा पसरविल्या जात होत्या व त्यावेळी या गायिकेने त्यांचे खंडन केले नाही, कारण आयती सहानुभूती मिळत होती ना...

<< एकदम बरोबर. त्यातूनही मी जर य ला क्ष विषयी काही सांगितले, तरी य ला क्ष विषयी बाहेर जाऊन बदनामी करायचा हक्क कोणी दिला. ? >>

का? तुमच्या आवडत्या नटीच्या विरोधात कोणी काही बोलले तर तुम्हाला त्याचा जीव घ्यावासा वाटणार.. आणि इथे कोणा क्ष / य च्या नव्हे तर साक्षात लताच्या बदनामीला कारणीभूत ठरलेल्या व्यक्तिच्या विरोधात मी इतकेही लिहायचे नाही काय? आणि माझ्या अशा लिखाणाने जर त्या गायिकेला काही त्रास होत असेल तर करतील त्या माझ्यावर आवश्यक ती कारवाई. माझी सर्व खरी माहिती (नाव, पत्ता, दूरध्वनी, इलेक्ट्रॉनिक मेल पत्ता, छायाचित्र यासह) संकेतस्थळावर देऊन मगच मी हे लेख लिहीत आहे. कारवाईला तोंड द्यायला मी समर्थ आहे. तुम्ही तरी कशाला चिंता करता?

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Sep 2011 - 11:14 pm | चेतन सुभाष गुगळे

<< काय मुर्ख माणुस आहे. >>

<< स्वतःच्याच आत्याची संपुर्ण जगात बदनामी करा असं सांगणार्‍या माणसावर विश्वास का ठेवा? >>

एका एस बी ला च दुसर्‍या एस बी विषयी जास्त माहिती असणार.

बाकी मी लिहीलेल्या लेखामुळे एखाद्या व्यक्तिची संपुर्ण जगात बदनामी होते?

म्हणजे तुमच्या मते मी जागतिक पातळी वरचा लेखक आहे तर...

शिल्पा ब's picture

23 Sep 2011 - 12:05 am | शिल्पा ब

तुम्ही कोणत्या पातळीचे लेखक आहात ते इथे दिसतंच आहे...
आंतरजालावर लिहिलेले कोणतेही लेखन जगात कोणीही फुकट वाचु शकते...अशा वेळी एखाद्याची खास करुन एका प्रसिद्ध गायिकेची बदनामी करायला सांगणारा माणुस आणि ते करणारा माणुस काय लायकीचा आहे त्याबद्द्ल कोणाचेही दुमत नसावे.

तुम्ही तर स्वत: च त्या गायिकेच्या एका अत्यंत जवळच्या व्यक्तिने प्रसिद्ध करण्यासाठी दिलेली माहीती म्हणुन सांगताय याचा अर्थ काय?

आणि लता मंगेशकरची काळजी करणारे अन त्यासाठी दुसर्‍या एका गायिकेची बदनामी करणारे तुम्ही कोण? काय समजता काय स्वतःला?

चेतन सुभाष गुगळे's picture

23 Sep 2011 - 12:14 am | चेतन सुभाष गुगळे

<< अशा वेळी एखाद्याची खास करुन एका प्रसिद्ध गायिकेची बदनामी करायला सांगणारा माणुस आणि ते करणारा माणुस काय लायकीचा आहे त्याबद्द्ल कोणाचेही दुमत नसावे. >>

माझी लायकी काढण्या आधी स्वत:ची ब वर्ग लायकी सुधारा. तुमचे किती प्रतिसाद आज संपादकांना उडवावे लागलेत त्या वरून काहीतरी बोध घ्या.

<< तुम्ही तर स्वत: च त्या गायिकेच्या एका अत्यंत जवळच्या व्यक्तिने प्रसिद्ध करण्यासाठी दिलेली माहीती म्हणुन सांगताय याचा अर्थ काय? >>

<< आणि लता मंगेशकरची काळजी करणारे अन त्यासाठी दुसर्‍या एका गायिकेची बदनामी करणारे तुम्ही कोण? काय समजता काय स्वतःला? >>

आणि मला हे प्रश्न विचारणार्‍या तुम्ही कोण? मी निदान कोण आहे याची पुरेशी माहिती संकेतस्थळावर ठेवलेली आहेच. त्यापेक्षा अधिक प्रश्न तुम्ही विचारलेत तरी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी तुम्हाला बांधील नाही.

शिल्पा ब's picture

23 Sep 2011 - 12:20 am | शिल्पा ब

माझ्या वर्गाची चिंता करायला संपादक ठेवलेले आहेत. मी कशावरुन काय बोध घ्यायचा का नै ते मी बघेन. दुसर्‍याला उपदेश करुन स्वतः झ दर्जाचे वागणे चालु ठेवणे बंद करा मग बोला.

बाकी पुढच्या वेळेस कोणाची बदनामी करायची असेल तर तुम्हालाच सुपारी द्यायचा विचार करतोय.

तुम्हाला हे प्रश्न विचारले कारण तुम्ही इथे तुमची टुरटुर लावलीये कधीची...हे आंतरजाल आहे आणि आम्ही इथे खाते उघडलेय. इथे वाट्टेल ते लिहिले तर प्रश्न विचारले जाणारच. एवढेही सामान्यज्ञान आपल्यासारख्या विद्वानाला असु नये? कमाल ए!!

चेतन सुभाष गुगळे's picture

23 Sep 2011 - 12:23 am | चेतन सुभाष गुगळे

तुमचा वर्ग आम्ही पाहू नये म्हणताय? संपादक त्यासाठी आहेत.

मग ते आमच्या लिखाणावरही अंकुश ठेवतीलच की? तुम्ही सर्व अधिकार स्वत:पाशी ठेवण्याचा एकतर्फी निर्णय कशाला घेता हो?

निर्णय कोण घेतय? प्रतिक्रिया दिली. कमाल ए!! लेख लिहायची अन इथे प्रसिद्ध करायची हौस आहे तर प्रतिक्रिया येणारच हे तुमच्यासारख्या प्रकांडपंडीताला समजु नये?

चेतन सुभाष गुगळे's picture

23 Sep 2011 - 12:40 am | चेतन सुभाष गुगळे

मग अशा प्रतिसादांची दखल घेऊन त्यांना प्रत्युत्तर द्यावे लागणारच. अर्थात तुम्हाला हे कळेल अशी आशा करण्यात अर्थ नाही त्यामुळे मुद्दामच इथे टंकले आहे.

छान किस्से आहेत. किस्से आणि लिखाण दोन्ही आवडले!

काव्या विश्वनाथन ही झेरॉक्स या फोटोकॉपियर्सची ब्रँड अँबॅसिडर झाल्याचे ऐकले होते.

बाळकराम's picture

22 Sep 2011 - 2:27 am | बाळकराम

खरे-खोटे माहित नाही, पण वर रेवतीताई म्हणाल्या तसं कलाकारांचं खाजगी आयुष्य उघडं करुन काय साध्य होईल? तशा किश्श्यांमध्ये तथ्य कमी व गॉसिपच जास्त असू शकते.

प्रदीप's picture

22 Sep 2011 - 11:02 am | प्रदीप

लताजींनी राजकारण करून तुमच्या आत्याबाईंना पुढे येऊ दिलं नाही.....आता आमची आत्या मुलाखतीत तिची व्यावसायिक कारकीर्द संपुष्टात येण्याच हे खरं कारण कुठल्या तोंडानं सांगणार?.

आत्ता की हो!! आम्हा मराठी मध्यमवर्गीयांच्या दोन पिढ्या लताच्या व्यावसायिक यशाची काळ्याकुट्ट रंगांची मनःचित्रे रंगवण्यात गेल्या. त्या चित्रांत आमच्या दोनचार गोग्गोड आवाजाच्या प्रतिलता बिचार्‍या कोनाड्यात हताश उभ्या होत्या. आताच्या तिसर्‍या पिढीस लताशी फारसे देणेघेणे नाही, म्हणून ती त्यात पडलेली नाही. पण आता तुम्ही हे असले काहीतरी विपरीत सांगून आमच्या पिढीची गोचीच केलीत की! आमच्य काळ्या रंगांच्या चित्रांवर ओरखडेच उमटवलेत तुम्ही!!

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Sep 2011 - 11:22 am | चेतन सुभाष गुगळे

<< पण आता तुम्ही हे असले काहीतरी विपरीत सांगून आमच्या पिढीची गोचीच केलीत की! आमच्य काळ्या रंगांच्या चित्रांवर ओरखडेच उमटवलेत तुम्ही!! >>

खरं तर असा काही उद्देश नव्हता माझा, निदान या लेखात तरी. अर्थात या लेखाच्या पुढील भागात (येत्या बुधवारी २८ सप्टेंबर रोजी) अनेकांच्या मनात असलेल्या एका काळ्या रंगाच्या चित्रावर मी ओरखडे उमटवणार आहेच.

(येत्या बुधवारी २८ सप्टेंबर रोजी)

हा मुहुर्त ययत्सुंनी दिलाय/सुचवलाय का तुम्हाला ???

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Sep 2011 - 11:53 am | चेतन सुभाष गुगळे

दोन धाग्यांच्या प्रकाशन कालावधी मध्ये कमीत कमी एक आठवडा तरी अंतर असु द्या असे अनेकांनी सूचविले आहे. ज्येष्ठ सदस्यांच्या विनंतीचा मान ठेवून आता बुधवारीच पुढचा धागा प्रकाशित करायचा निर्णय घेतला आहे.

नितिन थत्ते's picture

22 Sep 2011 - 11:41 am | नितिन थत्ते

धाग्याच्या शीर्षकात जी म्हण उद्धृत केली आहे ती तशीच आहे पण त्यातला एव्हरी हा शब्द काहीसा अनावश्यक आहे.

अवांतर: मी कोणती यादी दिली आहे ते कळलं नाही.

आणि

"ग्रेट" हा शब्द वगळला आहे पण तो महत्वाचा आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Sep 2011 - 12:14 pm | चेतन सुभाष गुगळे

तुम्ही ही

http://www.hyderabaddailynews.com/2011/02/05/swiss-bank-indian-account-h...

यादी श्री. सुधीर काळे यांच्या धाग्यावर दिली होतीत. तिचा उल्लेख मी पुन्हा माझ्या मागच्या धाग्यात http://www.misalpav.com/node/19142#comment-338832 ही केला होता. यात बरीच फॉर्च्युनर मंडळी आहेत. त्यात आमचे धर्मबांधव बहुसंख्येने दिसत आहेत.

बाकी म्हण जुनीच असल्याने तिच्यात संपादन केलेले नाहीय.

मराठी_माणूस's picture

22 Sep 2011 - 11:58 am | मराठी_माणूस

त्यामुळे लताजींसारख्या ज्येष्ठ आणि गुणवान गायिकेवर कळत नकळत अन्याय होत होता

ह्या लेखा मधुन समजलेल्या ह्या माहीतीवरुन हा त्यांच्यावर अन्यायच होता हे स्पष्ट होते. लताबाईंना तेंव्हा काय त्रास झाला असेल ह्याची आपण कल्पना करु शकतो.

त्यामुळे अश्या माहीतीचे प्रकटीकरण योग्यच आहे असे म्हणावेसे वाटते.

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Sep 2011 - 12:02 pm | चेतन सुभाष गुगळे

आपल्याला माझा हेतू समजला आणि माझ्या कृतीविषयी आपण पाठिंबा व्यक्त केला याबद्दल आपले आभार.

ऋषिकेश's picture

22 Sep 2011 - 5:35 pm | ऋषिकेश

'गॉसिप' किंवा मराठीत ज्याला गावगप्पा म्हणतात त्या लेखन प्रकाराला साजेसे लेखन
(आणि त्या दृष्टिकोनातून आवडलेही)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Sep 2011 - 6:40 pm | परिकथेतील राजकुमार

माझ्या या उत्तराने सारेच चकित झाले व मुख्यमंत्र्यांनीही आपल्याला ही माहिती नवीन व मोलाची वाटली असल्याचे कबूल केले त्याचप्रमाणे ते वस्तुस्थितीशी सहमत झाले..

आता तरी येथील खरेतर काही मूर्ख पण स्वतःला सगळ्यांपेक्षा जास्ती प्रतिभावान समजणार्‍या मिपाकरांना श्री. गुगळे साहेबांची थोरवी आणि ज्ञानाचे महत्व पटेल अशी आशा करतो.

नितिन थत्ते's picture

22 Sep 2011 - 10:15 pm | नितिन थत्ते

अण्णा हजार्‍यांना पटवणार्‍या देशमुख साहेबांना पटवणारे चेतनसुभाषगुगळे. :)

प्रियाली's picture

22 Sep 2011 - 10:17 pm | प्रियाली

चेतनसुभाषगुगळे

प्लीज, तुमच्या किबोर्डावरील सर्वात मोठ्या "की"चा वापर करा. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2011 - 11:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या कीबोर्डवरची सर्वात मोठी की वापरल्यास
चे


सु
भा

गु

ळे

असं आलं.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Sep 2011 - 11:59 pm | बिपिन कार्यकर्ते

=)))))))))))

चेतन सुभाष गुगळे's picture

23 Sep 2011 - 12:01 am | चेतन सुभाष गुगळे

असं कसं काय होईल?

आंग्ल कळफलक तर http://store.aramedia.com/shopimages/products/normal/kb-largeprintbwuk.jpg असा दिसतो ना?

जरा तुमच्या कळफलकाचं छायाचित्र दाखवाल का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2011 - 12:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऑलमोस्ट असाच आहे, फक्त ल्यापटॉप असल्यामुळे एवढा मोठा नैये, काही कीज इकडे-तिकडे आहेत, ऑक्साँची बटणं नाहीयेत आणि अक्षरं एवढी ढब्बोडी नाहीत छापलेली.

शिल्पा ब's picture

23 Sep 2011 - 12:08 am | शिल्पा ब

बै बै!! कीत्ती कीत्ती विषयांची सखोल माहीती आहे तुम्हाला, अन ते दाखवण्याची प्रचंड हौस सुद्धा...व्वा!!

सहज एक म्हण आठवली : उथळ पाण्याला खळखळाट फार.

<< कीत्ती कीत्ती विषयांची सखोल माहीती आहे तुम्हाला >>

<< उथळ पाण्याला खळखळाट फार >>

ठळक केलेल्या दोन्ही शब्दांचे अर्थ आधी शब्द कोशातून माहीत करून घ्या. म्हणजे नीट वापर करता येईल.

अप्पा जोगळेकर's picture

22 Sep 2011 - 10:56 pm | अप्पा जोगळेकर

सचिन तेंडुलकर जसे आपल्या बॅटनेच टीकाकारांना उत्तर देतो तसेच काहीसे चेतन सुभाष गुगळे यांच्याही बाबत घडत आहे असे दिसते.

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Sep 2011 - 11:32 pm | चेतन सुभाष गुगळे

<< लिखाण रंजकच. >>

धन्यवाद जोगळेकर साहेब.

<< सचिन तेंडुलकर जसे आपल्या बॅटनेच टीकाकारांना उत्तर देतो तसेच काहीसे चेतन सुभाष गुगळे यांच्याही बाबत घडत आहे असे दिसते. >>

हे विधान करून तुम्ही माझी जबाबदारी अधिकच वाढविली आहे. आशा आहे पुढील आठवड्यात प्रकाशित होत असणार्‍या धाग्यामुळे तुमचा हा विश्वास माझ्याकडून सार्थ ठरेल.

पुनश्च आभार.