जनलोकपाल आणि मिपासंपादक

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
24 Aug 2011 - 4:54 pm
गाभा: 

नमस्कार,

गेले काही दिवस मिपा, टीव्ही, वर्तमानपत्रे बघावे तिकडे अण्णा आणि जनलोकपाल ह्यावर खडाजंगी वाचायला मिळत आहे. आपल्याला त्यातले जास्ती काही कळत नाही पण एकूणच आर्थिक, सामाजिक भ्रष्टाचाराला खीळ बसावी , सामान्य लोकांना न्याय मिळावा, अकार्यक्षम अधिकारी तसेच बाबू लोकांना चाप बसावा ह्यासाठी काहीतरी कायदा बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत येवढेच आम्हाला कळले.

मग मनात असे आले की, सामान्य मिपाकरांचे प्रतिसादाच्या प्रतिसाद खाणार्‍या, कधी कधी तर अख्खे धागेच घशात घालणार्‍या संपादकांना जनलोकपालच्या कक्षेत आणता येईल काय ? त्यासाठी काय करावे लागेल ? अनिवासी संपादकांना ह्यातून सूट मिळण्याची शक्यता आहे का ? तसे असल्यास ते सध्या ज्या देशात आहेत त्या देशाशी एखादा करार (गुन्हेगार हस्तांतरा सारखा) करून त्यांना ह्या न्याय कक्षेत आणता येईल काय ? संपादक मंडळ ह्या आयडीवर गुन्हा दाखल झाल्यास त्याचे उत्तरदायित्व नक्की किती व कोणत्या संपादकांवर लादता येईल ?

आणि मुख्य म्हणजे कोणी मिपाकर ह्यासाठी उपोषण करेल काय ?

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 8:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकाहून अधिक विश्व असू शकत नाही एवढंच सांगितलं होतं.

मॅक्स तेगमार्कचं हे आणि हे लिखाण पहा, वाचा, समजून घ्या आणि मग आपण विश्वाबद्दल बोलू. ठीके?

तुम्ही दिलेले दाखले / संदर्भ यातली मते / कल्पना मला मान्य नाहीत. यावर चर्चा काय करणार?

  • जगातल्या अनेक सैद्धांतिक खगोलशास्त्राभ्यसकांनी विश्वविषयक मांडलेली किंवा अभ्यासून मान्य केलेली मतं तुम्हाला मान्य नाहीत हा माझा प्रॉब्लेम नाही.
  • कुठल्यातरी बाजारू वाक्यांना (उदा: स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते) तुम्ही "वैश्विक सत्य" मानता हाही माझा प्रॉब्लेम नाही.
  • माझा मित्र पराचा चेहेरा कुठे आरोपित करायचा ही आमची मैत्रीखात्यातली मस्करी जर तुम्हाला समजत नसेल तर हाही माझा प्रॉब्लेम नाही.
  • जॉन अब्राहमचं वस्तूकरण करणारे फोटो मी मिसळपाववर का डकवले आहेत हे ही तुम्हाला माहित नसेल तर हाही माझा प्रॉब्लेम नाही.

बाकी रहाता राहिलं सभ्य-सुसंस्कृत असणं, तर आपण लहान असण्याची जाणीव असणं हेच मला सभ्य-सुसंस्कृत असण्यातली मोठी गोष्ट वाटते. ही जाणीव मला आहे म्हणून मी मोठं होण्याची शक्यता आहे. कोणी शिव्या दिल्या म्हणूनच असंस्कृत होत नाही आणि बोलताना दोनचार ओव्या तोंडावर आल्या म्हणूनच सुसंस्कृत होत नाही.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Aug 2011 - 8:24 pm | चेतन सुभाष गुगळे

<< जाणीव मला आहे म्हणून मी मोठं होण्याची शक्यता आहे.>>

आमच्या तुम्हाला शुभेच्छा!

<< मॅक्स तेगमार्कचं हे आणि हे लिखाण पहा, वाचा, समजून घ्या आणि मग आपण विश्वाबद्दल बोलू. ठीके? >>

कशाला बोलु किंवा टंकू? तुम्हाला शाळेत शिकवलंच गधा मजदूरी तत्वावर हा माझा प्रॉब्लेम नाहीय. तुम्ही ज्या चा ज्याचा वेगळं विश्व म्हणून उल्लेख करतंय ते सारं एका संचात बांधलं की एकच एक विश्व होतं असं वैश्विक सत्य आहे (जे अर्थातच तुम्हाला मान्य नसणार). युनिव्हर्सल सेट अर्थात वैश्विक संचात सारं काही कव्हर होतं हा साधा सोपा सिद्धांत तुम्हाला मान्य नाहीय का? हे जर मान्य नसेल तर चर्चेला अर्थ नाही आणि मान्य असेल तर मग विश्व एकच उरतं.

तरी चर्चा करायचीच असेल तर तुम्ही मोठ्या झाल्यावर करू (तशी शक्यता तुम्हाला वाटते असं तुम्हीच म्हणताय). सभ्य सुसंस्कृत तर तुम्ही तुमच्या निकषानुसार आहातच, आमचे निकष तुमच्यावर लादत नाहीच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 8:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तेगमार्कचे पेपर्स वाचलेत का? विश्वाबद्दल चर्चा करायची तर आधी अभ्यास करा. मग आपण बोलू. अभ्यासाशिवाय उगाच मेगाबाईट्स कशाला खर्च करायचे?

बाकी शुभेच्छा कोणीही दिलेल्या मला चालतात. फुकट ते पौष्टीक आणि मुळापासून. ठेंकू.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Aug 2011 - 8:42 pm | चेतन सुभाष गुगळे

<< तेगमार्कचे पेपर्स वाचलेत का? विश्वाबद्दल चर्चा करायची तर आधी अभ्यास करा. मग आपण बोलू. अभ्यासाशिवाय उगाच मेगाबाईट्स कशाला खर्च करायचे? >>

चर्चेची मला आवश्यकता वाटत नाही कारण तुम्ही युनिवर्सल सेट विषयी बोलायला तयार नाही तर मी ते तेगमार्कचे पेपर कशाला वाचू? तुम्ही म्हणता तशी एकाहून अधिक विश्व असली जरी समजा, तर त्या विश्वांचा एकत्रित उल्लेख केल्यावर जे होईल त्याला तुम्ही काही तरी नाव देणारच ना? कदाचित महाविश्व किंवा असलंच काहीतरी द्याल. आम्ही त्यालाच तर विश्व म्हणतो. आणि म्हणूनच आमच्या मते विश्व एकच आहे (तुम्ही म्हणताय ती सगळी विश्वं एकत्रित रीत्या संबोधताना होणारं).

तरीही तुम्हाला खरंच अतिशय गंभीरपणे या विषयावर चर्चा करायची असेल तर या धाग्यावर नको. त्याकरिता स्वतंत्र धागा काढा / खरड वही / व्यक्तिगत निरोप / इमेल यापैकी कुठलाही (तुमच्या सोयीचा) पर्याय वापरा. मी कुठल्या ही पर्यायाला प्रतिसाद देईल . अगदी मनापासून आणि गंभीरपणे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 8:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हाला चर्चेची आवश्यकता वाटत नाही, तुम्ही संशोधन समजून घेणार नाही तर तुमच्याशी मी काय डोंबल चर्चा करू? कधीमधी मी ही मोठी होतेच की! चर्चा करायचीच तर सरळ तेगमार्कशीच करेन की! तो ही त्याचा इमेल अड्रेस देतो.

चर्चा करायची ('वैश्विक सत्य' सांगायची नव्हे!) तयारी असेल तर आधी संशोधन वाचा, ते सगळं समजून घ्या आणि नंतर बोला. नाहीतर हुडूत्त!

सूड's picture

25 Aug 2011 - 7:26 pm | सूड

खरंच हो गुगळे स्वत:च्या मोठेपणाविषयी फार काही न लिहीता गुगलायचा जो काही अनमोल सल्ला तुम्ही दिलात तो कुतुहलापोटी आम्ही वापरुन पाह्यला. त्यात आम्हाला हे आणि हे सापडले.

अवांतरः हे लिहीताना कोल्हापूरी दादांचा स्वतःचा मोठेपणा न सांगण्याचा स्वभाव आठवल्यावाचून राह्यले नाही.

गुगळे तुमचं मोठेपण आम्हा लोकांना कळेल तोच सुदिन !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2011 - 11:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रकाटाआ

पैसा's picture

24 Aug 2011 - 11:31 pm | पैसा

परण्णाच्या उपोषणाचं स्थळ कोणतं?

पराण्णा, जरा सांभाळून र्‍हावा बरं. इथलं पब्लिक "तुमच्या पाठीशी आहे" असं म्हणत पाठीमागून ढकलून देईल हळूच!

चिंतामणी's picture

25 Aug 2011 - 12:00 am | चिंतामणी

भारतीय संघातील खेळाडुंसारखे अनेक धाग्यांच्या दांड्या गुल होत असताना पराण्णा द्रवीडने एकाच दिवसात शतक ठोकले आहे.

या शतकी वाटचालीत त्याला साथ देणा-या धम्या लक्ष्मण, सोकाजी मिश्रा यांचे सुद्धा हबिणंदन

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Aug 2011 - 12:24 am | चेतन सुभाष गुगळे

<< पराण्णा द्रवीडने एकाच दिवसात शतक ठोकले आहे >>

एका दिवसात कसलं? फक्त आठ तासातच. हाच वेग कायम ठेवला तर लवकरच दीडशतकाच्या उंबरठ्यावर पोचलेल्या त्या प्रियालीच्या पुरुषालाही मागे टाकेल.

प्रिय पराण्णा,

आपणांस आठवत असेलच , २० ऑगस्ट २०११ रोजी आपण मला फाउंटन या प्यार्टीस्थानी भेटलात. धागे स्वाहाकाराच्या च्या मुद्यावरून आपल्या दोघांत चर्चाही झाली. तेव्हाही सर्व धाग्यांत व्यापून राहिलेला भ्रष्टाचार मोडून काढण्याचे वचन मी आपणास दिले होते आणि आपणही त्यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाला होतात की , शिवीसेनाप्रमूख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी धागामार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही. आम्ही समन्वयाने एकत्र काम करू. मग यश निश्चीतच ! असा विश्वासही आपण तेव्हा व्यक्त केला होता , पण दुर्दैवाने त्याचदरम्यान आमच्यावर काही कौटुंबिक आपत्ती कोसळल्या व आपल्यातला संपर्क तुटला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत व तुमचाही लढा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.

आपला,
शिविसेनाप्रमूख अर्धासाहेब ठाकरे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 6:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण एक सुधारणा सुचवते हो अर्धवटशेट.

... दुर्दैवाने त्याचदरम्यान आमच्या संगणकावर काही विषाणूजनक आपत्ती कोसळल्या व आपल्यातला संपर्क तुटला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत व तुमचाही लढा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.

निखिल देशपांडे's picture

25 Aug 2011 - 10:12 am | निखिल देशपांडे

माझा वैयक्तिक पातळीवर पराच्या जनलोकपाला पाठिंबा आहे. आमच्या पक्षाच्या अध्यक्षांशी मी कालच चर्चा केली. संपादक मंडळा समोर हा विषय मी स्वता:चा कॅपेकिटी ( शब्दः साभार) मधे काढणार आहे.

श्रावण मोडक's picture

25 Aug 2011 - 11:43 am | श्रावण मोडक

माझा वैयक्तिक पातळीवर पराच्या जनलोकपाला पाठिंबा आहे. आमच्या पक्षाच्या अध्यक्षांशी मी कालच चर्चा केली.

वैयक्तिक? समजलं. पण लगेच पुढं पक्षाच्या अध्यक्षांशी चर्चा. म्हणजे तुम्ही पक्के कॉंग्रेसी. अध्यक्ष का अध्यक्षा, तेवढंच सांगा. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 6:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अध्यक्ष का अध्यक्षा, तेवढंच सांगा.

तुम्हाला काय करायचं आहे हो, पक्षाध्यक्ष स्त्री आहेत का पुरूष आहेत याचं? तुमचा पुरूषी-तुच्छतावाद आता जरा बाजूला ठेवा आणि भानावर येऊन प्राप्त परिस्थितीचं रिपोर्टींग करा की!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Aug 2011 - 11:05 am | मिसळलेला काव्यप्रेमी

काय झाले?
पराण्णांचे उपोषण (कां कुपोषण?) संपले की नाही?
सध्या त्यांचे बी. पी. किती आहे? आणि पल्स रेट?

नावातकायआहे's picture

25 Aug 2011 - 5:02 pm | नावातकायआहे

आम्चेकड मै प्रा हुं! आस छापलेले रुमाल, टोपी, बनीयान, शर्ट, हात्मोजे, लंगोट, आंडरवेर, पायजमे, पायमोजे
सर्व आकारात भेटतील.

एकाव एक फ्री.

पत्ता: समाधान देशी दारुचे दुकान, साडेसतरा नळी हडपसर.

इरसाल's picture

25 Aug 2011 - 5:30 pm | इरसाल

१.

२.

३.

४.

प्रीत-मोहर's picture

26 Aug 2011 - 10:29 am | प्रीत-मोहर

उपोषण कुठवल आले म्हणे?

(भोचक, भावी पुणेकर) प्रीमो

अण्णांच्या आंदोलनामुळे एका जुन्या अनुत्तरीत प्रश्नाचं उत्तर मिळालं.

गांधीजी गांधी टोपी का घालत नसत?

हाच तो प्रश्न. "मै अण्णा हजारे हूं" असं लिहीलेली टोप्पी अण्णा तरी कुठे घालतात. थोडक्यात आपल्या नावाची टोपी आपणच घालु नये. दुसर्‍यांना घालावी हेच ते वैश्विक सत्य (हा शब्दप्रयोग काहींना झोंबण्याची शक्यता आहे).