मेरी चार कवितायें
मंडळी, मिपा गेले तिन दिवस बंद असण्याच्या दरम्यान आम्हाला ज्या काही कविता झाल्यात त्या येथे एकदाच देत आहे. समजून घ्या.
१) मामा तुमची मुलगी
मामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी
मला शोभुन दिसेल
जसं ब्रेड वर मऊ मऊ लोणी ||धॄ||
काय तिचे आहेत हो गोरे गोरे गाल
खाली हनूवटी आहे टोकदार दिसते छान
कपाळी टिकली न फुलं केसांत खोवली
पण केसांची का घालते ती जुनाट वेणी?
मामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी ||१||
कॉलेजला जाते, स्कुटी उडवते
पोरासोरांच्या घोळक्यात राहते
हॉटेलात खाते, पिक्चरला जाते
डब्बलसीटही बसवते तिला कुणी
मामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी ||२||
मामा सांगतो तिच्या वागण्याचा नमुना
निट ऐकून घ्या, कान इकडे करा ना
त्या सच्च्या बरोबर ती रोज रोज फिरते
मॉलमधून जिन्स टि शर्ट ती घेते
मी बघीतल्यावर ती नुसतेच हसते
मला भाऊ रे भाऊ हाक ती मारते
बातमी ही खरी, नाही कागाळी
सहजच टाकली ती तुमच्या कानी
मामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी ||३||
०७/०९/२०११
===================================
२) मी एक पांथस्थ
पांघरूनी शाल हिरवाळीची
डोंगर गातो गाणे
ढग आडवा येतो तेथे
दरीत सावली कोसळते ||
हळूवार शिळ हवेची
पक्षी देई रवाने साद
टेकडीवरील एकांतात
बसलेला पांथस्थ मंदीरात ||
दुरवर कोठेतरी वरती
उगम एका झर्याचा होई
जरा थांबून रेंगाळून येथे
नदी होण्यास पुढे जाई ||
क्षितीजावरचे उभे चित्र
कुणीतरी रेखाटलेले
आवाका क्षुद्र नजरेचा
मन भारून साठलेले ||
मंदीरातल्या देवापुढे नच
निसर्गापुढे लीन होतसे
मी एक पांथस्थ
मी एक पांथस्थ ||
०७/०९/२०११
=================================
३) ह्या पावसानं
ह्या पावसानं
ह्या ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला
माझा भरला संसार त्यानं पाण्यात सांडला ||धृ||
रोहीणी आल्यात तेव्हा तो पडलाच नाही
मृग लागला तेव्हा थोडाफार येवून जाई
पहीली पेरणी खरीपाची कोरडी करून गेला
ह्या ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला ||१||
आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य; कोरडी गेली सारी नक्षत्र
इथे पडला तिथे पडला, पडला नाही सर्वत्र
भरणी, आश्लेषात मग पडून काय कामाचा
तो तर दुबार पेरणी करण्याच्या लायकीचा
पुन्हा कुठून आणायचं पैसा बी बियाण्याला
ह्या ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला ||२||
राजा काय करील जर आभाळच फाटलं
होतं नव्हतं ते सारं पाण्यानं ओढून नेलं
उत्तरा, हस्तामध्ये तो जोरदार आला
सगळ शेत घरदार बरोबर घेवून गेला
ह्या ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला ||३||
पुढची आशा करू रब्बी हंगामाची
शिकस्त करूया मेहनत करण्याची
रात्र संपून दिवस आता उजाडला
ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला ||४||
०८/०९/२०११
============================
४) हे घरी असतात
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते
मुलांचा सकाळचा डबा
त्यांच्या शाळेची तयारी
रिक्षावाल्याची वाट पाहणे
पेपरवाल्याची उधारी
झालेच तर नळाचे पाणी
ते तर तेव्हाच येत असते
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते
त्यानंतरचा आमचा नाष्टा
कधी होतो रवा, पराठा
कधी उतप्पा, ईडली डोसा
ह्यांच्या हाताला मस्त चव असते
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते
कामवाल्या मावशी धुणी भांडी करून जातात
साबण, सर्फ, पितांबरी ह्यांचा हिशेब हेच पाहतात
वाळलेल्या कपड्यांना इस्त्री कशी छान करतात
धोबी परीटही त्याच्यापुढे झक मारतात
मी ही घरी असते तर कदाचीत केले असते
पण...
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते
दुपारी जेवण बनवल्यानंतर
बिचारे एकटेच खातात
घरी कुणीच नसते
घरातले सारे कामावर जातात
दुपारी जेवल्यानंतर मात्र
हे टिव्ही बघतात
तीनच्या सुमारास वामकुक्षी घेतात
मी मरमर ऑफीसात प्रोग्रामींगची कामं करते
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते
आठवडाभर हे घरी कित्ती कित्ती कामं करतात
घर सारे निटनिटके आवरून सावरून ठेवतात
मात्र कधीतरी त्यांनाही एक दिवस सुटी द्यावीशी वाटते
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०९/२०११
प्रतिक्रिया
10 Sep 2011 - 8:25 am | अत्रुप्त आत्मा
मामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी
मला शोभुन दिसेल
जसं ब्रेड वर मऊ मऊ लोणी ||धॄ||.......... खिक्क :bigsmile: @- धन्य धन्य रे पाषाणभेदा---स्रुष्टीतले हे असे भेद कित्ती मार्मिकपणे टिपतोस तू, मलापण पर्वा येक पोरगी बघुन, मी पावभाजीचा तवा ;-) आणी ती वरती टाकायचं लोणी :-p असं वाटलवतं,पण मला असं लिहिता नाई आलं (त्या येळी आमची प्रतिभा तडिपार झाली व्हती ;-) ) तु भावना अगदी जिवंत केल्यास... आजचा दिस लई आनंदात जानार त्याबद्दल तुला ''हेप्पी मॉर्निंग'' :-)
काय तिचे आहेत हो गोरे गोरे गाल
खाली हनूवटी आहे टोकदार दिसते छान
कपाळी टिकली न फुलं केसांत खोवली
पण केसांची का घालते ती जुनाट वेणी?
मामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी ||१||.... @- या हू....येक नंबर,कडक, या मुळे आम्हाला कुंकू मधली ती गोड गोंडस जानकी दिसली... :-) मात्र यातल्या 'जुनाट' या शब्दाला तीव्र ... तीव्र ...तीव्र आक्षेप ..फुलामुळे येणी आनी येणी मुळे फुल मंजी 'म्येक फॉर यीच आदर' असं वाट्टया....बाकी पहीली कविता येक नंबर हाय ,बाकीच्या पन ठीक...दुसरी मदला फोटू आवडला :-)
10 Sep 2011 - 10:34 pm | प्रशांत उदय मनोहर
मित्रा तोडलंस.
बाकी हा धागा तोडून चार स्वतंत्र धागे तयार केले असते तर बरं झालं असतं. एकाखालोखाल एक कविता असल्यामुळे प्रत्येक कवितेला प्रतिक्रिया देणं अवघड जातंय.