बाप्पा मोरया ...

विश्वेश's picture
विश्वेश in जे न देखे रवी...
12 Sep 2011 - 12:07 pm

काल रात्री अचानक मला स्वप्न पडले नवे ...
बाप्पा आले आकाशातून म्हणे पाहायचेत तुमचे देखावे ...

बाप्पा म्हणाले चल जरा दिल्ली मुंबईला जाऊ
मस्तपैकी कोर्टातले संसदेतले तुमचे फटाके पाहू
बाप्पा... ते फटाके नाहीत आहेत बॉम्ब जीवघेणे
त्यापेक्षा दाखवतो तुम्हाला अजंठा वेरूळ चे लेणे ...

बाप्पा म्हणाले परवाच तो जीजस भेटला होता ...
दहा वर्षापूर्वीच्या आठवणींमध्ये भलताच त्रस्त होता
मी म्हणालो त्याला अरे आमच्या भारतामध्ये बघ ...
काल स्फोट झाला तरी आज नाचतंय सांर जग ...

आमच्याकडे बॉम्ब हल्ल्यांचे आता सण साजरे होतात
भांडवल करून त्याचे, नवीन तारे जन्मास येतात
इथे कोणाला पडले नाही, ह्यात कोण अन किती मरतात
जीजसा, बॉम्ब हल्ल्यांना आता इथे फक्त अतिरेकी घाबरतात

जीजस म्हणाला असे कसे परवाच पहिला मी तुमचा लढा
तुमच्या एकट्या अण्णाने दिला भ्रष्टाचाराच्या वृत्तीस तडा
जीजसा, असा लढा संपायला सरकारी ज्यूसचा एकच घोट पुरतो
अन अश्या अण्णाचा विसर पडायाला आम्हाला एकच स्फोट पुरतो ...

बाप्पा, मग तू हलव सगळ्यांना अन उभा रहा त्यांच्या पाठीशी
मी लाख उभा राहीन रे, पण लढायचे बळ कुठे आहे गाठीशी
जीजसा, इथे प्रत्येकाने ठरवले आहे, मागे वळून नाही बघायचं ...
अन स्फोटात आपण मरत नाही, तोवर आपल्यापुरतं जगायचं ...

खाडकन जागा झालो अन समोर पाहतो तर काय
साक्षात बाप्पा समोर उभे, म्हणाले "असा बघतोस काय?" ...
बाप्पा तुम्हीच दाखवा मार्ग तुम्हीच करा उपाय
हे ऐकून मात्र त्यांनी हळूच घेतला काढता पाय

एवढेच म्हणाले बाप्पा शेवटी घेताना माझा निरोप ...
स्वप्न कसली बघता साल्यांनो उडवून माझी झोप ...
स्वप्न कसली बघता साल्यांनो उडवून माझी झोप ...

- विश्वेश

कविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

12 Sep 2011 - 9:14 pm | गणेशा

कविता अप्रतिम ... आवडली.

अवआंतर : भरपुर बिझी असल्याने काव्य विभाग मनसोक्त वाचताच आला अनहि काहि दिवस झाले..
पण पहिलीच कविता मनापासुन आवडुन गेली.

वाह!!
कल्पना विस्तार आवडला! :)

सहमत.

सद्यपरिस्थितीवर चांगले भाष्य केलेस.