पुणेरी वाहतूक

प्रिया ब's picture
प्रिया ब in जे न देखे रवी...
26 Aug 2011 - 4:51 pm

चालणारा, दुचाकीस्वार, चार चाकी चालवणारा ह्यांचे स्वगत :

पुढे मागे करत करत रस्ता कसाबसा मी ओलांडला
"काय मेले गाडीवाले चालवतात" असा विचार मनास चाटून गेला
फूटपाथ वरून चालणं देखील झालंय भलतच मुश्किल
काही भरवसा नाही; त्यावरूनही ही लोकं गाड्या हाकतील

हे मोठे गाडीवाले करतात भलताच माज
असे रस्ते आडवून गाड्या चालवतात जणू काही ह्यांचच आहे राज
आम्हा गरिब दुचाकीस्वारांना अगदी कोपर्यात घालतात
पावसाळा असला तर विचारयलाच नको; सर्रास चिख्खल उडवून जातात

ह्या दुचाकीवाल्यांना चालवण्याची अजीबात नाही शिस्त
लेन न पाळणार्यांचा तर परवानाच केला पाहिजे जप्त
रस्यावर चालणारे तर बागेत असल्यासारखे फिरत असतात
कुठे कुठे आणि कसं लक्ष्य ठेवायचे हे प्रश्न आम्हास पडतात

कुणाला हक्क कधी द्यायचा हे कोडे तसेच राहणार?
प्रत्येकाने नियमाचे पालन केले तर हा प्रश्नंच नाही उरणार
तोपर्यंत ही कोंडी तशीच असणार; म्हणून मंत्र अगदी सोपा
आपलंच साधन पुढे रेटून आपापल्या स्थळी पोचा

कविता

प्रतिक्रिया

वाहतूकीत अडकलेल्यांची स्वगते छान आहेत ...

पण ते 'पुणेरी' कशासाठी ? सर्वच शहरांमधून थोडीफार हीच परिस्थिती आहे ...

अमोल केळकर's picture

26 Aug 2011 - 5:17 pm | अमोल केळकर

खरं आहे :)

मराठी_माणूस's picture

26 Aug 2011 - 5:14 pm | मराठी_माणूस

आम्हा गरिब दुचाकीस्वारांना अगदी कोपर्यात घालतात
ह्या दुचाकीवाल्यांना चालवण्याची अजीबात नाही शिस्त

शिस्त नसेल तर मग कोपर्‍यात घालावेच लागेल :)

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Aug 2011 - 5:39 pm | चेतन सुभाष गुगळे

<< कुणाला हक्क कधी द्यायचा हे कोडे तसेच राहणार?>>

या प्रश्नाचं उत्तर वाहन परवान्यावरच दिलंय. माझ्या वाहन परवान्याच्या शेवटच्या पानावरचं वाक्य :-

Driving is a privilege not a right.

अमेरिकेतही "रस्त्यावर पहिला हक्क पादचार्‍याचा, मग वाहनचालकांचा" हे तत्व पाळतात.

अमेरिकेतही "रस्त्यावर पहिला हक्क पादचार्‍याचा, मग वाहनचालकांचा" हे तत्व पाळतात.

आपल्याकडे वाहनचालक पादचार्‍याला "घरपे बताके आया क्या भो***" असं म्हणत आपल्या संस्कृतीची ओळख करुन देत असतात. :)

पुण्याबद्दलच्या कोणत्याही धाग्यावर सध्या मौन पाळायचे ठरवलय.
(त्यानंतर मांजर पाळायचे आहे)

अशा कविता मी तिसरीत आसताना करायचो.पण एकदाही बक्षीस नाही मिळाले.

शैलेन्द्र's picture

26 Aug 2011 - 6:08 pm | शैलेन्द्र

हीडीस आणि हिणकस "प्रामाणीक" प्रतीक्रिया.. पण मिपाच्या नविन धोरणानुसार संयम पाळल्या गेला आहे.

५० फक्त's picture

27 Aug 2011 - 7:28 am | ५० फक्त

''फूटपाथ वरून चालणं देखील झालंय भलतच मुश्किल
काही भरवसा नाही; त्यावरूनही ही लोकं गाड्या हाकतील''
नळ स्टॉपच्या सिग्नलला या शिवाय पर्याय नसतो.

@ विजुभाउ - मांजर पुणेरी का दुसरं कुठलं पा़ळणार.

अवांतर - या तिन्ही रुपात पुण्यात वावरत असल्याने आता एवढा सराव झाला आहे की युद्धभुमिवर रणगाडे, वरुन विमानं आणि मधुन येणारी क्षेपणास्त्रे या सगळ्यामधुन जनलोकपाल पास करुन आणेन याचा विश्वास आला आहे.

ajay wankhede's picture

27 Aug 2011 - 8:12 pm | ajay wankhede

नुकताच पुण्याची वारी करुन आलो.
नि प्रत्यय आला...

साधं, सरळ आणि भावस्पर्शी काव्य.

आपलंच साधन पुढे रेटून आपापल्या स्थळी पोचा

अधोरेखित शब्दामुळे आमच्या लहानपणी क्रिकेटचे चेंडू लागून चारचाकी गाड्यांच्या पत्रांना आलेले पोचे आठवले.