ती आणि ते

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जे न देखे रवी...
28 Aug 2011 - 8:29 am

गावाच्या घराघरातून ती नांदते
आणि प्रत्येक माणसात उगम पावून
खळाळत्या नदीसारखी
गल्लीबोळातून वाहते

बैलाचा बळी देऊन मांस खाणारा
कंटाळून सोवळ्यात जातो
तेव्हा ती थोडी बदलते
कमरेला झाडू लावणारा
चिडून पुस्तक हाती धरतो
तेव्हा ती थोडी वळते

उमटत असतात लाटा तिच्यात
तिच्यावर विहार करणार्‍यांच्या क्रीडेने
घुसळली जाते तिच्या तळाशी
गुदमरून बुडणार्‍यांच्या आकांताने

जिवंत असतो गाव रसरशीतपणे
तिच्यातल्या लाटा-भोवर्‍यांमुळे
नि:स्तब्ध गावतटावर फक्त ते
तिच्या रक्षणासाठी बसलेल्यांचे सांगाडे....

कविता

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

28 Aug 2011 - 9:11 am | राजेश घासकडवी

कुठल्याही पळी, पंचपात्री
कमंडलूत ती सामावत नाही
ओंजळीपलिकडे कशात
ती कधीच मावत नाही

शेवटच्या ओळीत 'तिच्या रक्षणासाठी' ऐवजी 'थोपवण्यासाठी बांध घालून बसणारे' रूपकाला अधिक धरून झालं असतं.

नगरीनिरंजन's picture

28 Aug 2011 - 10:49 am | नगरीनिरंजन

>>शेवटच्या ओळीत 'तिच्या रक्षणासाठी' ऐवजी 'थोपवण्यासाठी बांध घालून बसणारे' रूपकाला अधिक धरून झालं असतं.

खरंय, पण मग ते तितकेसे अ‍ॅब्सर्ड वाटले नसते. :)

सहज's picture

28 Aug 2011 - 9:33 am | सहज

भाषा व संस्कृती रक्षक व्याकरणशास्त्री/ प्रमाणभाषाप्रेमी?

सुंदर कविता. ज्याचं बालपण नदीत डुंबण्यात गेलंय त्या प्रत्येकाला आवडेल अशी...

प्रकाश१११'s picture

28 Aug 2011 - 10:40 am | प्रकाश१११

छान कविता -
बैलाचा बळी देऊन मांस खाणारा
कंटाळून सोवळ्यात जातो
तेव्हा ती थोडी बदलते
कमरेला झाडू लावणारा
चिडून पुस्तक हाती धरतो
तेव्हा ती थोडी वळते

हे आवडले ..

नंदू's picture

28 Aug 2011 - 3:53 pm | नंदू

कविता आवडली.

शुचि's picture

28 Aug 2011 - 11:45 pm | शुचि

कविता आवडली. मला वाटते - संस्कृती हा विषय असावा.

स्पंदना's picture

29 Aug 2011 - 6:30 am | स्पंदना

कलाकृती!!

नगरी, सुरेख!

गणेशा's picture

29 Aug 2011 - 8:00 pm | गणेशा

छान कविता

धनंजय's picture

31 Aug 2011 - 8:21 pm | धनंजय

कल्पक!

अर्धवट's picture

31 Aug 2011 - 11:24 pm | अर्धवट

सुंदर कविता..