गाभा:
बरेच दिवस हा प्रश्न डोक्यात होता. विचारावा की नाही हा संभ्रम होता कारण कदाचित खूपच बाळबोध वाटेल :) असो.
'साजूक तूप' असा शब्द आपण वापरतो. त्याचा नक्की अर्थ काय? माझ्या माहितीनुसार घरी लोणी कढवून तयार केलेल्या तुपाला साजूक म्हणतात. मग ह्याच्या पेक्षा वेगळा काही तुपाचा प्रकार आहे का?
'रवाळ' हे मला वाटते कणीदार तूपाचे विशेषण आहे, जे उत्तम तूप बनल्याची पावती असावी बहुधा. :) त्याचा साजूकशी काही संबंध आहे का?
प्रतिक्रिया
19 Sep 2011 - 12:04 pm | उदय के'सागर
"मग ह्याच्या पेक्षा वेगळा काही तुपाचा प्रकार आहे का?"
उत्तर : वनस्पती तुप!
(हे तुप साजुक तुपा पेक्षा स्वस्तं असतं, पण अरोग्याला अपायकारक. भारतात बरेच लोक ह्या तुपाचा वापर करतात (माझ्या माहिती प्रमाणे महाराष्ट्रात जास्तच वापर होतो). साजुक तुप परवड्त नसल्यास वा साजुक तुपात भेसळ करायची असल्यास ह्या तुपाचा वापर हमखास केला जातो).
वनस्पती तुप कसं बनतं ह्याच्या अधिक माहितीसाठी : http://www.mecpro.com/vanaspati-ghee-detailed-introduction.html#manufact...
19 Sep 2011 - 12:04 pm | मी ऋचा
लई भारी, लई भारी धागा!
19 Sep 2011 - 12:10 pm | नरेश_
असो. जाणकार शंकानिरसन करतीलच.
आणखी १ शंका : लोणकढी थाप हा शब्दप्रयोग कसा रूढ झाला ?
19 Sep 2011 - 12:16 pm | अविनाशकुलकर्णी
लई साजुक धागा.....
19 Sep 2011 - 12:16 pm | झुळूक
साजुक तुप म्हनजे ताजे,नुकतेच बनवलेले तुप.
माझ्या घरी एक मराठि शब्द कोश आहे,त्यात वाचले होते...
19 Sep 2011 - 4:41 pm | राही
होय शब्दकोशात तसा अर्थ आहे खरा. संस्कृत सद्यस्क वरून आलेलं साजुक म्हणजे ताजं, नुक्तं, अर्थात जे शिळं नाही ते. नाजुक मुलीचं वर्णन अॅडिशनली 'ती ताज्या फुलासारखी टवटवीतही आहे' असं करायचं होतं असेल म्हणून नाजुक-साजुक असा जोडशब्द वापरला गेला असेल. सुंदर मुलींना पाहून कोणालाही काहीही सुचू शकतं. किंबहुना सुचावंच.
लोणकढी बाबत एक गोष्ट ऐकली आहे. पूर्वी फिरते विक्रेते दारावर तूप विकायला आणीत. त्याची भलावण करताना ते किती चांगलं आहे, खान्देशी,बेळगावी किंवा कोइम्बतूरी अशा चांगल्या लोण्यापासूनच कढवलेलं असं खरंखुरं लोणकढंच कसं आहे वगैरे थापा मारत. प्रत्यक्षात ते भेसळीचं असे आणि एखाद्याने त्यांच्या बोलण्याला भुलून ते घेतलंच तर तो नक्की पस्तावे. त्यावरून लोणकढी थाप हा शब्द आला असावा.
19 Sep 2011 - 6:12 pm | योगी९००
लोणकढी थाप का म्हणतात ते आज मला कळले...छान उत्तर..
हे उत्तर म्हणजे लोणकढी थाप तर नाही ना...?
19 Sep 2011 - 12:29 pm | मितभाषी
=))
अगदी बरोबर. हे उत्तर लई आवल्डं बॉ आपल्याला.
फुळूक
19 Sep 2011 - 1:06 pm | प्रभाकर पेठकर
साजुक तुप म्हनजे ताजे,नुकतेच बनवलेले तुप.
ताज्या, नुकत्याच बनविलेल्या 'वनस्पति तुपास' साजूक तुप म्हणावे काय?
19 Sep 2011 - 4:59 pm | मिसळपाव
जावईबापू. कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल" आठवलं!
बरं. मग "ताजे, गाईच्या दुधाच्या लोण्यापासून बनवलेलं तूप" हि व्याख्या चालेल का? BTW, ताजं = नुकतंच बनवलेलं त्यामुळे ती द्विरूक्ती टाळली.
19 Sep 2011 - 9:43 pm | अविनाशकुलकर्णी
विड्याचे पान कढवताना तुपात टाकले कि तुप रवाळ होते असे वाचनात आले.
20 Sep 2011 - 4:32 pm | अन्या दातार
१. विड्याचे पान का कढवावे?
२. विड्याचे पान कढवायची कृती काय?
३. विड्याचे पान कढवल्याने विड्याच्या चवीत काय फरक पडतो?
४. विड्याचे पान नक्की कोणत्या तुपात टाकल्याने तूप रवाळ होते? लोणकढे की वनस्पती तूप?
23 Sep 2011 - 8:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हीच पंगाशेट काय? ;-)
20 Sep 2011 - 1:16 am | रेवती
पूर्वी तूप झाल्यावर ते बरण्यांमध्ये भरून ठेवले जाई.
रोज वापराच्या चांदीच्या तपेलीतही काढले जाई.
सोन्यासारखा रंग आणि रवाळपणा असलेल्या तुपाला उगीच धसफस करणे, सतत गरम करून गार करणे याने कणी मोडत असे म्हणून नाजूकपणे हाताळावे लागे. त्यावरून नाजूक साजुक असा शब्द आला असेल काय असे वाटले.
21 Sep 2011 - 5:00 am | शुचि
मस्त प्रतिसाद.
26 Sep 2011 - 7:47 pm | विजुभाऊ
नाजूकपणे हाताळावे लागे. त्यावरून नाजूक साजुक असा शब्द आला असेल काय असे वाटले.
मग त्याला नाजूक तूप म्हणाले नसते का
22 Sep 2011 - 9:39 am | टवाळ कार्टा
साजुक तुपाचा एक नाजुक अर्थ सुद्धा आहे ;)