पुन्हा ब्लास्ट
मी हादरलो, आम्ही हादरले, सारा भारत हादरला
पण 'ते' विचकट हसले... राक्षसी
रावण, कंस, बकासुर, पुतना..
सुद्धा लाजले, रडवेले झाले..
'आमचा असुरी पणा असला नव्हता हो'
मिडिया गरजले
रक्ताळलेले फोटो - बटबटलेला सूर
मी भडकलो, आम्ही भडकलो, सारा भारत भडकला
पण त्यांचा TRP वाढला
नारायण-नारायण म्हणत
नारद मात्र आपल्या आधुनिक रूपाने थक्क झाला
सरकार सरसावले
दहशतवादी हल्ला - RDX - राष्ट्र - धर्म - जेहाद
मी आलो, आम्ही आलो, सारा भारत एकत्र आला
पण त्यांची पोळी शेकली
ब्रम्हा -विष्णू - महेशाचे आर्जव करत
इंद्र मात्र या लोकशाहीत विस्कळीत झाला
श्रीराम ते अण्णा...
... सगळे आठवले
मी सावरलो, आम्ही सावरले, सारा भारत सावरला
आज - नाहीतर - उदया
तुमचा कर्दनकाळ येणार
तुम्ही संपणार, आम्ही संपवणार
अगदी मुळासकट
आम्ही जिंकणार, भारत जिंकणार ...
नक्कीच जिंकणार ..