निरोप घेता घेता
निरोप घेणे ईतके सोपे नसते
निरोप घेताना
काळजात एक कळ उठते
निरोप घेताना
जसे आभाळ भरून येते
तसे मन भरून जाते
कधीपण कोसळू शकतो
आता हा पाउस
तसे मन होऊन जाते
निरोप घेता घेता
निरोप घेणे सोपे नसते ....!
कोठून कोठे आलो..?
किती लांबचा प्रवास झाला
घंर सोडताना
मन किती भरून आले होते
पण खरेच सांगतो
परदेशातील नोकरीमुळे
मन तेव्हा फुलले होते
छान होता विमान प्रवास
सगळे आभाळ अंगण होते
पण
घर सोडताना मन कसे दाटून येते
नि सगळे कसे
जे कधी आपले वाटत नव्हते
तेही आपले वाटू लागते
निरोप घेताना
निरोप घेणे ईतके सोपे नसते ...
आईचे भरलेले डोळे
बाबांची चलबिचल
नि उगाचच येरझार्या घालणे
मन सुन्न करून टाकते
आजूबाजूची घरे ,माणसे
झाडे ,पक्षी
सगळे सोडून जातांना
त्यांच्या विषयी
किती आपलेपण वाटते
आपले मन ओढून काढताना
मन मात्र मोडून जाते
नि डोळा हलकेच पाणी येते
निरोप घेताना
निरोप घेणे खूप अवघड असते ....!
प्रतिक्रिया
16 Sep 2011 - 10:21 am | जाई.
कविता आवडली
16 Sep 2011 - 11:05 am | विदेश
वाचत असताना जुन्या 'भाभी' चित्रपटातील 'चल उड जा रे पंछी ' आठवत गेले !
कविता छान आहे.
16 Sep 2011 - 11:06 am | मिसळलेला काव्यप्रेमी
छान आहे.
16 Sep 2011 - 6:03 pm | निनाव
मार्मिक कविता.. सुंदरच.
17 Sep 2011 - 12:10 am | पाषाणभेद
खरोखरच निरोप घेणे खूप अवघड असते पकाकाका!
असे बोलून मी आपला निरोप घेतो.
(आपल्या काव्यसंग्रहाचे नावः परदेशी कविता, दुरदेशीच्या कविता आदी ठेवा.)
17 Sep 2011 - 3:45 am | चित्रगुप्त
छान कविता, आता निरोप घेतानाच्या आई-बाबांच्या भावनांवरही येऊ द्या एक कविता, म्हणजे पूर्णत्व लाभेल या विषयाला.
17 Sep 2011 - 4:39 am | अभिजीत राजवाडे
कविता आवडली