त्याच्यातला नास्तिक माणूस ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
5 Sep 2011 - 8:16 am

मुलगा असतो परदेशात
नि ती दोघे एकटीच असतात
संध्याकाळची वेळ असते
ती देवाजवळ
नेहमी प्रमाणेच हात जोडून
प्रार्थना करीत असते
देवाजवळची समई
तिचा प्रसन्न प्रकाश
फोटोतील देवाच्या चित्रावरून परावर्तीत होऊन
मंद मंद पसरत असतो
सगळीकडे ...सर्वत्र ..!
तिच्या चेहर्यावर ....
कोठे कोठे फुलत जातो

तो देवाकडे नुसताच बघत बसतो
त्याने त्याच्या ओंजळीत काय काय टाकले
ते शोधत बसतो .....!

ती भाबडेपणे काही काही मागत बसते देवाजवळ
मुलांचे सुख ...!
त्यांच्या साठी आरोग्य...!!
जेथे आहेत तेथे
सुखी राहावे म्हणून तिची ओंजळभर प्रार्थना
आणि स्वतासाठी त्यांच्या सुखांत स्वताचे सुख शोधीत बसते

आणि तो मात्र शांतपणे
तिच्या मागणीला अनुमोदन देत असतो
हलकेच मनातल्या मनात
देवा तिची साधना सफल संपूर्ण कर
असे विनवत असतो
त्याच्यातला नास्तिक माणूस
तिच्या प्रार्थनेपुढे नतमस्तक होत असतो .....!!

करुणकविता

प्रतिक्रिया

विदेश's picture

5 Sep 2011 - 10:02 am | विदेश

आकाशभरून प्रसन्नता देऊन गेली.

सुहास झेले's picture

5 Sep 2011 - 10:23 am | सुहास झेले

वाह वाह... सुंदर रचना !!

जाई.'s picture

5 Sep 2011 - 8:57 pm | जाई.

छान वाटल कविता वाचून.
नास्तिकातला आस्तिकपणा छान पकडलाय.

नगरीनिरंजन's picture

5 Sep 2011 - 10:38 pm | नगरीनिरंजन

>>त्याच्यातला नास्तिक माणूस
तिच्या प्रार्थनेपुढे नतमस्तक होत असतो

ही कल्पना खूप आवडली. इतरवेळी देवाच्या मूर्तीसमोर वाकावंसं वाटत नाही पण आजीच्या घरी महालक्ष्मी बसतात तेव्हा अगदी साष्टांग नमस्कार का घातला जातो याचे उत्तर मिळाले.

पाषाणभेद's picture

6 Sep 2011 - 12:41 am | पाषाणभेद

सुंदर काव्य
आपण स्व:ता जरी नास्तिक असलो तरी कधी कधी इतरांची श्रद्धा आपल्याला आस्तिक बनवते.

सख्या's picture

6 Sep 2011 - 7:45 am | सख्या

सुन्दर कविता.

दीपा माने's picture

6 Sep 2011 - 9:57 pm | दीपा माने

नेमके भाव पकडले गेलेत. मनाला स्पर्शुन गेली कविता.

चाल क बि.एन's picture

9 Sep 2011 - 9:03 pm | चाल क बि.एन

आपल्याला अन्त्मुख बनवनारि कविता
आपलि आस्तिक श्रद्धा .....

आत्मशून्य's picture

10 Sep 2011 - 8:53 pm | आत्मशून्य

.

विनायक प्रभू's picture

11 Sep 2011 - 9:22 am | विनायक प्रभू

सुंदर कविता
अभिनंदन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2011 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर कविता.

-दिलीप बिरुटे