तु काढलेल्या माझ्या चित्रांवर सही नको करु...
मला त्या कॅनव्हास ला जखमी केल्यासारखे वाटते...
तुला सही करण्याची गरज नाही...
जर सही हि एकमेव असते तर,
तु चित्र काढताना्च त्या चित्रावर तुझी सही झालेली असते...
जर फारच वाटत असेल तर,
रंगात बुडवलेला तुझा अंगठा लाव त्या चित्रावर...
मी जपुन ठेवेन ते चित्र...
आणि जेंव्हा केंव्हा तुझी आठवण येईल,
तेंव्हा अलगद ठेवुन देईल माझा अंगठा,
तुझ्या अंगठ्यावर...
प्रतिक्रिया
27 Aug 2011 - 3:52 am | प्रकाश१११
छान लिहिले आहे ..!!
आवडले ..!!
27 Aug 2011 - 4:00 am | धनंजय
आंगठ्याच्या ठशावर आंगठा ठेवण्याची कल्पना छान आहे.
27 Aug 2011 - 7:11 am | निवेदिता-ताई
छान ....आवडले
27 Aug 2011 - 1:42 pm | सूर्यपुत्र
अवांतर : ही कविता चुकून तुमच्या अंगरक्षकाने लिहिल्याचे वाटले.... ;)
-सूर्यपुत्र.