वाळू
समुद्रकाठावरची वाळू अन वाळवंटातली वाळू.
दोन्ही वाळूचेच प्रकार
पण दोन्हीतले स्वभाव किती भिन्न...
एक थंड तर एक उष्ण
एक पाण्याशी जवळीक साधणारी तर
दुसरी पाण्याशिवाय राहणारी
एकीवर थंडवारे वाहतात तर दुसरीवर उष्ण
एकीवर सुंदर सुंदर दृष्य असणारी झाडे, वने, निसर्ग
तर दुसरी रुक्ष, तापलेली, वैराण जागा
.
.
.
.
कधी कधी वाटते की,
तुझ्या अन माझ्या स्वभावातही इतकेच अंतर आहे काय?
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०२/०९/२०११
प्रतिक्रिया
2 Sep 2011 - 6:36 am | निनाद
समुद्रकाठावरची वाळू
किती भासे कनवाळू
अन वाळवंटातली वाळू
किती असे ती पायजाळू
एक कोरडी उष्माळू
भिन्नत्व दोन्हीत आले मला कळू
.
.
.
जाणीव ही मनी हळूहळू
ती अन मी, असे दूर नि जवळू
2 Sep 2011 - 6:42 am | पाषाणभेद
भले बहाद्दर शिघ्रकवी येथे असती!!
काय टाप कुणाची हि कविता कुणाची?
असे पुसण्याची.
2 Sep 2011 - 6:45 am | निनाद
समुद्रकाठावरची वाळू
किती भासे कनवाळू
चला मिळून गावठी गाळू
लागली ही धारही गळू
जशी गंगा झुळुझुळू
सारे मिळून आता झुलू
गावठी आणि व्हिस्की
भिन्नत्व आले मला हो कळू
जाणीव होते तनी हळूहळू
नका हो मला असे टाळू
संपादकास आले कळू
विडंबने नको, आता दूर पळू
-निनाद
2 Sep 2011 - 3:36 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अजून एका रचनेची लावली... वाट हो ;)
छान छान असेच काव्य बहरत राहू दे आपले.
2 Sep 2011 - 4:23 pm | अत्रुप्त आत्मा
हाय हाय हाय.... कलेजा खल्लास हो गया...वाहव्वा...आखरी बॉल पे क्या सिक्सर मारा है...
@कधी कधी वाटते की,
तुझ्या अन माझ्या स्वभावातही इतकेच अंतर आहे काय?
6 Sep 2011 - 3:50 pm | गणेशा
पाषाणभेद अप्रतिम कविता...
अवांतर : अलिकडे तुम्ही वेगळ्या शैलीत कविता लिहित आहात.. आणि त्या शैलीतही तुम्ही खुप छान कविता लिहिशुभेच्छा.
असेच लिहित रहा... वाचत आहे
6 Sep 2011 - 3:58 pm | परिकथेतील राजकुमार
पाषाणभेद आणि वाळू हे काँबीनेशनच आवडून गेले एकदम.