कल्पनेतली ती

पुष्कर's picture
पुष्कर in जे न देखे रवी...
18 Sep 2011 - 3:58 pm

तुझ्या कल्पने जाहली खल्बली अन्
नजर ती तुझी मखमली काहिशी
तुला पाहता वाहता शीतळी अन् -
तरी जाहली काहिली ही अशी

तुझी सावली पावली मावली अन्
पुढे धावली कावली ती किती
मला अंगणी पाहुनी थांबली अन्
क्षणार्धात ती होतसे चोरटी

तुझ्या दर्शनाला नभी चंद्रयाने
किती सांग मी तेथ धाडायची?
तुझा चेहरा चंद्र नसला तरीही
तुझ्या भोवती तीच हिंडायची

कशाला फुकाची कुणाच्या मनाची
भिती किल्मिषांची उरी घ्यायची?
खुली रंगवू या आकाशात नक्षी
गुजे सावकाशीत सांगायची

कविता

प्रतिक्रिया

अभिजीत राजवाडे's picture

18 Sep 2011 - 9:58 pm | अभिजीत राजवाडे

तुझ्या दर्शनाला नभी चंद्रयाने
किती सांग मी तेथ धाडायची?
तुझा चेहरा चंद्र नसला तरीही
तुझ्या भोवती तीच हिंडायची

आवडले!!!

पाषाणभेद's picture

18 Sep 2011 - 11:54 pm | पाषाणभेद

"तुझा चेहरा चंद्र नसला तरीही
तुझ्या भोवती तीच हिंडायची"

तीच हिंडायची म्हणजे नजर तेथेच रहायची/ जायची असे आहे काय?

खल्बली खल्बली खल्बली खल्बली
पुष्कर सोजा

पुष्कर's picture

19 Sep 2011 - 9:32 pm | पुष्कर

तीच म्हणजे चन्द्रयाने